हरतालिका शुभेच्छा Hartalikechya Shubhechha : नमस्कार , हरतालिकेचं व्रत भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतियेला महिला करत असतात. आपल्या परिवार जणांना,मित्रांना , मैत्रिणीला , इतर नातेवाईक , सोबती यांना हरतालिकेच्या शुभेछा देण्यासाठी मराठी मध्ये आपणास येथे Hartalikechya Shubhechha उपलब्ध करून देत आहे . अधिक भक्ति संदेश शुभेछा करिता – https://marathijobs.in
[2022] हरतालिका शुभेच्छा | Hartalika wishes marathi | हरतालिका शुभेच्छा संदेश | Hartalika quotes marathi | Hartalikechya Shubhechha
हरितालिके दिवशी उमा शंकराचे पूजन केले जाते. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि आलि म्हणजे सखी. पार्वतीला शिव प्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला ‘हरितालिका’ असे
म्हणतात. हरितालिकेच्या पूजेसाठी पार्वती आणि तिची सखीयांच्या मातीच्या मुर्ती आणि शंकराची पिंड यांची पूजा केली जाते . या दिवशी कडक उपवास केला जातो. काही महिला निर्जळी उपवास देखील करतात.
सण सौभाग्याचा
पतीवरील प्रेमाचा
हरितालिकेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आई पार्वती आणि शंकर देवा चा
दिव्य प्रकाश तुमच्या जीवनात सुख,
शांती, समृद्धी, ख़ुशी आणि चांगले स्वास्थ्य आणो,
अशी माझी देवा जवळ प्रार्थना.
हरतालिका च्या हार्दिक शुभेच्छा!
पतीला मिळावे दीर्घायुष्य
म्हणून करावे हरतालिका
तुम्हा सगळ्यांना हरतालिकेच्या शुभेच्छा!
माता उमाला मिळाला जसा शिव वर
तुम्हालाही मिळो मनाजोगता वर
करिती व्रत सवाष्ण वा कन्या
उपवर अक्षय राहो सौभाग्य द्यावा असा वर,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
हे गौरी शंकरार्धांगी।
यथा त्वं शंकर प्रिया तथा मां कुरु कल्याणी,
कान्त कान्तां सुदुर्लभाम्।।
हरतालिका तीज च्या शुभेच्छा
आला रे आला हरतालिकेचा सण आला,
करुन पूजा हरतालिकेची मनोभावे,
शंकरासारखा मला पती मिळावा,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
वातावरणात गारवा आहे,
आनंदी आनंद झाला आहे,
हरतालिकेच्या या दिवशी,
प्रेमाचा दिवस आला आहे,
हरतालिकेच्या शुभेच्छा!
हे गौरी शंकरार्धांगी। यथा त्वं शंकर प्रिया।
तथा मां कुरु कल्याणी, कान्त कान्तां सुदुर्लभाम्।।
हरतालिकेच्या शुभेच्छा
हरतालिका सण हा आला
आनंद गगनात मावेनासा झाला,
हरतालिकेच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा !
नव चैतन्य येवो तुमच्या आयुष्यात
असावी कायम तुम्हाला प्रियवराची साथ
म्हणून करा हरतालिका उपवास
पवित्र व्रत करुन मिळावा
तुम्हाला सुंदर पती,
हिच इच्छा हरतालिकेसमोरी
माता उमाच्या भाळी
जसा शिवाचा पिंजर
उपवर कन्येची प्रार्थना मिळो मनजोगता वर
हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
देवी पार्वती आणि भगवान शिवशंकर
यांची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहू दे!
आपल्याला हरतालिकेच्या खूप-खूप शुभेच्छा
तिच्या मनी असे एक आशा , होऊ नये तिची निराशी , सर्व इच्छांची पूर्ती होवो , समृद्धी घेऊन आली हरतालिका , हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
वातावरणात गारवा आहे, आनंदी आनंद झाला आहे, हरतालिकेच्या या दिवशी,प्रेमाचा दिवस आला आहे,हरतालिकेच्या शुभेच्छा!
संकल्प शक्तीचे प्रतीक अखंड सौभाग्याची प्रार्थना हरितालिका सणानिमित्त पूर्ण होवो तुमच्या मनोकामना ! हरितालिकेच्या भावपूर्वक शुभेच्छा!
माता उमाच्या भाळी
जसा शिवाचा पिंजर
उपवर कन्येची प्रार्थना मिळो मनजोगता वर
हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
Hartalika Aarti – हरतालिकेची आरती
श्री हरतालिकेची आरती
जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके ॥ आरती ओवाळीते । ज्ञानदीप कळिके ॥ धृ ॥
हर अर्धांगी वससी । जासी यज्ञा माहेरासी ॥ तेथे अपमान पावसी । यज्ञकुंडी गुप्त होसी ॥ जय. १ ॥
रिघसी हिमाद्रिच्या पोटी । कन्या होसी तूं गोमटी ॥ उग्र तपश्चर्या मोठी। आचरसी उठाउठी ॥ जय.॥ २ ॥
तपपंचाग्निसाधने । धुम्रपाने अघोवदने । केली बहु उपोषणे ॥ शुंभ भ्रताराकारणें ॥जय. ॥ ३ ॥
लीला दाखविसी दृष्टी । हे व्रत करिसी लोकांसाठी ॥ पुन्हा वरिसी धूर्जटी । मज रक्षावे संकटी ॥ जय. ॥ ४ ॥
काय वर्णू तव गुण । अल्पमती नारायण ॥ माते दाखवी चरण । चुकवावे जन्म मरण ॥ जय देवी ॥ ५ ॥