मराठी म्हणी व त्यांचे अर्थ – Marathi Mhani Meaning Arth : मराठी मध्ये १००० पेक्षा मराठी म्हणी सर्व परीक्षेत वारवार येणारे दर्जेदार मराठी म्हणी . आवडल्यास शेअर करा .
मराठी म्हणी व त्यांचे अर्थ – Marathi Mhani Meaning Arth
गंगेत घोडं न्हालं:
सर्व इच्छा पूर्णत्वास जाणे.
गरजवंताला अक्कल नाहि:
असहाय्य माणूस कोणाकडेही मदतीची याचना करतो.
गतं न शौच्यम:
एखादी गोष्टीचे महत्व संपल्या नंतर त्यासाठी उपाय योजना करणे व्यर्थ आहे.
गोरा गोमटा कपाळ करंटा:
नुसते दिखाऊपण काही कामाचे नसते.
गरज सरो नि वैद्य मरो:
स्वार्थी मनुष्य दुसऱ्यांचा विचार करत नाही. “Marathi Mhani with Meaning List”
गरज ही शोधाची जननी आहे:
गरजेच्या वेळी मनुष्य हर प्रकारे हवी ती गोष्ट मिळवणे.
गावात नाही झाड अन म्हणे एरंडया ला आले पान:
एखादी गोष्ट उगीचच वाढवून सांगणे.
गावात घर नाही अन रानात शेत नाही:
कफल्लक असणे, दरिद्री असणे.
गरिबान खपाव ,धनिकान चाखाव:
जीवावर कोणीही बलाढ्य दुबळ्या माणसाच्या आपला फायदा करून घेतो.
ग ची बाधा झाली:
फाजील आत्मविश्वास बळावणे.
गर्वाचे घर खाली:
गर्व असलेल्या माणसाचा पराजय होतोच.
गाढवाचा गोंधळ लाथांचा सुकाळ:
मुखं मनुष्य आपल्या वागण्याने सर्वदूर गोंधळ उडवतो.
गंगा वाहते तोवर हात धुवून घ्यावे:
जोवर लाभ घेता येतो तोपर्यंत स्वार्थ साधून घेणे.
गोगल गाय पोटात पाय:
वरून दुर्बळ वाटणारे आतून स्वार्थी असू शकतात.
गाढवं मेलं ओझ्याने अन शिगरू मेलं हेलपाट्याने:
समजदार व्यक्ती काम करत आपले जीवन व्यतित करतात तर मुर्ख मनुष्य काम न समजल्याने त्रस्त जगतो.
गाव करी ते राव न करी:
एकीचे बळ एकट्या माणसाच्या कामाच्या तुलनेत जास्त असते व त्यामुळे अशक्य गोष्टी सुद्धा साध्य होतात.
गरजेल तो बरसेल काय:
मोठमोठ्या गोष्टी करणारे लोक मुळात काहीही काम करत नाहीत.
गुरवाचे लक्ष निविद्यावर:
मनुष्य प्राण्याला स्वार्थाच्या गोष्टी लगेच कळतात.
गाढवाच्या पाठीवर गोणी कष्टकरी:
माणसाला तया कष्टा संबधित लाभ मिळत नाही तो लाभ इतरांना मिळतो.
आंधळे दळते अन कुत्रे पीठ खाते:
एकाने कष्ट करायचे अन दुसऱ्याने लाभ घ्यायचा.
आखाड्याच्या मैदानात पहिलवानाची किंमत:
माणसाला योग्य ठिकाणीच किंमत मिळते.
आंधळ्याची बहिऱ्याशी गाठ:
एकमेकांना मदत न करणाऱ्या व्यक्ती जवळ येणे.
आस्मान दावणे:
पराजय करणे.
आठ हात लाकुड, नऊ हात धलपी:
एखाद्या गोष्टीची फारच स्तुती करून सादर करणे.
आईजीच्या जिवावर बाईजी उदार:
दुसऱ्याचा पैसा दान करून स्वतः चा बडेजाव दाखविणे.
आधी जाते बुद्धी मग जाते लक्ष्मी:
आधी वर्तन बिघडते मग मनुष्य कंगाल होतो.
आलिया भोगासी असावे सादर:
आलेल्या संकटास कुरकुर न करता तोंड देणे भाग असते.
आईची माया न पोर जाई वाया:
अति लाडाने मुल बिघडते.
