MPSC चालू घडामोडी Current Affairs Daily Chalu Ghadamodi 20 March 2022
रशियाचा युक्रेन वर अतिवेगवान क्षेपणास्त्र मारा. युक्रेनच्या किव्ह प्रांतातील मकारिव्ह शहरावर रशियाने केलेल्या तोफांच्या हल्ल्यात शुक्रवारी साथ नागरिकांचा मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाले दरम्यान रशियाने युक्रेनमध्ये अतिवेगवान किंजल क्षेपणास्त्र यांचा वापर केल्याची माहिती आय एफ एक्स च्या अहवालात दिली आहे. युक्रेनच्या ओडीसा शहराजवळचे रेडिओ केंद्र ही रशियाने नष्ट केल्याचे या अहवालात म्हटले आहे.
प्रवास रेड्डी सागरी महामार्गाच्या कामाला वर्षभरात प्रारंभ. मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास वेगवान व्हावा यासाठी रस्ते विकास महामंडळाने रेवस ते रेड्डी हा सागरी महामार्ग प्रकल्प हाती घेतला आहे या प्रकल्पांतर्गत आठ खाडी पूल बांधण्यात येणार असून यातील पहिल्या रेवस ते कारंजा खाडी पुलासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे उर्वरित सात खाडी पूलांसाठी सहा ते सात महिन्यात निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे हा महामार्ग 715 किलोमीटर चा आहे.
भारतात 3.2 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे जपान चे लक्ष्य. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशी दा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात शनिवारी चर्चा झाली पाच वर्षासाठी भारतात तीन लाख 20 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे जपानचे लक्ष असल्याची घोषणा किशिदा यांनी केली. यावेळी दोन्ही देशांनी विविध क्षेत्रांत द्विपक्षीय सहकार्य विस्तारासाठी सहा करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. मोदी म्हणाले की भारत जपान मधील दृढ संबंध याचा लाभ प्रादेशिक शांतता समृद्धीसाठी होईल.
एसटीत कंत्राटी चालक भरती अकरा हजार कर्मचाऱ्यांच्या नियु क्त्तीसाठी लवकरच खासगी संस्थेला ठेका. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी एसटी संपकरी कर्मचाऱ्यांन मध्ये वाहका बरोबरच चालकांची ही संख्या मोठी असल्याने वाहतुकीचे वेळापत्रक अद्याप विस्कळीतच् आहे. ते सुरळीत करण्यासाठी एसटी ने मोठे पाऊल उचलले असून अकरा हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. चालकांची भरती करण्यासाठी मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थेच्या नियुक्तीसाठी येत्या आठवड्यात निविदा काढण्यात येईल आणि त्यानंतर साधारण पंधरा ते वीस दिवसात टप्प्याटप्प्याने कंत्राटी चालकांची भरती करण्यात येईल अशी माहिती एसटीचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
सवई आहार बदलल्यास निद्रानाशावर मात जागतिक निद्रा दिन नुकताच शुक्रवारी 18 मार्च रोजी झाला. जागतिक निद्रा सोसायटीच्या निद्रा दीन समितीतर्फे झोपेचे महत्त्व सर्वदूर समजावे यासाठी हा दिन साजरा केला जातो. निद्रानाशामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य विषयक समस्या कशा दूर कराव्यात व तिचे योग्य व्यवस्थापन कसे करावे याविषयी यानिमित्त जागृती केली जाते यंदा या दिनाचे घोषवाक्य होते सुयोग्य निद्रा निरोगी मन आणि आनंदी जग. चांगल्या झोपेसाठी तज्ञांनी काही उपाय सुचवले आहेत ते असे की संतुलित आहार निद्रेला पोषक सवयी वातावरण कुत्ते उत्तेजक पेय सेवन न करणे झोपेची वेळ निश्चित करणे आणि शारीरिक व्यायाम इतर सक्रियता राखल्यास चांगली झोप येऊ शकते.
टायलर पुरस्कार खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
>>टायलर पुरस्कार – पर्यावरण
सुरुवात – 2008 पासून
2020 चा पुरस्कार – पवन सुखदेव
अवकाशात प्रथम उड्डाण करणारे पहिले मानव कोण?
– >> युरी गागारिन
अवकाशात उपग्रह पाठविणारा पहिला देश कोणता?
>> रशिया
20 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत “सूरजकुंडचा हस्त शिल्प मेळा”कोठे आयोजित केला जाणार आहे?
>> फरिदाबाद
एलआयसी म्यूच्यूअल फंड चे नविन एमडी आणि सीईओ कोण बनले आहे?
>> टी एस रामकृष्णन
31 वे दक्षिण पूर्व एशियाई खेळ मे, 2022 मध्ये……..या देशात आयोजित होणार आहे.
>> वियतनाम