Marathi Daily Current Affairs | Chalu Ghadamodi 2022 | 17 July 2022
नमस्कार , विद्यार्थी मित्र मैत्रिनिनो ,आम्ही आपणास दररोज दर्जेदार मराठी चालूघडामोडी www.marathijobs.in वर उपलब्ध करून देत आहोत . तसेच तुमच्या मागणी नुसार monthly चालू घडामोडी उपलब्ध करून देत आहोत सोबत आपणास चालू घडामोडी PDF संपूर्ण महिन्याची देत आहोत .
प्रश्न 01 भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालच्या राज्यपालांना उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
उत्तर – जगदीप धनखड़
पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड़ यांना उपराष्ट्रपतीपदासाठी भाजप एनडीएचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ……………….. आसाम राज्यातील पूरग्रस्तांना मदत पॅकेज दिले.
उत्तर – हिमंता बिस्वा सरमा
आसाम सरकार या पॅकेज अंतर्गत मदत छावण्या आणि आश्रयस्थानांमध्ये राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला 3 हजार 800 रुपये देणार आहे.
प्रश्न 03. नेमबाजी विश्वचषकात कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले?
उत्तर – ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर
भारताच्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन ऐश्वर्या प्रताप सिंग तोमरने दक्षिण कोरियातील चांगवॉन येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषकात पुरुषांच्या ५० मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे . हंगेरीच्या जालन पेक्लरचा पराभव करत त्याने सुवर्णपदक जिंकले.भारताने चार सुवर्ण, चार रौप्य आणि एक कांस्य पदकांसह एकूण नऊ पदकांसह अव्वल स्थान पटकावले.
प्रश्न 04. उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यात बुंदेलखंड एक्सप्रेसवेचे उद्घाटन कोणी केले?
उत्तर – पंतप्रधान नरेंद्र मोदी
उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातील ओराई तालुक्यातील कैथेरी गावात बुंदेलखंड एक्सप्रेस वेचे उद्घाटन करताना पंतप्रधान म्हणाले की आता विकास राज्याच्या प्रत्येक भागात पोहोचत आहे.
प्रश्न 05. महाराष्ट्र सरकारने औरंगाबाद शहराचे नाव काय ठरवले आहे?
उत्तर – छत्रपती संभाजीनगर
प्रश्न 06. महाराष्ट्र सरकारने उस्मानाबाद शहराचे नाव काय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे?
उत्तर – धाराशिव
प्रश्न 07. महाराष्ट्र सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव ……… असे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे?
उत्तर – D B पाटील नवी मुंबई विमानतळ
प्रश्न 08. खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC) चे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर – खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (KVIC) नवनियुक्त अध्यक्ष मनोज कुमार यांनी शुक्रवार, १५ जुलै २०२२ रोजी पदभार स्वीकारला.