आकांक्षापुढती गगन ठेंगणे:
आशावाद ठेवल्यास कोणतेही लक्ष्य साध्य होते.
आयत्या पिठावर रेखोट्या मारणे:
कोणतेही काम न करता दुसर्याच्या जिवावरउपभोग घेणे.
आचार भ्रष्ट नि सदा कष्ट:
अनाचाराने वागणारा माणूस सदा दु:खी असतो.
गाढवाने शेत खाल्ले ,पाप ना पुण्य वाईट:
व्यक्तीला त्याचा वागण्याचे काहीही वाटत नाही.
गाढवापुढे वाचली गीता,कालचा गोंधळ बरा होता:
चांगले ज्ञानदिल्यावरही व्यक्तीचे वाईट वागणे.
गाढवाला गुळाची चव काय:
मूर्ख माणसाला चांगल्या गोष्टींची किंमत नसते.
गाव तिथे उकिरडा:
सर्व दूर सारखीच परिस्थिती असते.
गड आला पण सिंह गेला:
एक महत्त्वाची गोष्ट मिळवताना दुसरी महत्त्वाची गोष्ट दूर जाणे.
घरात घाण दारात घाण कुठे गेली गोरीपान:
काम न करता फक्त दिखाउपणा प्रदर्शित करणे.
घोड्यावर हौदा हत्तीवर खोगीर:
कोणताही विचार न करता विसंगत कृत्य करणे.
घरोघरी मातीच्या चुली:
सर्वदूर सारखीच परिस्थिती असते. ‘Marathi Mhani with Meaning List’
घरचा उंबरठा दारालाच माहित:
घरातील गोष्टी घरातल्या लोकांनाच माहित असते.
घोडं झालया मराया अन बसणारा म्हणतो मी नवां:
दुसऱ्याचे दु:ख न पाहता आपलाच विचार करणे.
घरात नाही एक तीळ अन मिशाला पिळ:
गरीब असताना श्रीमंतीची एट करणे.
घार हिंडते आकाशी परी तिचे चित पिल्लांपाशी:
घर प्रमुखाचे लक्ष आपल्या मुलांकडेच असते.
घोंगडे भिजत पडणे:
एखादी गोष्ट खूप दिवसापासून प्रलंबित असणे.
घरात नाही कौलान रिकामा डौल:
गरीब असताना श्रीमंतीची एट करणे.
घोडे खाई भाडे:
एखाद्या गोष्टीवर भरमसाठ खर्च होणे.
घोडामैदानजवळ असणे:
परीक्षा लवकरच होणे.
चुकलेला फकीर मशिदीत:
मनुष्य आपल्या मूळ स्थानावर परततो.
चोराच्या मनात चांदणे:
वाईट व्यक्ती कायम कुटिल डाव रचत असतो.
Mhani with Meaning
चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे:
प्रत्येकाचा दिवस असतो.
चोर नाही तर चोराची लंगोटी:
भरपूर अपेक्षा असताना अल्प लाभावर समाधान मानणे.
चोर तो चोर वर शिरजोर:
गुन्हा कबूल न करता समोरच्यास दोषी ठरवणे.
चोरावर मोर:
प्रत्येक वाईट माणसाला कधीतरी दुसरा वरचढ माणूस मिळतोच.
चमडी जाईल पण दमडी जाणार नाही:
पैश्यावर खूप प्रेम असणे, कंजूष असणे.
चांगल्या कामाचा प्रारंभ स्वतःच्या घरापासून व्हावा:
चांगली गोष्ट स्वतः पासून सुरवात करावी.
आयत्या बिळावर नागोबा:
कोणतेही काम न करता दुसर्याच्या जिवावर उपभोग घेणे.
आरोग्य हेच ऐश्वर्य:
चांगले आरोग्य ही यशाची गुरुकिल्ली आहे.
आपला तो बाब्या दुसऱ्याच ते कारटं:
स्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या चुकांविषयी बोलणे.
आपण हसे लोकाला अन घाण आपल्या नाकाला:
ज्या दोषाबद्दल लोकास हसायचे, तोच दोष आपल्यात असताना दुर्लक्ष करणे.
आसू ना मासू , कुत्र्याची सासू:
जिव्हाळा नसताना वरवर कळवळा दाखविणे.
