MPSC CHALU GHADAMODI DAILY || रोज चालू घडामोडी || २३ march २०२२
चालू दैनंदिन घडामोडी
शालेय अभ्यासक्रमातून धार्मिक शिक्षण नाही. शालेय अभ्यासक्रमात कोणते धर्माचे शिक्षण दिले जाणार नाही तर मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आवश्यक आहे अशी भूमिका राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी मांडली. शालेय अभ्यासक्रमात भगवदगी तेचा समावेश करण्याची भाजप ची त्यांनी फेटाळून लावली. केवळ राजकारणासाठी अशी मागणी केली जात असल्याची टीका त्यांनी केली. राज्यातील शालेय शिक्षणात भगवद्गीता व संत साहित्याचा समावेश करण्याची मागणी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी राज्य सरकारकडे केली आहे मात्र ही मागणी मान्य करता येणार नाही असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. भगवद्गीता धार्मिक ग्रंथ आहे एका धर्माचा ग्रंथाचा शिक्षणात समावेश केला तर इतर धर्मियांकडूनही तशी मागणी होईल भारतीय संविधानात धर्मनिरपेक्ष तत्त्वाचा समावेश आहे विद्यार्थीदशेपासूनच मुलांच्या मनात हे विचार रुजविला पाहिजेत. त्याचबरोबर मुलांमध्ये त्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे ही राज्य सरकारची भूमिका आहे.
विद्यार्थिनींच्या पहिल्या तुकडीला प्रशिक्षण देण्यास एनडीए सज्ज. सैन्य दलात अधिकारी होण्यासाठी पायाभूत प्रशिक्षण देणारे देशातील प्रतिष्ठित संस्था असलेली राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी एन डी ए विद्यार्थिनींच्या पहिल्या तुकडीला प्रशिक्षण देण्यास सज्ज झाली आहे जून 2022 पासून खडकवासला येथील प्रबोधिनीच्या आवारात विद्यार्थ्यांबरोबर विद्यार्थिनींचे प्रशिक्षण सुरू होणार आहे यासाठी देशभरातून एकोणवीस मुलींची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी तर्फे मंगळवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती देण्यात आली. साडे सोळा वर्षे वयोगटातील मुलींची केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेली लेखी प्रवेश परीक्षा सर्विस सेलेक्शन बोर्ड मुलाखती आणि वैद्यकीय परीक्षा अशी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून या 19 मुलींची पहिल्या तुकडीसाठी निवड करण्यात आली आहे. करण्यात आलेल्या 19 पैकी 10 विद्यार्थिनी भारतीय लष्कर प्रशिक्षणासाठी तर सहा हवाईदल प्रशिक्षणासाठी व तीन विद्यार्थिनी नवोदय प्रशिक्षणासाठी एनडीएमध्ये दाखल होणार आहेत.
केंद्रीय विद्यापीठांतील प्रवाशांसाठी आता राष्ट्रीय पातळीवर प्रवेश परीक्षा. देशातील केंद्रीय विद्यापीठातील पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आता राष्ट्रीय पातळीवर प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे केंद्रीय विद्यापीठाने या परीक्षेसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रवेश अर्ज उपलब्ध होतील विद्यापीठ अनुदान आयोगाने यासंदर्भात परिपत्रकाद्वारे माहिती दिली. देशभरात 50 हून अधिक केंद्रीय विद्यापीठे आहेत आतापर्यंत केंद्रीय विद्यापीठांकडून स्वतंत्रपणे प्रवेश प्रक्रिया ला राबविली जात होती मात्र यूजीसी कडून निधी दिल्या जाणाऱ्या सर्व केंद्रीय विद्यापीठांना एका पातळीवर आणून सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय यूजीसीने घेतला आहे व त्यासाठी शैक्षणिक वर्ष 2022-23 या वर्षापासून राष्ट्रीय परीक्षा मंडळातर्फे एन टी ए. परीक्षा घेतली जाईल विद्यार्थ्यांना हिंदी मराठी गुजराती तमिळ तेलगु आधी 13 भारतीय भाषांमध्ये परीक्षा देता येईल तसेच काही परदेशी भाषांतूनही परीक्षा देण्याची मुभा आहे या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 27 विषयांच्या निवडीचा पर्याय आहे त्यातून विद्यार्थ्यांना कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त सहा विषयांची निवड करता येईल. केंद्रीय विद्यापीठातील पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आतापर्यंत बारावीचे गुण महत्त्वाचे ठरत होते मात्र आता सामाईक प्रवेश परीक्षा मुळे याच परीक्षेतील गुन्हा नुसारच प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल.
