Bank vinanti arj in marathi – बँक विनंती अर्ज : नमस्कार मित्रानो आपल्याला बँकेत नेहमी अर्ज करायचं काम पडत असते म्हणून आपणास अर्ज चे नमुने येथे उपलब्ध करून देत आहे . तरी सदर बँक विनंती अर्ज वरून आपणास अर्ज लिहण्यात मदत होईल .
Bank vinanti arj in marathi – बँक विनंती अर्ज
बँक कर्ज करिता विनंती पत्र,
विनंती अर्ज
प्रति,
मा. शाखा अधिकारी साहेब / बँक मॅनेजर
तालुका – तळेगाव, जिल्हा – वर्धा,
दिनांक-११-७-२०२२
अर्जदाराचे नाव- ……………………………………………………….
विषय- आपल्या बँक शाखेतून कर्ज मिळण्याबाबत
माननीय महोदय,
वरील विषयास अनुसरून मी खालील सही करणार विनंती पूर्वक अर्ज सादर करतो की, मी आपल्या बँक ऑफ महाराष्ट्र चा खातेदार असून माझा खाते क्रमांक ( Account Number – *********69565 ) आहे,
आपल्या निदर्शनात ही बाब आणण्यास मला प्रसन्नता होते की, माझा फर्निचर संबधित सामग्रीचा व्यवसाय आहे. दिवसेंदिवस माझा व्यवसाय वाढत आहे व व्यवसाय करिता लागणारे पुरेस भांडवल सध्या अपुरे पडत आहे म्हणून मला आपल्या बँकेचे कर्ज पाहिजे आहे .
तरी मी आपणास विनंती करतो की एकूण खर्चाच्या ४० % रक्कमेचे कर्ज जर आपल्या बँकेतर्फे मंजूर झाले तर मला खूप मदत होईल.
आपण कर्ज मंजूर कराल अशी आशा करतो .
आपला खातेदार,
अ ब क
खाते क्रमांक – *********69565
बँक विनंती पत्र क्रमांक दोन – कर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळण्याबाबत
विनंती अर्ज
प्रति,
मा. शाखा अधिकारी साहेब / बँक मॅनेजर
तालुका – तळेगाव, जिल्हा – वर्धा,
दिनांक-११-७-२०२२
अर्जदाराचे नाव- ……………………………………………………….
विषय- कर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळण्याबाबत
माननीय महोदय,
मी आपल्या शाखेचा खातेधारक असून मी सण 2020 मध्ये कर्ज घेतले होते त्यातले बरेचसे हप्ते मी न चुकता भरलेले आहेत परंतु काही अपरिहार्य कारणास्तव मी मागील 3 महिन्यापासून कर्जाचा हप्ता भरू शकलो नाही तरीही मला कर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी ही आपणास सविनय विनंती
आपला विश्वासू
अ ब क
सारांश –
अशा पद्धतीने आपण आज बँकेमध्ये विनंती अर्ज कसा लिहायचा याचा आपण अभ्यास केला आणि त्याचा फॉरमॅट सुद्धा आपण बघून घेतलेला आहे त्या फॉरमॅट वरून तुम्ही त्याच्यामध्ये काही बदल करून तुम्ही तुमचं स्वतःचं विनंती अर्ज लिहू शकता अजून कोणते तुम्हाला बँके संबंधित अर्ज हवे असतील तर तसं तुम्ही कमेंट करा आम्ही तुम्हाला माहिती उपलब्ध करून देऊ आणि सोबत फॉरमॅट सुद्धा वेगवेगळे उपलब्ध करून देऊ तरीही या पोस्टला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद