द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल माहिती – Information About Draupadi Murmu
रौपदी मुर्मू ही एक भारतीय राजकारणी आणि शिक्षिका आहे. त्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्या आहेत.
२०२२ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी त्या भाजपच्या नेतृत्वाखालील अधिकृत उमेदवार आहे.
यापूर्वी त्यांनी २०१५ ते २०२१ पर्यंत झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून काम पाहिले होते.
24 जुलै 2022 रोजी सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपती पदाचा कालावधी संपणार आहे.
द्रौपदी मुर्मू या भाजपप्रणित एनडीएच्या राष्ट्रपतिपदासाठीच्या उमेदवार आहेत.
64 वर्षीय द्रौपदी मुर्मू (जन्म 20 जून 1958) ही एक भारतीय राजकारणी असून,त्या ओडिशा राज्यातील आहेत. 2015 ते 2021 पर्यंत झारखंडच्या 9व्या राज्यपाल म्हणून काम केले आहे.
पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार्या झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल आहेत.
त्या भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी नामनिर्देशित होणाऱ्या आदिवासी अर्थात अनुसूचित जमातीच्या पहिल्या व्यक्ती आहेत.
याआधी कधीही भारताच्या राष्ट्रपतीपदी अनुसूचित जमातीची (ST) स्त्री किंवा पुरुष कार्यरत झालेला नाही.
मात्र यापूर्वी दलित अर्थात अनुसूचित जातीचे (SC) दोन राष्ट्रपती झालेले आहेत — के.आर. नारायणन व रामनाथ कोविंद.
पूर्ण नाव – द्रौपदी मुर्मू
जन्म तारीख -20 जून 1958 (वय 64)
जन्म ठिकाण -बैदापोसी गाव, मयूरभंज, ओडिशा
पक्षाचे नाव – भारतीय जनता पार्टी
शिक्षण – पदवीधर
व्यवसाय – शिक्षक, समाजसेवी, राजकारणी
वडिलांचे नाव – बिरांची नारायण तुडु
आईचे नाव -अज्ञात
पतीचे नाव – स्व. श्याम चरण मुर्मू
पतीचा व्यवसाय – बँक कर्मचारी
मुले – २ मुलगे १ मुलगी
राजनेता कार्यकाळ –
- 2015 द्रौपदी मुर्मू यांची झारखंड राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.
- २००९ मध्ये त्या रायरंगपूर मधून भाजपच्या तिकिटावर पुन्हा आमदार झाल्या.
- 2006 श्रीमती मुर्मू भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या ओडिशा राज्य अध्यक्ष बनल्या.
- 2002 द्रौपदी मुर्मू यांना ओडिशा सरकारमध्ये मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन विभागाच्या स्वतंत्र प्रभारासह राज्यमंत्री करण्यात आले.
- 2000 रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर त्या पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या आणि नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन बीजड-भाजप सरकारमध्ये स्वतंत्र प्रभारासह राज्यमंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
उपलब्धी द्रौपदी मुर्मू यांना 2007 साली ओडिशा विधानसभेने सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित केले.