पुणे जिल्हा संपूर्ण माहिती – Pune District Information : नमस्कार मित्रांनो आजच्या आर्टिकल मध्ये आपण पुणे जिल्ह्याचे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत पुणे जिल्हा अतिशय महत्त्वाचा विद्येचे माहेरघर असलेला जिल्हा आहे तसेच ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखला जातो पुणे जिल्ह्याचा मुख्यालय पुण्यात आहे
पुणे जिल्हा संपूर्ण माहिती – Pune District Information – pune jilha information in marathi
या जिल्ह्यांमध्ये तालुके आपण जाणून घेऊया
एकूण 14 तालुके पुणे जिल्ह्यामध्ये आहेत
- पुणे शहर
- हवेली पुणे
- खेड राजगुरुनगर
- आंबेगाव
- जुन्नर
- मावळ वडगाव
- मुळशी
- भोर
- वेल्ला
- पुरंदर
- शिरूर
- दौंड
- इंदापूर
- आणि बारामती असे एकूण 14 तालुके पुणे जिल्ह्यामध्ये येतात
पुणे जिल्हा लोकसंख्या 2011
- एकूण: ९४२६२५९
- पुरुष: ४९३६३६२
- स्त्रिया : ४४९०५९७
मित्रांनो आता आपण पुणे जिल्ह्याच्या सीमा जाणून घेऊया
- उत्तरेला व पूर्वेला अहमदनगर जिल्हा आहे
- आग्नेयेला सोलापूर जिल्हा आहे
- दक्षिणेला सातारा
- पश्चिमेस रायगड जिल्हा
- वायव्य दिशेला ठाणे जिल्हा
त्यानंतर मित्रांनो पुणे जिल्ह्यातील नद्या जाणून घेऊ
भीमा, नीरा, इंद्रायणी, मुळा , मुठा, घोड , मीना, कुकडी, पुष्पावती, पवना, रामनदी
मित्रांनो त्यानंतर आपण पुणे जिल्ह्यामधले प्रमुख धरणे जाणून घेऊ
- तर पहिला मुळशी धरण मुळा नदी वरती आहे
- नंतर खडकवासला धरण हे महत्त्वाचे धरण आहे
- पानशेत धरण
- पिंपळगाव धरण
- डिंभे धरण
- चासकमान धरण
- वरसगाव धरण
- भाटघर धरण
पुणे जिल्हया ची माहिती
पुणे जिल्ह्यातील लोणावळा खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे पुणे शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जातो तसेच पेशव्यांची राजधानी म्हणून सुद्धा ओळख आहे आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून सुद्धा ओळखले जाते भीमाशंकर भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यामध्ये आहे पुणे जिल्ह्यामध्ये अष्टविनायकापैकी मोरेगाव ,थेऊर, रांजणगाव ,लेण्याद्री , ओझर या ठिकाणी असे पाच अष्टविनायक आठ पैकी पाच अष्टविनायक जी आहे ती पुणे जिल्ह्यात आहेत
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी किल्ला आहे तेथे झालेला आहे
भीमा नदीचा उगम हा भीमाशंकर येथे पुणे जिल्ह्यामध्ये होतो
पुणे जिल्ह्यामध्ये सिंहगड पुरंदर तोरणा राजगड इत्यादी ऐतिहासिक किल्ले आहे
पुणे जिल्ह्यामध्ये ठाकर कातकरी व महादेव कोळी या आदिवासी जमाती आढळतात
पुणे जिल्ह्यामध्ये इतर सुद्धा बरेच स्थळ आहे ज्याच्या मध्ये विश्रामबागवाडा ,सारसबाग महात्मा फुले म्युझियम राजा केळकर संग्रहालय शिंदे छत्री पेशवे पार्क प्राणिसंग्रहालय फिल्म व टीव्ही इन्स्टिट्यूट नॅशनल डिफेन्स अकॅडमी
संत सोपानदेवांची समाधी सासवड ला आहे
जेजुरीला श्री खंडोबाचे देवस्थान आहे
महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र हे पुणे जिल्ह्यात आर्वी ला आहे
राजगुरूनगर हुतात्मा राजगुरूंचे जन्मगाव पुणे जिल्ह्यात आहे
जुन्नर येथे शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आणि शिवाई मंदिर आहे
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये आहे
त्याचप्रमाणे सुपे येथे मयुरेश्वर अभयारण्य आहे
जेजुरीचा खंडोबा चे भव्य मंदिर आहे
सारांश –
अशा पद्धतीने मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपण पुणे जिल्ह्याची आजच्या लेखामध्ये जाणून घेतलेली आहे अजून काही तुमच्याजवळ माहिती असेल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये शेअर करा आम्ही नक्की आर्टिकल मध्ये जोडू तरीही पोस्टला शेअर करा करायला विसरू नका धन्यवाद.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी किल्ला आहे
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे
पुणे
महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र हे पुणे जिल्ह्यात … ला आहे
आर्वी
संत सोपानदेवांची समाधी ….. ला आहे
सासवड पुणे जिल्ह्यात आहे
मयुरेश्वर अभयारण्य कोठे आहे
सुपे पुणे जिल्हा येथे मयुरेश्वर अभयारण्य आहे
पुणे जिल्ह्यातील तालुके किती ?
14 तालुके पुणे जिल्ह्या मध्ये आहेत
पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका ?
बारामती