- 1 मे 1999 रोजी गोंदिया जिल्हयाची स्थापना झाली.
- गोंदिया जिल्हा हा भंडारा जिल्हयाचे विभाजन करुन निर्माण करण्यात आला
- धान येथील मुख्य उत्पन्न आहे.
- गहू, तुर, चना, हळद, जवस सुध्दा येथे पिकविला जातो.
- येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.
- गोंदिया प्राचीन काळी गोंड राज्याच्या अधिपत्याखाली होता.
- त्याकाळी असलेल्या दाट वनात गोंड समाज राहायचा.
- या गोंड समाजाचा त्याकाळी मुख्य व्यवसाय हा जंगलातील गोंद(डिंक) आणि लाख जंगलातून गोळा करुन गावात आणून विकणे हा असायचा.
- त्या गोंदवरुन गोंदिया हे नाव पडले असावे
- जिल्हयात मोठया उद्योगांमध्ये अदानी समूहाचा अदानी पावर लिमीटेड तिरोडा येथे सुरु झाला आहे.
- छोटया उ्द्योगांमध्ये ब-याच संख्येने राईस मिल आहेत.
- धान येथील मुख्य कृषी उत्पादन असल्यामुळे गोंदिया जिल्हा धानाचा जिल्हा म्हणून प्रसिष्द आहे.
- जिल्हयात गोदिया, तिरोडा आणि देवरी असे 3 उपविभाग आहेत
- गोंदिया आणि तिरोडा येथे नगर परिषद असून
- गोरेगांव, सडक/अर्जुनी, अर्जुनी/मोरगांव, देवरी येथे नगर पंचायती आहे
दृष्टीक्षेपात गोंदिया जिल्हा
गोंदिया जिल्ह्यातील तहसील
- गोंदिया
- तिरोडा
- गोरेगाव
- देवरी
- आमगाव
- सालेकसा
- अर्जुनी मोरगाव
- सडक अर्जुनी
गोंदिया जिल्ह्यातील लोकसंख्या
एकूण लोकसंख्या | 13,22,507 |
एकूण पुरुषांची लोकसंख्या | 6,62,656 |
एकूण स्त्री लोकसंख्या | 6,59,964 |
लिंग गुणोत्तर | 999 |
शहरी लोकसंख्या | 2,25,700 |
ग्रामीण जनसंख्या | 10,96,631 |
शहरी लोकसंख्येची टक्केवारी | 17% |
लोकसंख्या घनता | 253 / Sq.Km. |
साक्षरतेचे प्रमाण | 84.95% |
साक्षरतेचे प्रमाण पुरुष | 83.65% |
साक्षरतेचे प्रमाण स्त्री | 69.55% |
गोंदिया जिल्हा भूगोल आणि स्थळ
- गोंदिया जिल्ह्याचे अक्षांश 20.39 ते 21.38 उत्तर आणि रेखांश 79.27 ते 80.42 पूर्वेकडे आहे.
- या जिल्ह्याचे उत्तरेस मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्हा
- असुन पुर्वे दिशेला छत्तीसगढ राज्यातील राजनांदगाव जिल्हा आहे.
- दक्षिण बाजुस महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा
- आणि पश्चिमेस चंद्रपूर जिल्हा आहे.
- जिल्हा मुख्यालय हे मुंबई-कलकत्ता रेल्वे मार्गावरील गोंदिया तालुका येथे आहे.
- गोदिया जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्रफळ 5641 चौरस किलोमीटर इतके आहे.
- जिल्हयातील 1 लाख 80 हजार 300 हेक्टर जमीन जंगलाने व्यापलेली आहे.
- सन 2011 च्या जनगणनेनूसार जिल्हयाची लोकसंख्या 13 लाख 22 हजार 507 आहे.
- अनुसूचित जातीची लोकसंख्या 1 लाख 75 हजार 961 इतकी (13.30टक्के),
- अनुसूचित जमातीची लोकसंख्या 2 लाख 14 हजार 253 इतकी (16.20 टक्के) आहे.
- शहरी लोकसंख्या 2 लाख 25 हजार 930 आणि ग्रामीण लोकसंख्या 10 लाख 96 हजार 577 इतकी आहे
- जिल्हयात गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव, आमगाँव असे 4 विधानसभा निर्वाचन आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील महत्वपूर्ण ठिकाण:
नवेगाव बांध : राष्ट्रीय उद्यान. गोंदियाच्या दक्षिणेस, अर्जुनी मोरगाव तालुक्यात 65 कि.मी. अंतरावर आहे.
नागझिरा : राष्ट्रीय अभयारण्य. गोंदियाच्या दक्षिणेस, सडक अर्जुनी तालुक्यात 30 कि.मी. अंतरावर आहे.
बिर्सी विमानतळ : गोंदियाच्या उत्तरेस 12 कि.मी. अंतरावर आहे.
अदानी वीज प्रकल्प : तिरोडा तालुक्यात 30 कि.मी. अंतरावर आहे.
- मानव विकास निर्देशांकात राज्यात गोंदिया जिल्हा 21 व्या क्रमांकावर आहे.
- मुंबई-कलकत्ता हा रेल्वेमार्ग तर मुंबई-कलकत्ता हा 6 क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जिल्हयातून जातो.
- जंगलातील तेंदूपत्ता आणि बांबू ही वनसंपदा जिल्हयातील ग्रामीणांचे उत्पन्नाचे स्त्रोत आहेत.
- ग्रॅनाईट, लोह व कॉर्थ ही खनीजे जिल्हयात उपलब्ध आहे.
- वैनगंगा ही सर्वात मोठी नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे जिल्हयातून वाहते.
- याशिवाय गाढवी, बाघ, चुलबंद ह्या नद्या सुध्दा जिल्हयातून वाहतात.
- हाजराफॉल धबधबा,
- नवेगावबांध जलाशय,
- बोदलकसा, पांगडी, चुलबंद,
- इटियाडोह, शिरपूर , कालीसराड,
- पुजारीटोला, चोरखमारा
- पूजारीटोला, कालीसरार, इटियाडोह, शिरपूर सिंचन प्रकल्प