चालू घडामोडी 02 एप्रिल 2022 // April 2022 चालू ghadamodi
02/04/2022 च्या चालू दैनंदिन घडामोडी.
राज्यात दोन लाख कोटीहून अधिक जीएसटी संकलन महाराष्ट्र कायम अग्रेसर.
करोना साथीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊनही राज्यात 2021-22 या आर्थिक वर्षात दोन लाख कोटी पेक्षा अधिक वस्तू आणि सेवा कराचे जीएसटी संकलन झाले तर एकट्या मार्च मध्ये झालेले जीएसटी संकलन वीस हजार 305 कोटी रुपये आहे. देशात सरलेल्या आर्थिक वर्षात जीएसटीचे सुमारे पंधरा लाख कोटींच्या आसपास संकलन झाले त्यात महाराष्ट्राचा वाटा दोन लाख 17 हजार कोटींचा आहे देशात सर्वाधिक संकलन महाराष्ट्रात झाले वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू झाल्यापासून संकलनात देशात महाराष्ट्राचे कायम आघाडी राखली आहे राज्यात मार्च महिन्यात 20 हजार 305 कोटी तर फेब्रुवारीमध्ये 19422 कोटींचे संकलन झाले होते फेब्रुवारी च्या तुलनेत मार्च मध्ये झालेले संकलन अधिक आहे. दस्त नोंदणी पूर्वपदावर 34 हजार कोटींचा महसूल. राज्यातील मालमत्ता खरेदी विक्री व्यवहार करोनापूर्व काळा प्रमाणेच पूर्ववत झालेले असून गेल्या वर्षभरात दस्तनोंदणी तून राज्य सरकारला 34 हजार कोटींचा महसूल मिळाला नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला दिलेल्या उद्दिष्टं पेक्षा पाच हजार कोटी अधिक महसूल जमा झाला. विशेष म्हणजे गेल्या आर्थिक वर्षात महिलांच्या नावे सदनिका खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत देण्यात आली होती गेल्या वर्षभरात ते वीस लाख 70 हजार पेक्षा जास्त नोंदणी झाल्याने दस्त नोंदणीची गाडी रोडावर आल्याचे स्पष्ट झाले.
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र. उत्सव साजरा करावा तसे परीक्षेला सामोरे जा दडपण घेऊ नका तुम्ही अनेकदा परीक्षा दिलेली आहे तुम्ही समुद्र पार केलेला आहे आता किनाऱ्यावर बुडण्याची भीती अजिबात बाळगू नका असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिला.
महा ज्योतीला गेल्या वर्षीच्या तुलनेत 50 कोटी कमी निधी. ओबीसी,VJNT, आणि एस बी सी विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या योजना राबवणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेला महा ज्योती पुढील वर्षासाठी 250 कोटी रुपये दिले जाणार आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत पण ही रक्कम 50 कोटींनी कमी आहे.
मराठी भाषा भवनाचे आज भूमिपूजन भाषा विकास आणि संवर्धनावर भर. मराठी भाषेचा विकास आणि संवर्धन करण्यासाठी तसेच जगभरातील मराठी माणसांना जोडण्याचे काम करण्यासाठी सुमारे 126 कोटी रुपये खर्चून त्यांनी रोड येथे सात मजली भव्य मराठी भाषा भवन उभारण्यात येणार असून उद्या नववर्षाच्या शुभदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे.