MPSC चालू घडामोडी - CHALU GHADAMODI २१ march २०२२ संपूर्ण चालू घडामोडी व प्रश्न उत्तरे
कोव्हींशील्ड ची दुसरी मात्रा 8 ते 16 आठवडे दरम्यान. एन टी ए जी आय ची शिफारस करण्यात आली आहे. करोणाच्या कोव्हींशील्ड लशीची ची दुसरी मात्रा पहिल्या मात्रे नंतर आठ ते सोळा आठवड्यांच्या दरम्यान देण्याची शिफारस लसीकरण राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने केली आहे. सध्या कोव्हींशील्ड ची दुसरी मात्रा 12 ते 16 आठवडे या दरम्यान देण्यात येते.
कला महाविद्यालयावर रशिया चा हल्ला युक्रेनच्या मारिओ पोल्स शहरात चारशे जणांनी आश्रय घेतलेल्या एका कला महाविद्यालयावर रशियाच्या लष्कराने बॉम्ब हल्ला केल्याचे युक्रेन च्या अधिकाऱ्यांनी सांगितले या हल्ल्यात शाळेची इमारत नष्ट झाली असून अनेक लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती स्थानिक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत महाराष्ट्रात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे.
हिजाब सुनावनितील तील तीन न्यायमूर्तींना धमक्या वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
एन बिरेन सिंह यांची पुन्हा मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी निवड. एन बिरेन सिंह हेच दुसऱ्यांदा मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी राहतील असे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी फार मध्ये जाहीर केले.
21 मार्च हा आंतरराष्ट्रीय वन दिवस म्हणून साजरा केला जातो वृक्ष हा जंगलाचा एक महत्त्वाचा घटक आहे त्याचा मानवी कल्याणासाठी असणारा उपयोग जंगलावर अवलंबून असणारी प्राचीन औषध प्रणाली त्याचबरोबर आदिम जमाती ची त्यावरील उपजीविका आणि जैवविविधता या सर्वांचे आपणास ज्ञान मिळावे आणि त्याचा उपयोग करून आपण जंगल निर्माण करून संवर्धन आणि संरक्षण करावे या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने 2012 पासून 21 मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून पृथ्वीवरील सर्व लहान-मोठ्या सदस्य राष्ट्रांना तळागाळापर्यंत जाऊन साजरा करण्याचे सुचविले
तेल आयातीच्या भारताच्या स्वतंत्र धोरणाचे इमरान खान यांच्याकडून कौतुक. अमेरिकेचे निर्बंधाची तमा न बाळगता भारताने रशियाकडून कच्चे तेल आयात केल्याचे सांगून स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे पालन करत असल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी भारताची प्रशंसा केली
भारताच्या लक्षला उपविजेतेपद. अंतिम सामन्यात अव्वल मानांकित एक्सेल सेंट कडून सरळ गेममध्ये पराभूत. भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष सेन ला ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात डेन्मार्कच्या व्हि क्टर एक्सेल कडून 21 -10 व 21-15 असे सरळ गेम मध्ये पराभूत होऊन उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. लक्ष या प्रतिष्ठित स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा भारताचा पाचवा खेळाडू ठरला.
भारतीय हॉकी संघाची अर्जंतीना वर मात. अखेरचे मिनिटात झळकावलेल्या गोलच्या जोरावर भारताने एफ आय एस एच प्रो लीग हॉकी मध्ये अर्जेंटिना वर 4 - 3 अशी सरशी साधली.
MPSC CHALU GHADAMODI PRASHN UTTRE
दरवर्षी जागतिक स्पॅरो / चिमणी दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तर - 20 मार्च
जागतिक चिमणी दिनाची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली?
उत्तर - 2010 पासून
वैज्ञानिक संशोधनासाठी GD बिर्ला पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली आहे?
उत्तर: नारायण प्रधान
अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने “मुख्यमंत्री चा श्रमिक कल्याण संकल्प” नावाची विशेष योजना सुरू केली आहे?
उत्तर - त्रिपुरा राज्य सरकारद्वारे
कोणत्या देशासाठी प्रथमच GI टॅग केलेल्या काश्मिरी कार्पेटला ग्रीन सिग्नल मिळाला आहे?
उत्तर - जर्मनी
भारतातील पहिले व्हर्च्युअल स्मार्ट ग्रिड नॉलेज सेंटर कोठे सुरू करण्यात आले आहे?
उत्तर : मानेसर
मिशन इंद्रधनुषच्या यादीत कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे?
उत्तर - ओडिशा
भारतातील पहिले वैद्यकीय शहर कोठे स्थापन झाले?
उत्तर : पुणे ग्रामीण