चालू घडामोडी – Daily Current Affairs April 04 2022
पाकिस्तानी संसद बरखास्त तीन महिन्यात मुदतपूर्व निवडणुका पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव रद्द.
पाकिस्तानात वेगवान राजकीय घडामोडी घडत असून रविवारी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव ऐनवेळी संसदेच्या उपसभापती नी घटनाबाह्य ठरवून फेटाळला. त्यानंतर इमरान खान यांच्या सल्ल्यानुसार अध्यक्ष यांनी पाकिस्तानी संसद बरखास्त केली त्यामुळे तेथे आता नव्वद दिवसांच्या आत नव्याने निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.
करोना संपूनही विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षेची मागणी म्हणजे धोक्याची घंटा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे स्पष्ट मत.
करोना प्रादुर्भाव संपल्यानंतर ऑनलाइन परीक्षा घ्या असे म्हणणे म्हणजे धोक्याची घंटा आहे यातून विद्यार्थ्यांना बाहेर पडावे. ऑफलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे आपली जबाबदारी आहे विद्यार्थिनींनी ऑफलाईन शिक्षणा ची सर्व उभारावी असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी मांडले. नवीन शैक्षणिक धोरणात समान संधी मंडळ प्रत्येक ठिकाणी असावे ही शासनाची भूमिका आहे समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे उच्च शिक्षण सर्वांना उपलब्ध करुन देण्यासोबतच शैक्षणिक गुणवत्तेकडे ही लक्ष देण्यात येत आहे .
हॉकी भारताची इंग्लंड वर मात. उपकर्णधार हरप्रीत सिंगच्या हट्रिक आणि कर्णधार मनप्रीत सिंगच्या गोलच्या जोरावर भारतीय पुरुष संघाने रविवारी एफ आय एच प्रो लीग चुरशीच्या सामन्यात इंग्लंडवर 4-3 अशी मात केली भारताचा इंग्लंडवर दोन दिवसात सलग दुसरा विजय ठरला. भारताने यंदा प्रोलिंग हॉकीमध्ये सातत्यपूर्ण खेळ केला आहे त्यांचा हा 10 सामन्यात 21 गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
द्रविड यशस्वी प्रशिक्षक ठरेल बीसीसीआय अध्यक्ष गांगुलींचा विश्वास. राहुल द्रविड कडे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक पद यशस्वीरित्या सांभाळण्यासाठी सर्व गुण आहेत अशा शब्दात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने त्याच्या माजी संघ सहकार्याची स्तुती केली.
आकाशातून पडले धातूची दोन गोळे चंद्रपूरचे खगोल अभ्यासक म्हणतात सॅटेलाइट च्या अवशेष.
सिंदेवाही तालुक्यापासून तीन किलोमीटर अंतरावरील लाडबोरी व पंधरा किलोमीटर अंतरावरील पवन पार्क येथील परिसरात शनिवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास आकाशातून धातूची रिंग व दोन मोठ्या गोलाकार वस्तू पडल्या या गोलाकार वस्तू सिलेंडर असाव्यात असे मानले जात आहे एका सॅटेलाइट चे हे अवशेष असल्याची माहिती भूगोल अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे व योगेश दूध पचारे यांनी दिली.
मार्च महिन्यामध्ये वाढलेले रोजगार बेरोजगारीचा दर घटला हरियाणात सर्वाधिक 26.7 टक्के बेरोजगार. फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेमध्ये मार्च महिन्यात अधिक रोजगार उपलब्ध झाले असून बेरोजगारीचा दर घटला आहे असे असले तरी हरियानामध्ये बेरोजगारी सर्वाधिक म्हणजे 26.7 टक्के आहे कर्नाटक आणि गुजरात मध्ये बेरोजगारीचा दर प्रत्येकी 1.8 टक्के असा सर्वात कमी आहे. उत्तरेमध्ये बेरोजगारी अधिक. उत्तर भारतामधील विविध राज्यांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते या आवाजामध्ये हरियाणात सर्वाधिक म्हणजे 26.7 टक्के बेरोजगारी असल्याचे नमूद आहे राजस्थान आणि जम्मू काश्मीर मध्ये हे प्रमाण प्रत्येकी पंचवीस टक्के तर बिहारमध्ये 14.4 टक्के आहे त्रिपुरा मध्ये 14.1 टक्के नागरिकांना काम नाही तर पश्चिम बंगालमध्ये हा दर 5.6 टक्क्यांपर्यंत कमी आहे कर्नाटक आणि गुजरात मध्ये ही बेरोजगारीचा दर सगळ्यात कमी म्हणजे 1.8 टक्के एवढा आहे.
अलीकडेच “icc महिला क्रिकेट विश्वचषक 2022” कोणी जिंकला आहे?
उत्तर – ऑस्ट्रेलिया
नुकतेच राष्ट्रपती राम नाथ कोविंद कोणत्या देशाच्या तीन दिवसीय दौऱ्यावर गेले आहेत?
उत्तर – तुर्कमेनिस्तान
ICC अंडर-19 क्रिकेट विश्वचषक 2022 चे आयोजन कोण करणार?
नॉर्थ वेस्ट इंडिज
नुकतेच लोकसभेत “भारतीय अंटार्क्टिक विधेयक 2022” कोणी मांडले आहे?
उत्तर – डॉ जितेंद्र सिंह