इच्छिलेले घडते तर भिक्षुकही राजे होते:
सर्व इच्छेप्रमाणे झाले असते तर सर्व लोकं धनवान झाले असते.
इजा बिजा तीजा:
एकसारख्या होणाऱ्या घटना टाळता येत नाही.
इकडे आड तिकडे विहीर:
कोंडी होणे.
इकडे आड तिकडे विहीर:
दोन्ही बाजूनी संकटात सापडणे.
इच्छा तसे फळ:
मनात चांगले विचार ठेऊन केलेले कार्य यशस्वी होतेच.
इज्जतीचा फालुदा होणे:
अपमान होणे.
उडत्या पक्षाची पिसे मोजणे:
सहज चालता बोलता एखाद्या गोष्टीची पारख करणे.
उंटावरचा शहाणा:
मूर्ख सल्ला देणारा.
उंच वाढला एरंड तरी होईना इक्षुदंड:
छोट्या गोष्टी मोठ्यांशी बरोबरी करू शकत नाही.
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग:
एखाद्या गोष्टीसाठी खूप घाई करणे.
उंदीर गेला लुटी अन आणल्या दोन मुठी:
मनुष्य आपल्या कुवतीनुसार काम करतो.
उडाला तर कावळा बुडाला तर बेडूक:
एखाद्या गोष्टीची पारख लगेचच होत नाही त्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो.
उकिरड्याची दैना बारा वर्षांनी देखील फिटते:
गरीब व्यक्तीचे दिवस कधीही पालटू शकतात. “Marathi Mhani with Meaning List”
उचलली जीभ लावली टाळुला:
कोणताही विचार न करता बोलणे.
उघड्याकडे नागडा गेला अनं रात्रभर हिवाने मेला:
एक लहान पत असलेली व्यक्ती दुसऱ्या गरीब व्यक्तीची बरोबरी करू शकत नाही.
उचल पत्रावळी म्हणे जेवणारे किती:
मुद्द्याचे काम सोडून भलतीच चौकशी करणे.
उत्तम शेती मध्यम व्यापार नि कनिष्ठ नोकरी:
नोकरी पेक्षा व्यापार व व्यापारापेक्षा शेती उत्तम आहे.
उचलली जीभ लावली टाळ्याला:
बेताल बोलणे.
उधार तेल खावत निघाले:
उधारीच्या मालत काही न काही दोष असतो.
उपसा पसारा मग देवाचा आसरा:
आधी कामा करावे मग देव देव करावे.
उडदामाजी काळे:
बेरे चांगल्या गोष्टी सोबत वाईट गोष्ट असु शकते.
उसाबरोबर एरंडाला पाणी:
एखाद्या गोष्टीचा लाभ अनपेक्षितरीत्या दुसऱ्या जवळच्या गोष्टीला होतो.
उपट सूळ, घे खांद्यावर:
नसते लचांड पाठीमागे लावून घेणे.
एक घाव दोन तुकडे:
एका फटक्यात निकाल लावणे.
एकादशीच्या घरी शिवरात्र:
दरिद्री माणसाचा दुसऱ्या दरिद्री माणसाचा उपयोग होत नाही.
एका पुताची माय वळचणीखाली जीव जाय:
एक मुलगा पोटी असून सुद्धा तोआईला सुखाने जगू देत नाही.
एका म्यानात दोन तलवारी राहत नाही:
लोकात एकदा की नाचक्की झाली की लोकं त्याच दृष्टीने पाहतात.
एका कानाचे दुसऱ्या कानाला कळत नाही:
अत्यंत गुप्तपणे आपले कार्य करणे.
एकदा की नाव कानफाट्या पडले की पडलेच:
लोकात एकदा की नाचक्की झाली की लोकं त्याच दृष्टीने पाहतात.
एकी हेच बळ:
एकत्र समुदाय कायम जिंकतो.
एका दगडात दोन पक्षी मारणे:
एकाच कार्यात दोन काम करणे.
एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात
दोन मार्गांवर हात ठेऊन चालणे.
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास:
आधीच हौशीने केलेलं काम अन त्याला अनुकूल परिस्थिती निर्माण होणे.
आपला हात जगन्नाथ:
आपली उन्नती आपल्यावरच अवलंबून असते, आपल्या हातात अधिकार आला तर त्याचा दुरुपयोग करून जिन्नस लाटणे.
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन :
अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होणे.
आभाळ फाटल्यावर त्याला ठिगळ कसे लावायचे:
मोठे संकट आले की बचाव करणे अवघड असते.
आगीतून निघून फुफाट्यात पडणे:
एका संकटातून निघून दुसर्या संकटात सापडणे.
आजा मेला नि नातू झाला:
एकीकडे फायदा तर दुसरीकडे तोटा होणार.
आपल्या गल्लितच कुत्रे शिरजोर:
आपल्या भागात आपला वरचष्मा ठेवणे.
चार आण्याचा मसाला बारा आण्याची कोंबडी:
एखाद्या छोट्या गोष्टीची किंमत कमी आणि इतर खर्च खूप जास्त असणे.
चढेल तो पडेल:
फार गर्व केला तर पराजय निशित असतो.
चतुर्भुज करणे:
अटक करणे.
चोरीचा मामला हळू हळू बोंबला:
वाईट गोष्ट सर्व बाजूंनी झाकण्याचा प्रयत्न होतो.
चतुर्भुज होणे:
लग्न करणे.
चुकणे हा मानवाचा धर्म आहे:
मनुष्य प्राणी हा चुकू शकतो.
चोराच्या उलट्या बोंबा:
गुन्हा कबूल न करता समोरच्यास दोषी ठरवणे.
चिंती परा ते येई घरा:
वाईट चिंतन केले की तशीच घटना आपल्या आयुष्यात घडते.
चोराच्या वाटा चोरालाच माहीत:
वाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तीस त्याचे मार्ग व स्त्रोत माहिती असतात.
चोर सोडून संन्याश्याला फाशी:
अपराधी व्यक्तीस दंड न करता निष्पाप व्यक्तीला त्रास देणे.
चालत्या गाडीला खीळ घालणे:
एखाद्याच्या चांगल्या कामात व्यत्यय आणणे.
मराठी म्हणी
चकाकते ते सोने नसते:
बडेजाव करणारे सर्वजण श्रीमंत नसतात.
चांभाराची नजर जोड्यावर:
आपआपल्या व्यवसाया संबधित गोष्टींकडे मनुष्य अधिक रस घेऊन अवलोकन करतो.
छत्तीसाचा आकडा:
विरुद्ध मत असणे.
छडी लागे छमछम विद्या येई घमघम:
कठीण परिश्रम व दंड यामुळेच यश मिळते.
ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल:
वाईट कृत्य स्वतःलाच भोगावे लागते. ‘Marathi Mhani with Meaning List’
ज्याचा कंटाळा त्याचा वानोळा:
जी कंटाळवाणी बाब असते तीच स्वीकारावी लागणे.
ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नक्कल:
मुर्ख माणसाची सर्वत्र उपेक्षा व टिंगल होते.
जिथे कमी तेथे आम्ही:
पडेल ते काम करून समोरच्यास हातभार लावणे.
जाळा वाचून नाही कढ,माये वाचून नाही रड जावे त्याचा वंशा,तेव्हा कळे:
एखाद्या व्यक्तीचे दु:ख त्याच्या जवळ गेल्यावर कळते.
जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला:
आपले काम दुसऱ्यावर ढकललेतर अपयश येते, कष्ट करणाऱ्या व्यक्तीस काही कमी पडत नाही.
जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी:
एखद्या ठिकाणी लाभ असता तिकडे विशेष लक्ष्य देणे.
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही:
वाईट व्यक्तीची वाईट सवय कधीही जात नाही.
ज्याची मिळते पोळी त्याची वाजवावी टाळी:
आपल्या मालकाचे गुणगान करणे.
जखमेवर मीठ चोळणे:
आधीच त्रस्त असताना परत त्याच गोष्टीविषयी त्रास देणे.
जशी नियत तशी बरकत:
आपले यश आपल्या चांगल्या विचारांवर अवलंबुन असते.
जो श्रमी त्याला काय कमी:
कष्ट करणाऱ्या व्यक्तीस काही कमी पडत नाही.
जशी कामना तशी भावना:
आपण जसे चिंतन करतो त्याप्रमाणे आपले विचार बनतात.
ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल:
वाईट कृत्य स्वतःलाच भोगावे लागते.
जळत घर भाड्याने कोण घेणार?:
संकटग्रस्त गोष्ट कोणालाच आवडत नाही.
जशास तशे:
समोरच्या व्यक्ती व्यवहारानुसार आपला व्यवहार ठरवावा.
