नमस्कार मित्रानो , आज च्या या लेखात सूर्यग्रहण बाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तरीही आपण पूर्ण लेख वाचा म्हणजे आपनास सूर्यग्रहण का होतो केव्हा होतो जेव्हा ग्रहण असते तेव्हा काय करावे इत्यादी माहिती आम्ही आपणास देऊ .
सूर्यग्रहण संपूर्ण माहिती – Suryagrahan Marathi Mahiti
जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहणाबद्दल फार पूर्वीपासून नोंदी ठेवलेल्या आढळतात.
सूर्यग्रहण हे अमावस्या दिवशी दिसते. परंतु सर्वच अमावस्या दिवशी सूर्यग्रहण दिसत नाही. कारण सर्वच अमावस्या दिवशी पृथ्वीची कक्षा आणि चंद्राची कक्षा एका रेषेत येत नाहीत. पृथ्वीच्या कक्षेत आणि चंद्राच्या कक्षेत पाच अंशाचे किंवा त्यापेक्षा जास्त अंतर असते परंतु अमावस्याला चंद्राची कक्षा आणि पृथ्वीची कक्षा एका रेषेत येतात त्या अमावस्येला सूर्यग्रहण होते.
सूर्यग्रहण होण्यासाठी, खालील अटी पूर्ण केल्या पाहिजेत –
- अमावस्या किंवा पूर्णिमा असावी
- चंद्राचे रेखांश राहू किंवा केतू जवळ असावे.
- चंद्राचे अक्षांश शून्याजवळ असावे.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून सूर्यग्रहनाचे महत्व
सूर्यग्रहणचे आध्यात्मिक महत्त्व असो वा नसो, परंतु जगभरातील वैज्ञानिकांसाठी हा प्रसंग एखाद्या उत्सवापेक्षा कमी नाही. मोठमोठे संशोधक आणि खगोलशास्त्रज्ञ याची वाट पाहत असतात कारण ग्रहण ही अशी वेळ असते जेव्हा विश्वात अनेक विचित्र आणि आश्चर्यकारक घटना घडतात, ज्यामुळे वैज्ञानिकांना नवीन तथ्यांवर काम करण्याची संधी मिळते.
सूर्यग्रहण प्रकार –
१. खग्रास सूर्यग्रहण –
जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस, सूर्य चंद्रामागे गेल्यानंतर चंद्राच्या चारही बाजूंनी सूर्याची किरणे दिसतात. यांचा आकार वर्तुळाकार असतो. त्यामुळे या किरणांना तेजोवलय (Corona) असे म्हणतात.
खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी ७ मिनिटे २० सेकंद (४४० सेकंद) असतो.
२. खंडग्रास सूर्यग्रहण
जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्रामुळे झाकला जातो, तेव्हा दिसणाऱ्या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात.खंडग्रास सूर्यग्रहणात, जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये अशा प्रकारे येतो की सूर्याचा काही भाग पृथ्वीवरून दिसत नाही, म्हणजेच चंद्र सूर्याचा फक्त काही भाग झाकतो . यामुळे सूर्याचा काही भाग ग्रहणामुळे प्रभावित राहतो आणि काही भाग ग्रहणामुळे अप्रभावित राहतो, मग पृथ्वीच्या त्या विशिष्ट भागात जे ग्रहण होते त्याला आंशिक किवां खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात.
३. कंकणाकृती सूर्यग्रहण
जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळते. ह्या सूर्यग्रहणात चंद्र जास्त अंतरावर असल्यामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशावेळी सूर्याची वर्तुळाकार कडी चंद्राच्या पाठीमागे दिसते.
सूर्यग्रहण 2024
- सूर्यग्रहण वेळ 08 एप्रिल 2024
- सूर्यग्रहण सुरवात रात्री 9 वाजून 12 मिनिटे.
- सूर्यग्रहण समाप्त रात्री 1 वाजून 20 मिनिटे.
- सूर्य ग्रहण एकूण वेळ 5 तास 10 मिनिटे राहील
सारांश
आशा पद्धतीने आपण आजच्या लेखात सूर्यग्रहण बाबत माहिती जाणून घेतली आहे आपणास हा लेख आवडल्यास नक्की share करा