एसटी संपाबाबत सरकारचे धोरण शुक्रवारपर्यंत परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती.
प्रतिष्ठेचा विल्यम सी हो ल्मबर्ग पुरस्कार डॉक्टर प्रमोद चौधरी यांना प्रदान अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे नुकत्याच झालेल्या ॲडव्हान्स बाय ऑफ इकॉनोमी लेडरशिप कॉन्फरन्स ए बी एल सी 2022 च्या जागतिक परिषदेत पुण्यातील प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर प्रमोद चौधरी यांना प्रतिष्ठेचा विल्यम सी होलम बर्ग पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला यंदा प्रथमच हा पुरस्कार अमेरिके बाहेरील व्यक्तीस देण्यात आला असून हा पुरस्कार मिळविणारे डॉक्टर प्रमोद चौधरी हे पहिले भारतीय आहेत.
23 मार्च जागतिक हवामान दिन. जागतिक हवामान दिन त्यादिवशी 23 मार्चला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जिनेव्हा स्थित जागतिक हवामान विभागातर्फे साजरा होतो या संस्थेचा मूळ उद्देश म्हणजे प्रत्येक राष्ट्राकडून त्याचा हवामान बदलाचा सांख्यिकी अहवाल गोळा करते त्यांची आपापसात देवा निर्माण करणे आणि हवामान बदलामुळे प्रभावित झालेल्या राष्ट्रांना तांत्रिक मदत देणे. थोडक्यात हवामान बदलामुळे प्रत्येक नागरिकाची स्थान आणि त्याच्या जीवनशैलीचा पृथ्वीच्या वातावरणावर कसा परिणाम होतो हे समजावून सांगणे आणि लोकांना त्यानुसार बदलण्यास प्रोत्साहित करणे या उद्देशाने जागतिक हवामान दिन 23 मार्च 1961 पासून सुरु झाला तेव्हापासून जागतिक हवामान दिन विभागातर्फे एक घोषवाक्य दिले जाते.2021 मधील घोषवाक्य होते समुद्र आपले वातावरण आणि हवामान तर यावर्षी 2022 मधील घोषवाक्य होते त्वरित सूचना आणि तात्काल उपाय आहे.
1. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच नवीन क्रीडा धोरण 2022-27 लाँच केले आहे?
उत्तर: गुजरात सरकार
2. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने “My EV” हे ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे?
उत्तर: दिल्ली सरकार
3. खालीलपैकी कोणाची नुकतीच ऑइल इंडिया लिमिटेडचे पुढील अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
उत्तर: रणजित रथ
4.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने व्हाईट फर्न्सची अष्टपैलू खेळाडू अमेलिया केर आणि कोणत्या पुरुष फलंदाजाला फेब्रुवारी 2022 साठी ICC प्लेयर्स ऑफ द मंथ म्हणून नाव दिले आहे?
उत्तर: श्रेयस अय्यर
5.बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सने अलीकडेच तपन सिंघेल यांची एमडी आणि सीईओ म्हणून किती वर्षांसाठी नियुक्ती केली आहे?
उत्तर: (D) 5 वर्षे
फॉर्च्यून इंडिया द नेक्स्ट 500 च्या 6.8 व्या आवृत्तीत RailTel ऑफ इंडियाचा रँक किती आहे?
उत्तर: १२४ वे स्थान
7. भगवंत मान यांनी अलीकडेच कोणत्या पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे?
उत्तर: १८ वा
8.भारतीय महिला गोलंदाज झुलन गोस्वामी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती विकेट घेणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे?
उत्तर: 250 विकेट्स
9. खालीलपैकी कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती रुपिया बांदा यांचे वयाच्या 85 व्या वर्षी नुकतेच निधन झाले आहे?
उत्तर: झांबिया
10. भारताचे इक्विटी मार्केट प्रथमच बाजार भांडवलाच्या बाबतीत जगातील कोणत्या स्थानावर पोहोचले आहे?
उत्तर: पाचवा