ज्याचंजळतं त्यालाच कळतं:
आपले दु:ख आपल्यालाच सोसावे लागते.
जावयाचं पोर हरामखोर:
माणसाची प्रवृत्ती आपल्या स्वार्थ साधण्यासाठीच असते.
जात्यातले रडतात आणि सुपातले हसतात:
दुसऱ्यांना हसताना विचार करणे क्रमप्राप्त आहे, काही दिवसांनी तशी वेळ आपल्यावरही येऊ शकते.
जसा गुरु तसा चेला:
एका प्रमुख व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाल त्या व्यक्तीच्या स्वभावचेच लोक निर्माण होतात.
जेथे पिकतं तिथे विकतं नाही:
एखादी गोष्ट विपुल प्रमाणात असलेल्या भागात त्या गोष्टीचे महत्त्व राहत नाही.
जो खाईल आंबा तो सोशेल ओळंबा:
एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना त्याचे दोष स्वीकारावे.
ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी:
एका प्रदेशात सर्व गुणधर्माचे लोकं राहतात.
ज्याचंजळतं त्यालाच कळतं:
आपले दु:ख आपल्यालाच सोसावे लागते.
ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नक्कल:
मुर्ख माणसाची सर्वत्र उपेक्षा व टिंगल होते.
झाकली मूठ सव्वा लाखाची:
दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत.
झाकली मूठ सव्वा लाखाची:
दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत.
झाडाजवळ छाया अन बुवाजवळ बाया:
थोडे आमिष दाखविले तरी मनुष्याची धाव तिकडेच असते
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नही:
कष्टाशिवाय यश मिळत नाही.
ठेवीले अनंते तैसेची राहावे:
जी परिस्थिती आहे त्यात समाधान मानावे. Marathi Mhani
ठकास महाठक:
प्रत्येक वाईट माणसाला त्यापेक्षा वरचढ माणूस मिळतोच.
डोंगर पोखरून उंदीर कढणे:
जास्त श्रम करून कमी फायदा होणे.
डोळ्यात अंजन घालणे:
एखाद्यास दिवसाढवळ्या विश्वासघात करुन फसविणे.
डल्ला मारणे:
दुसऱ्याची वस्तू चोरणे.
ढवळ्या शेजारी बांधला पावळया, वाण नाही पण गुण लागला:
दोन व्यक्तींना सोबत राहताना एकमेकांच्या सवयी लागणे.
ढवळ्या जातो आणि पवळ्या येतो पण सावळा गोंधळ तसाच राहतो:
कारभारी व्यक्ती बदलली तरी फारसे बदल होत नाही अन तोच तो गोंधळ उडतो.
ताकास तूर न लागू देणे:
मनातील गोष्ट न सांगणे.
तू राणी मी राणी पाणी कोण आणी:
दोन सुकुमार ,नाजूक व्यक्ती कधीही काम करत नाही, असे व्यक्ती जवळ आल्यास एकमेकांचा एकमेकांना फटका बसतो.
तहान लागल्यावर विहीर खोदणे:
गरज लागल्यानंतरच एखाद्या गोष्टीसाठी तयारी करणे.
तुझी दाढी जळू दे पण माझी वीडी पेटू दे:
दुसऱ्याचे नुकसान झाले तरी चालेल पण स्वतःचा स्वार्थ साधणे.
ताक कुंकून पिणे:
प्रत्येक छोटी गोष्ट सुद्धा काळजीपूर्वक करणे.
तीन तिघाडा काम बिघाडा:
एखादे काम भरपूर जणांनी लक्ष केंद्रित करून केले तर अपयश येऊ शकते.
तळ्यात मळ्यात करणे:
मनाची अवस्था अस्थिर असणे.
तोबरयाला पुढे ,लगमला मागे:
फायद्याचा वेळी पुढे पुढे ,कामाच्या वेळी मात्र मागेमागे.
ताकापुरते रामायण:
एखादी गोष्ट मिळेपर्यंत संवाद साधणे. स्वार्थ साधल्यावर तडक निघून जाणे.
ताकास जाऊन लोटा लपवणे:
एखादी गोष्ट इच्छा नसतांना लपविणे.
तेल गेले तूप गेले हाती आले धुपाटणे:
एकाच दोन वेगवेगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यावर दोन्ही गोष्टींचा लाभ न होणे.
