चालू दैनंदिन घडामोडी 06/04/2022 – Current Affairs Marathi 06 April 2022
पंधरा दिवसात इंधन नऊ रुपयांनी महाग. पेट्रोल आणि डिझेल दरात मंगळवारी 80 पैशांनी वाढ करण्यात आली त्यामुळे मुंबईत पेट्रोल 119 रुपये 67 पैसे तर डिझेल 103 . 92 रू.पोहोचले.
ईलोन मस्क ट्विटर चे नवे संचालक कंपनी तील सर्वात मोठे वैयक्तिक भागधारक.
एसटीचे विलीनीकरण अशक्य सरकारची उच्च न्यायालयात भूमिका अवमान याचिका मागे घेण्याची महामंडळाची तयारी. एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नसल्याची त्रिसदस्यीय समितीने केलेली शिफारस मान्य करण्यात आल्याचे राज्य सरकारतर्फे मंगळवारी उच्च न्यायालयात सांगण्यात आले त्या बरोबरच दाखल केलेली अवमान याचिका मागे घेण्याची तयारी एसटी महामंडळाने दाखवली मात्र हा प्रश्न सोडवण्यासाठी न्यायालयाने हस्तक्षेप करून प्रयत्न सुरू केल्या कडे लक्ष वेधले.
एमएचटी सीईटी च्या नोंदणीसाठी 15 एप्रिल पर्यंत मुदतवाढ. अभियांत्रिकी फार्मसी आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी एम एच टी सी इ टी या परीक्षेच्या नोंदणीची मुदत वाढवण्यात आली आहे आता विद्यार्थ्यांना 15 एप्रिल पर्यंत नोंदणी करता येणार असल्याची माहिती राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून सीईटी सेल कडून देण्यात आली आहे.
महावितरण च्या संचालक पदी ज्योती चेमटे यांची नियुक्ती. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या महिला संचालक पदी स्वतंत्र महापारेषण च्या पुणे परी मंडळातील अधीक्षक अभियंता ज्योती चिमटे यांची नियुक्ती झाली आहे.
विद्यार्थ्यात भेदभाव करणाऱ्या शाळांवर कारवाई शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा इशारा. विद्यार्थ्यांना मानसिक दृष्ट्या त्रास होऊ देणाऱ्या शुल्क भरले नाही म्हणून त्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या शिक्षण संस्था ची गय केली जाणार नाही असा इशारा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला आहे. शोधना भरल्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढणाऱ्या कांदिवली येथील शाळेच्या मुख्याध्यापकांनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पालकांना दमदाटी करणाऱ्या पुण्यातील उंड्री येथील शाळेत नोटीस देण्यात आली आहे.
विद्युत दळणवळण हेच इंधन दरवाढीला व्यवहार्य उत्तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मत पर्यायी इंधन परिषदेचा समारोप.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या पीएचडी साठी निधी चा अडसर. अनेकांनी संशोधन प्रकल्प अद्यावत सोडले. आदिवासी विकास खात्यासाठी अकरा हजार कोटी रुपयांची तरतूद केली जात असली तरी पीएचडी करू इच्छिणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था टी आर टी आय अधी छात्रवृत्ति देत नसल्याने या समाजातील विद्यार्थी संशोधक होण्यापासून वंचित राहत आहेत.
राज्यात हायड्रोजन पासून वीज निर्मिती करणार उर्जा मंत्री डॉक्टर नितीन राउत शाळा महाविद्यालयातही चार्जिंग सेंटर सुरू करणार. राज्यात पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत त्यापासून वीजनिर्मिती सुरू असतानाच भविष्यात हायड्रोजन पासून वीज निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री डॉक्टर जितेंद्र यांनी पुण्यात आयोजित पर्यायी इंधन परिषदेत केली.
मुलांनो प्रवेश पूर्व परीक्षेच्या तयारीला लागा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जात असुन येत्या गुरुवारी बारावी चा शेवटचा पेपर आहे परंतु परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश पूर्व परीक्षांची तयारी करावी लागणार आहे. यंदा नीट ची परीक्षा 1 महिने आधी असून सीईटी परीक्षा 13 ते 16 जून या कालावधीत होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी आळस झटकून पुन्हा अभ्यासाला सुरुवात करावी लागेल. काही वर्षापासून इयत्ता बारावीच्या गुनांचे महत्त्व कमी झाले असून प्रवेश पूर्व परीक्षा मध्ये मिळालेल्या गुणांवरच पुढील प्रवेश अवलंबून आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश पूर्व परीक्षांची तयारी करावी लागणार आहे.
Chalu Ghadamodi Prashn Uttare 06 April 2022
प्र. 18 ते 25 एप्रिल दरम्यान होणाऱ्या 83व्या राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2022 चे आयोजन कोणते राज्य करेल?
उत्तर :- मेघालय
प्र. अलीकडेच, संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे आंतरराष्ट्रीय खाण जागरूकता आणि खाण काम सहाय्यता दिवस 2022 कधी साजरा केला जातो?
उत्तर :- ०४ एप्रिल
प्र. अलीकडेच कोणत्या देशाने इंग्लंडचा ७१ धावांनी पराभव करून ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२२ जिंकला आहे?
उत्तर :- ऑस्ट्रेलिया
प्र. अलीकडेच दिल्ली ते कोणत्या शहरापर्यंत भारतातील पहिल्या जलद रेल्वेचे अनावरण करण्यात आले?
उत्तर :- मेरठ
प्र. अलीकडेच दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर :- विकास कुमार
प्र. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी नवीन मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर :- उत्तर प्रदेश
प्र. अलीकडेच 02 एप्रिल 2022 रोजी, IAF ने कोणत्या हेलिकॉप्टरद्वारे हकिमपेट एअर फोर्स स्टेशनवर गौरवशाली सेवेची 60 वर्षे साजरी केली?
उत्तर :- चेतक हेलिकॉप्टर
प्र. अलीकडे मियामी ओपन टेनिस 2022 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
उत्तर :- इंगा स्वितेक
नुकताच “राष्ट्रीय सागरी दिन” कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – ५ एप्रिल
अलीकडेच कोणत्या राज्याला 13 नवीन जिल्ह्यांचा नवा नकाशा मिळाला आहे?
उत्तर – आंध्र प्रदेश
भारतीय नौदलाचा बहुपक्षीय सराव मिलान 2022 कोठे सुरू झाला?
उत्तर – विशाखापट्टणम
83 वी राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2022 चे आयोजन कोण करेल?
उत्तर –मेघालय
नुकतेच युरोपियन युनियनच्या संसदेचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे?
उत्तर – रॉबर्टा मेत्सोला
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे नवे मुख्य अर्थशास्त्रज्ञ कोण बनले आहे?
उत्तर: पियरे-ऑलिव्हियर गौरीचस