05/04/2022 चालू दैनंदिन घडामोडी- Current Affairs 05-04-2022
चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा विदर्भात उष्णतेची लाट कायम. राज्यात सध्या दही वातावरण निर्माण झाले असून पश्चिम विदर्भाला उष्णतेचा लाटेचा इशारा दिला आहे तर कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
एचडी एफ सी लिमिटेडचे होणार एचडीएफसी बँकेत विलीनीकरण.
देशातील सर्वात मोठी गृह वित्त कंपनी एचडीएफसी लिमिटेडचे देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेत विलीनीकरण होणार आहे एचडीएफसी बँकेच्या वतीने सोमवारी शेअरबाजारात ही माहिती देण्यात आली.
आर टी इ ला ग्रहण शिक्षण विभागाचा गोंधळ आज पाठवले जाणारे एस एम एस.
शिक्षण हक्क कायद्यानुसार आर टी ई 25 टक्के आरक्षण जानवर दिल्या जाणाऱ्या प्रवाशांची यादी सोमवारी दुपारी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने म्हटले होते परंतु तांत्रिक कारणामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश याचे एस एम एस गेले नाहीत त्यामुळे शिक्षण विभागाचा कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे मंगळवारी मात्र विद्यार्थ्यांना प्रवेश आहे एसेमेस पाठवले जातील असे शिक्षण विभागाने म्हटले आहे.
9086 आरटीई प्रवेशाच्या शाळा.
101909 आरटीई च्या उपलब्ध जागा.
282783 प्राप्त झालेले एकूण अर्ज.
90688 आर टी ई तून मिळाले प्रवेश.
69859 प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी. राईट टू एज्युकेशन पालकांनी सायबर कॅफेमध्ये जाऊन वारंवार आरटी प्रवेश याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु रात्री उशिरापर्यंत संकेतस्थळ बंद असल्याचे दिसून आले त्यामुळे पालकांमध्ये संतापाची व संभ्रमाचे वातावरण होते.
90 हजार 688 विद्यार्थ्यांना प्रवेश संकेतस्थळावर कोणतीही माहिती दिसत नसली तरी राज्यातील 90 हजार 688 विद्यार्थ्यांची आर टी ई प्रवेशासाठी निवड झाली आहे. त्यात दोनशे दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश आहे तर 69 हजार 859 विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत प्रवेशाचे एस एम एस प्राप्त झाल्यानंतर पालकांनी एकोणवीस एप्रिल पर्यंत संबंधित शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
पाकिस्तान मधील राजकीय पेच. काळजीवाहू पंतप्रधान पदी माजी सरन्यायाधीश अहमद? इम्रान खान यांची शिफारस.
पाकिस्तानचे नेते इम्रान खान यांनी सोमवारी माजी सरन्यायाधीश गुलजार अहमद यांची काळजीवाहू पंतप्रधान पदी नेमणूक करण्याची सूचना पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली यांना केली.
पंधरा हजाराहून अधिक भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात.
गेल्या वर्षभरात ऑस्ट्रेलियातील शिक्षण संस्थांमध्ये शिकण्यासाठी देशभरातील 28 हजार 785 विद्यार्थ्यांनी विद्यार्थी विजा अर्ज दाखल केले त्यापैकी पंधरा हजार तीनशे दहा विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर झाल्याची माहिती ऑस्ट्रेलिया सरकारच्या व्यापार आणि गुंतवणूक आयोगाच्या परिष्ट आयुक्त डॉ. मोनिका केनेडी यांनी दिली
यंत्रमानव कृत्रिम बुद्धिमत्ता द्वारे विद्यार्थ्यांची मुलाखत पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे विद्यापीठाचा संयुक्त उपक्रम.
जगात सातत्याने होत असलेले बदल अभ्यासक्रमात येण्याची गरज आहे स्मार्ट इंटरव्यू हा त्याचाच एक भाग आहे विद्यार्थ्यांना उद्योगाच्या ग रजाच्या दृष्टीने घडवण्यासाठी जगातील कंपन्यांची जोडण्यासाठी त्याची मदत होईल.
नोकरीच्या मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्मार्ट इंटरव्यू प्लॅटफॉर्म याची निर्मिती केली आहे या मंचावर यंत्रमानव किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन त्या कंपन्यांना पाठवल्या जातील.
महावितरण चे पहिले अत्याधुनिक चार्जिंग केंद्र बाणेर मध्ये ऊर्जामंत्री हस्ते उद्घाटन.
प्र. अलीकडेच कोणत्या देशात जगातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक क्रूझ जहाजाने पहिला प्रवास केला आहे?
उत्तर :- चीन
प्र. अलीकडेच राष्ट्रपती राम नाथ कोविंद कोणत्या देशाच्या तीन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर गेले आहेत?
उत्तर :- तुर्कमेनिस्तान
प्र. अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात मोफत एलपीजी सिलिंडरसाठी निधीची तरतूद केली आहे?
उत्तर :- गोवा
प्र. अलीकडेच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत कोणत्या राज्याच्या लिव्हिंग रूट ब्रिजचा समावेश करण्यात आला आहे?
उत्तर :- मेघालय
प्र. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने नंदिनी क्षीरा समृद्धी सहकारी बँकेची स्थापना केली आहे?
उत्तर :- कर्नाटक
प्र. अलीकडेच 36 वर्षांनंतर प्रथमच कतार येथे होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक 2022 साठी कोणता देश पात्र ठरला आहे.
उत्तर :- कॅनडा
प्र. अलीकडेच 'इफ अँड फेल्प्स सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्युएशन रिपोर्ट 2021' मध्ये कोण अव्वल आहे?
उत्तर :- विराट कोहली
प्र. नुकतीच Farmeasy चा नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर :- आमिर खान
प्र. आर्थिक संकटामुळे अलीकडे कोणत्या देशात सार्वजनिक आणीबाणी घोषित करण्यात आली आहे?
उत्तर :- श्रीलंका
प्र. मतुआ धर्म महामेळा 2022 नुकताच कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे?
उत्तर :- पश्चिम बंगाल
प्र. भारतातील पहिली स्नो मॅरेथॉन अलीकडे कुठे आयोजित करण्यात आली आहे?
उत्तर :- हिमाचल प्रदेश
प्र. अलीकडेच, एन मारिया एमटीने राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर :- सुवर्णपदक