तरण्याला लागली कळ अन म्हातारयाला आल बळ:
तरुण माणूस आळशी असतो.
मराठी म्हणी व त्यांचे अर्थ
तळ हाताने सूर्य झाकला जात नाही:
छोट्या गोष्टीनी फार मोठे व थोर बाबी दडवता येत नाही.
आज अंबरी उद्या झोळी धरी:
कधी थाटामाटात तर कधी दरिद्री राहणे.
आपण शेण खायचं अन दुसऱ्याच तोंड हुंगायच:
स्वतः वाईट कर्म करायचे अन दुसऱ्यावर संशय घ्यायचा.
आले अंगावर घेतले शिंगावर:
संकटाचा सामना धैर्याने करावा.
एक नूर आदमी दस नूर कपडा:
माणसाचा रुबाब नीटनेटक्या पोशाखाने वाढतो.
एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला:
एकाच माणसाचा भरपूर लोकाना त्रास होणे.
एक ना धड भारभार चिंध्या:
अनेक गोष्टी अपूर्ण करून , कोणत्याही गोष्टी पूर्ण न करणे.
एकावे जनाचे करावे मनाचे:
सर्वांचे विचार एकूण आपला स्वतःचाच निर्णय घ्यावा.
एका कानावर पगडी घरी बाईल उघडी:
बाहेर श्रीमंतीचा आव आणायचा व घरी दारिद्र्यात राहणे.
एकाने गाय मारली तर दुसऱ्याने वासरू मारू नये:
एकाने वाईट गोष्ट केली तर आपल्यालाही वाईट गोष्ट करण्याचा हक्क पोहोचत नाही.
एका हाताने टाळी वाजत नाही:
दोष दोन्हीकडे असतो.
एकटा जीव सदाशिव:
एकटा माणूस चिंतामुक्त अन सुखी असतो.
एरंडाचे गुर्हाळ:
एखादी गोष्ट लांबलचक व कंटाळवाणी असणे.
एका माळेचे मनी:
सर्वजण येथून तेथून सारखे.
एका कानाने एकवे दुसऱ्या कानाने सोडून द्यावे:
ऐकलेल्या सगळ्याच गोष्टींचा विचार करणे व्यर्थ आहे.
एका हाताने टाळी वाजत नाही:
भांडणात एकाचीच चुकी नसते, प्रत्येकाची थोडी चूक असतेच असते.
एक पाय मोडल्याने गोम लंगडी होत नाही:
एकसारखे अनेक स्त्रोत उपलब्ध असता काम थांबत नाही किंवा श्रीमंत व्यक्तीचा काही पैसा खर्च झाला तरी त्याचा परिणाम होत नाही.
एकादशी अन दुप्पट खाशी:
नियमांच्या विरुद्ध वर्तन करणे दरिद्री माणसाचा उपयोग होत नाही.
ऐकावे जनाचे पण करावे मनाचे:
दुसऱ्यांचे न ऐकता स्वतःचे निर्णय स्वतःघेणे.
ऐतखाऊ लांडग्याचा भाऊ:
कष्ट न करण्याची सवय असलेला मनुष्य कुठेही आयते खायला मिळाले की डल्ला मारतात.
ओठात एक नि पोटात एक:
प्रकट करताना विचार वेगळे अन मनात काही वेगळेच विचार.
ओसाड रानात एरंडाचा उदो उदो:
अशिक्षित गावात कमी शिकलेला माणूस विद्वान ठरतो.
ओठी तेच पोटी:
बोलावे तसे वागावे, सरळमार्गी माणूस.
ओळखीचा चोर जीवे मारी:
एखाद्याला आपण गुन्हा करताना पाहिल्यास तर तो आपल्या जिवावर उठतो.
ओढाळ गुराला लोढणे गळ्याला:
गुन्हेगाराला कायद्याचा वाचक बसावयास हवा.
ओ म्हणता ठो येईना:
कसलेही ज्ञान नसणे, लिहिता वाचता न येणे.
ओल्याबरोबर सुके जळते:
दुष्टांच्या बरोबर राहिल्याने सज्जन माणसास ही त्रास होतो.
औषधा वाचून खोकला गेला:
परस्पर संकट टळले.
कोंबड झाकलं तरी तांबड उगवल्या शिवाय राहत नाहीलपत नाही: Marathi Mhani with Meaning List
सत्यकधीही लपत नाही.
