आज च्या चालू घडामोडी - Daily Current Affairs april 03 2022
जीएसटी भवना चे भूमिपूजन.
महाराष्ट्र हे औद्योगिक व व्यापारी दृष्ट्या देशातले सर्वाधिक विकसित राज्य असून देशात जीएसटी द्वारे सर्वाधिक महसूल महाराष्ट्रातून जमा होतो. देशाच्या जीएसटी वसुलीत महाराष्ट्राचा वाटा 14.70 टक्के आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वडाळा येथे वस्तू आणि सेवा कर भवनाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन झाले.
मार्चच्या तापमानाचा 122 वर्षातील उच्चांक. मार्च महिन्यातील तापमान आणि हवामानाने यावर्षी विविध वैशिष्ट्ये आणि विक्रम नोंदवले आहेत या महिन्यात महाराष्ट्रासह देशाच्या निम्म्याहून अधिक भागात दोन टप्प्यांमध्ये आलेल्या उष्णतेच्या तीव्र लाटांनी गेल्या 122 वर्षातील कमाल तापमानाचा उच्चांक नोंदविला आहे संपूर्ण महिना उन्हाच्या तीव्र झडा कायम राहिल्याने या महिन्यात देशात अवकाळी पावसाचे प्रमाणही कमी राहिले सरासरीच्या तुलनेत मार्च मध्ये पाऊस 71 टक्के कमी झाल्याचे भारतीय हवामान शास्त्र विभागाने नमूद केले आहे.
शिक्षण सेवा परीक्षेचा चार वर्षांनी निकाल जाहीर. महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडून एमपीएससी राबविल्या जाणाऱ्या पदभरती परीक्षांची प्रक्रिया रखडत असल्याबाबत उमेदवारांकडून सातत्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे त्याचेच एक उदाहरण समोर आले असून एमपीएससीतर्फे झालेल्या महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब विभागीय परीक्षा 2017 या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेचा निकाल चार वर्षांनी जाहीर करण्यात आला आहे यात 283 उमेदवार लेखी परीक्षेत मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. मुलाखतीची वेळापत्रक एमपीएससी करून लवकरच जाहीर करण्यात येईल.
भारत आणि कोणत्या देशादरम्यान 20 वा द्विपक्षीय नौदल सराव वरुण-2022 कोठे सुरू झाला आहे?
उत्तर - फ्रान्स
अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कॅच द रेन मोहीम 2022 सुरू केली आहे?
उत्तर : मणिपूर
कोणत्या राज्याने अलीकडेच कैद्यांसाठी वैयक्तिक कर्ज देण्याची योजना सुरू केली आहे?
उत्तर - महाराष्ट्र
नुकतेच प्रकाशित झालेले "द टायगर ऑफ दास" हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
उत्तरः मीना नय्यर
कोणते राज्य नुकतेच रेबीज मुक्त घोषित झालेले पहिले राज्य बनले आहे?
उत्तर - गोवा
अलीकडेच न्याय विभागाचे नवीन संकेतस्थळ कोणाकडून सुरू करण्यात आले आहे?
उत्तर- किरेन रिजिजू