Pola Essay In Marathi : भारत देश हा कृषिप्रधान आहे. भारतामध्ये मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. शेतकरी आपल्या शेतामध्ये बारा महिने सतत राबत असतो. विविध प्रकारची धान्ये आपल्या शेतामध्ये शेतकरी पिकवतो.. शेती ही मुख्यतः निसर्गावर अवलंबून असते. शेती करत असताना शेतकऱ्याला एक अतिशय जवळचा प्राणी एखाद्या मित्रासारखा सहाय्याला धावून येत असतो तो म्हणजे बैल.
बैल पोळा कविता –
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी बैलपोळ्याचे हे केलेले वर्णन अतिशय चपखल आहे.
पोळा मराठी निबंध | Pola Essay In Marathi
ज्याप्रमाणे पोंगल हा दक्षिण भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. त्याचप्रमाणे ‘पोळा’ हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. शेतीचा व्यवसाय बैलांच्या जिवावरच करता येतो. भारतीय संस्कृतीत गाई बैलाला महत्त्वाचे स्थान आहे. त्यांची पूजा केली जाते. ‘पोळा’ हा सण श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी येतो. ज्या बैलांकडून वर्षभर आपण काम करून घेतो त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतात. या दिवशी पहाटेच शेतकरी बैलाला आंघोळ घालतात. मग बैलाला सजविण्याचे काम सुरू होते. बैलांच्या अंगावर विविध रंगांचे छापे मारतात. शिंगांना रंग देतात. बैलांच्या गळ्यात घुगूरमाळा घालतात. अंगावर झूल घालतात. बैलं सजले की गावातील सगळ्या बैलांची मिरवणूक काढतात. त्यावेळी तरुण मुले मिरवणुकीपुढे बेभान होऊन नाचतात. त्यानंतर प्रत्येक शेतकरी आपले बैल घरी नेतो. तिथे त्याची पत्नी बैलाची मनोभावे पूजा करते. त्याला पोटभर पुरण पोळी खाऊ घालते. घरातील लहान थोर बैलांच्या पाया पडतात.बैलांची मिरवणूक ज्यांच्या दारावरून जाते ते लोक बैलांची पूजा करतात. स्वतःच्या मालकीचे बैलं नसले तरी कोणत्याही बैलाची पूजा केल्यास चालते. शहरात बैलं नसतात म्हणून लोक कुंभाराकडून मातीचे बैलं आणून त्यांची पूजा करतात. पोळ्याच्या दिवशी बैलाला आराम असतो कोणतेही काम त्याच्या कडून करून घेत नाहीत . त्याला मारत नाहीत. माणसाबद्दलची कृतज्ञता तर कुणीही व्यक्त करतो, पण प्राण्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचे वैशिष्ट्य जगात फक्त भारतीय संस्कृतीतच दिसते.
शेतकऱ्यांसाठी पोळ्याचा सण अतिशय मोठा असतो.त्याच्या आनंदाला या सणांमध्ये पारावार राहत नाही. तो त्याचे घर सजवतो. घराला तोरणे लावतो आणि बैलांनाही पाहिजे तसे सजवून त्याची पूजा करतो
शेतामध्ये शेतकरी बैलाच्या मदतीने नांगरणी कुळवणी पेरणी मळणी इत्यादी शेतीची कामे करत असतो. बैल हे शेतकऱ्याचे अनमोल असे धन आहे. बैल शेतकऱ्याचे सर्वस्व आहे असे म्हटले तर अधिक योग्य राहील. एखाद्या दैवताप्रमाणे बैलाला शेतकरी मानत असतो. आपली संस्कृती ही कष्टाची पूजा करणारी संस्कृती आहे. बैलाचे कष्ट, त्याची शेतकऱ्याला होत असलेली मदत यांचे ऋण शेतकरी बैलांचा एक आगळावेगळा सण साजरा करून एक प्रकारे मान्य करत असतो. हा सण म्हणजे बैलपोळा होय.
बैलाची जागा यंत्राने घेतली. बैल पाळणे आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना परवडत नाही. वर्षभर वैरणीचा प्रश्न शेतकऱ्यांपुढे असतो. परंतु एक जोड व्यवसाय म्हणून दुग्ध उत्पादनासाठी पाळल्या जातात. तसे दोन बैलही पाळावेत असे मला वाटते. आजच्या डिजिटल युगामध्ये शेतकरी जर यंत्राच्या अधिक आहारी गेला तर तो त्याचा आनंद गमावून बसेल यात शंकाच नाही.
सारांश :
अशा पद्धतीने मित्रांनो आपण या लेखात बैल पोळा ची सविस्तर माहिती जाणून घेतली आपणास हा बैल पोळा निबंध मराठी Bail Pola Information In Marathi Pola Essay In Marathi आवडला तर नक्की शेअर करा . अधिक माहिती व अपडेट करिता फक्त – https://marathijobs.in/
बैल पोळा वर नेहमी चे प्रश्न
बैल पोळा हा कधी असतो ?
‘पोळा’ हा सण श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी येतो.
पोळा सण कोणत्या प्राण्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतात?
बैल हा शेतकर्यांचा मित्र असतो तो त्यांना शेतीच्या कामात मदत करतो म्हणून त्याचे बाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतात
बैलपोळा पोळा मराठी निबंध कसा लिहावा ?
या लेख मध्ये निबंध दिला आहे त्याचे पठन करावे
बैलपोळा पोळा का साजरा करतात ?
भारत देश हा कृषिप्रधान आहे. भारतामध्ये मुख्य व्यवसाय शेती हाच आहे. शेतकरी आपल्या शेतामध्ये बारा महिने सतत राबत असतो. विविध प्रकारची धान्ये आपल्या शेतामध्ये शेतकरी पिकवतो.. शेती ही मुख्यतः निसर्गावर अवलंबून असते. शेती करत असताना शेतकऱ्याला एक अतिशय जवळचा प्राणी एखाद्या मित्रासारखा सहाय्याला धावून येत असतो तो म्हणजे बैल.