कुन्हाडीचा दांडा गोतास काळ:
दुसऱ्यांना इजा करताना आपल्यालाही इजा होऊ शकते.
कानामागून आली तिखट झाली:
नवीन आलेली व्यक्ती लवकरच यशस्वी होणे.
कावळा बसायला अन फांदी तुटायला एकाच घात:
योगायोगाने एखादी गोष्ट घडून भलत्याच गोष्टीचा संबंध वेगळ्याच गोष्टीला लावणे.
केव्हाच नाही त्यापेक्षा उशीर बरा:
अशक्य गोष्ट उशीरा हाती घेतलेली बरी.
कधी तुपाशी तर कधी उपाशी:
पैसा असला तर चंगळ करायची नाही तर उपाशी राहायचे.
काम न धंदा, हरी गोविंदा:
रिकामटेकडा मनुष्य फक्त बडबड करण्यात आपला वेळ घालवतो.
करवंदीच्या जाळीला काटे:
चांगल्या वस्तूबरोबर वाईट गोष्टींचा सामना करावयास लागायचाच.
करून करू भागले अन देवपूजेला लागले:
वाईट गोष्टींचा वीट आल्यावर चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करणे.
आंधळ्या प्रजेत हेकणां राजा:
असहाय्य गरीब लोकांमध्ये एखादा चुकीचे निर्णय घेऊन राज्य करतो.
कुठे राजा भोज कुठे गंगुतेली:
बलाढ्य माणूस आणि दुर्बळ यांची तुलना होऊ शकत नाही.
कोल्हा काकडीला राजी:
लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात.
काट्यावाचून गुलाब नाही:
चांगली गोष्ट कठीण परीश्रमाने मिळते.
कुठे इंद्राचा ऐरावत कुठे शामभट्टाची तट्टाणी:
माणसाची तुलना दुर्बळ माणसाशी होऊ शकत नाही.
काविळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते:
आपणास ज्या गोष्टी जसे विचार करतो तश्याच वाटतात.
कुंपणानेच शेत खाणे:
रक्षणकर्त्यानेच नुकसान करणे.
कशात काय अन फाटक्यात पाय:
बडेजाव दाखविला तरी उपयोग नसतो.
काखेत कळसा गावाला वळसा:
जवळ असलेली वस्तू सर्वदूर शोधणे.
कसायाला गाय धार्जिणी:
गुंडांच्या पुढे लोकं नमतात व पुढे पुढे करतात.
काय ग बाई उभी घरात:
दोघी तिघी घरात काम करणारे पुष्कळ वाढले की प्रत्येकजण कामचुकारपणा करू लागतो.
कुसंतानापेक्षा नि:संतान बरे:
वाईट मुले पोटी जन्मल्यापेक्षा मुले जन्मालान आलेली चांगली.
कर्कशेला कलह तर पद्मिनीला प्रीती गोड:
दुष्ट स्त्रीला भांडणे आवडतात तर गुणवतीला प्रेम आवडते.
कोळसा उगाळावा तेवढा काळा:
वाईट व्यक्तीचा अनुभव कायम वाईट असतो.
काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही:
खरी मैत्री आगंतुक कारणाने तुटत नाही.
करायला गेले गणपती अन झाला मारुती:
जे करायचे ते नित समजून करावे नाही तर भलतेच घडते.
करायला गेलो एक आणि झाले भलतेच:
चांगले करायला गेले तरी वाईट घडणे.
काळी बेंद्री एकाची अन सुंदर बायको लोकाची:
सर्वाना आपल्या गोष्टीपेक्षा इतरांच्या चांगल्या आहेत असे वाटते.
कर नाही त्याला डर कशाला:
दोषी नसताना कसलेही भय राहत नाही. Marathi Mhani
कुंपणानेच शेत खाणे:
रक्षणकर्त्यानेच नुकसान करणेबलाढ्य.
काकडीची चोरी अन फाशीची शिक्षा:
थोड्याश्या अपराधानंतर फार मोठी शिक्षा करणे.
काम नाही घरी अन सांडून भरी:
काम नसताना उगाच काम निर्माण (वाढवून तेच काम परत परत करणे.
कळते पण वळत नाही:
चांगल्या गोष्टी कृतीत आणता येणे कठीण आहे.
कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच:
वाईट व्यक्तीची वाईट सवय कधीही जात नाही.
क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे:
अधिक बोलण्या पेक्षा काम करणे चांगले असते.
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही:
दुर्जन व्यक्तीच्या चिंतनाने चांगल्या माणसाचे नुकसान होऊ शकत नाही.
वागावेच लागते कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी:
सर्वाना प्राप्त परिस्थितीनुसार वागावेच लागते.
कुहाडीचा दांडा गोतास काळ:
आपल्या जातभाईंचे नुकसान होणे.
कठीण समय येता कोण कामास येतो:
आपल्या अडचणीच्या वेळेस कोणीही मदतीला येत नाही.
कुठेही जा पळसाला पाने तीनच:
सर्वत्र परिस्थिती सारखीच असते.
करून गेला गाव अन दुसऱ्याचेच नाव:
एकाने केलेल्या गुन्ह्याचा आरोप दुसऱ्यावर ठेवणे.
करंगळी सुजली तर डोंगरा एवढी होईल काय:
छोट्या माणसाला थोर माणसाची बरोबरी करणे अशक्य आहे.
करीन ती पूर्व :
गी असे कर्तुत्व असावे की जे ठरविले ते घडून आलेच पाहिजे.
केली खाता हरखले व हिशेब देता कचरले:
कोणताही विचार न करता कर्ज करायचे व देणी वाढली की काळजी करायची.
कवड्यांचे दान केले अन गावात नगारे वाजविले:
दान छोटे करून इतर लोकांना महती सांगत फिरणे.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती:
प्राणांतिक संकटातून वाचणे.
कोल्हयाला द्राक्षे आंबटच:
न मिळणारी गोष्ट आवडत नाही असे दर्शवीणे.
खायला काळ भुईला भार:
ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो.
खायला काळ भुईला भार:
ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो.
आलिया भोगासी असावे सादर:
आलेल्या संकटास कुरकुर न करता तोंड देणे भाग असते.
आपलेच दात अन आपलेच ओठ:
आपल्या माणसांनी आपल्याच माणसाना त्रास देणे.
आधी करावे मग सांगावे:
कार्य तडीस गेल्याशिवाय त्याबद्दल उगाच बोलू नये.
आधी पोटोबा मग विठोबा:
अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे.
आई जेवू घालीना बाप भिक मागू देईना:
दोन्हिकडून संकटात सापडणे.
आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार:
एखादी गोष्ट अस्तित्वात नसतांना त्याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
आठ हात काकडी नउ हात बी:
एखाद्या गोष्टीची फारच स्तुती करून सादर करणे.
आधणातले रडतात अन सुपातले हसतात्त:
दुसऱ्यांना हसताना विचार करणे क्रमप्राप्त आहे, काही दिवसांनी तशी वेळ आपल्यावरही येऊ शकते.
खिशात नाही दमडी अन बदलली कोंबडी:
ऐपत नसताना बडेजाव दाखविणे.
खायला कोंडा निजेला धोंडा:
अत्यंत दारिद्य असणे.
खाता पिता दोन लाथा:
कायम धाकात ठेवणे.
खाई त्याला खव खवे:
ज्यांनी चोरी केली अस्वस्थ होतो.
खाल्ल्या मिठाला जागणे:
मालकाशी प्रामाणिक राहून संकट काळी मदत करणे.
खाजवून खरुज काढणे:
एखाद्याची उगाचच कुरापत काढणे.
खाण्याराला चव नाही रांधणारयाला फुरसत नाही:
एखाद्या गोष्टीची मागणी वाढली की ती गोष्ट मुक्तपणे सहन करणे भाग असते.
खिळ्यासाठी नाल गेला अन नालीसाठी घोडा:
व्यवस्थित नियोजन नसल्याने अपरिमित नुकसान होणे.
खाली मुंडी पाताळ धुंडी:
स्वभावाने गरीब वाटणारा मनुष्य ही धोकेदायक असू शकतो.
खतास महाखत:
प्रत्येक वाईट माणसास दुसर वरचढ माणूस मिळतोच.
खाल्ल्या घराचे वासे मोजणे:
ज्या घरात राहतो त्याच घराशी बेईमानी करणे.
खिशात न्हाई आणा, अन ह्याला बाजीराव म्हणा:
गरीब मनुष्यास कोणीही कीमत देत नाही.