Marathi Katha – पत्नी विनाला एक कानफळीत लगावली
मराठी कथा – Marathi Stories – पत्नी विनाला एक कानफळीत लगावली..
खटक खटक करत दार उघडत विजयने आपल्या पत्नी विनाला एक कानफळीत लगावली
अचानक पडलेल्या थापडमुळे विना जमिनीवर कोसळली
हे बघून तिची दोन वर्षाची मुलगी तिला पकडून रडू लागली
तिने गालावर हात ठेवून विजयला म्हटले असं मी काय केलं
विजयने दात खात व रागात म्हटले विना तुला मी सांगितले होते ना की पार्टीमध्ये कोणाशी काहीच बोलू नये तरी तू तिथे तोंड उघडलंच
अनपड कुठली तुला काही समजत नाही का , तुला काहीच वाटत नाही माझी पूर्ण बेइज्जत झाली तुझ्या मुळे
अचानक गालावर थापड पडल्याने विना एकदमच दचकली होती
तिच्या डोळ्यात अश्रू आले होते
तिला कळत नव्हते की चूक काय झाली
अश्रु पुसत तिने पुन्हा विचारले मी काय केलं हो
विजयने रागात तिला म्हटले मी केलं काय अजून विचारते तुला मी आधीच सांगितलं होतं की तिथे एक शब्द सुद्धा बोलायचं नाही
इंग्रजीत बोलता येत नव्हते तर गप्प बसावे तो रागत म्हणाला
तेव्हा विनाला लक्षात आले की तिने विजयचा मित्र आशिष च्या पत्नीसोबत ती मराठीत बोलत होती
कारण विनाला इंग्रजी बोलायला येत नव्हते गावातल्या कॉलेजमधून तिने बीए पास केले
विनाचे लग्न तिच्या मोठ्या वडिलांनी त्यांचा जवळचा मित्राचा मुलगा विजय सोबत लावून दिले होते
विजयला सरकारी नोकरी होती विनाची आई गृहिणी होत वडील शेतकरी होते
एक सर्वसामान्य घरातून ती होती
आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती
विजय च्या घरच्यांनी मोठा हुंडा घेऊन हे लग्न लावण्यास तयार झाले होते तशी विना खूप सुंदर व घर परिवार सांभाळणारी व सामाजिक मुलगी होती
या विरुद्ध विजय चा व्यवहार खूपच रागीट व तो खूप अहंकारी होता
त्याला आपल्या पदाचा व प्रतिष्ठेचा खूप जास्त घमंड होता
तो त्याच्यासमोर कोणाला काहीही समजत नव्हता खास करून त्याची पत्नी विनाला तो नेहमी तो आपल्या पायाची चप्पल समजत असे त्याच्या करिता पत्नी फक्त घरचे काम आणि शरीर सुख देण्याची वस्तू होती
तो नेहमी तिला आपल्या दबावत ठेवत असे त्यांच्या लग्नाला तीन वर्षे झाले होते असा कोणता दिवस नव्हता ज्या दिवशी त्याने विनाला टोकले नसेल
तो नेहमी तिला तो अपमानित करीत असे
छोट्या मोठ्या कारणावर तो विनाच्या गालफडीत मारायला मागे पुढे पाहत नव्हता
रोजच्या या मारपेटीमुळे विना खूप जास्त त्रासली होती
परंतु आज तिने ठरवले होते की आता खूप झाले आता अजून नाही मी सहन करणार तिने स्वतःला सांभाळले व डोळ्यातून अश्रू पुसून तिने तिच्या पती विजयला विचारले
हो मला नाही येत इंग्लिश फडफड बोलता
परंतु यामुळे काही माझं अस्तित्व कमी होतं का
विनाचे म्हणणे ऐकून विजयने पुन्हा तिचे केस ओडत म्हटले
तू खूप बोलायला लागली आहे कान उघडून ऐक दोन कवळीची तुझी किंमत नाही
तुझा कोणत स स्वतःचं अस्तित्व नाही ज्या दिवशी मी तुला सोडून देईल त्या दिवशी तू घरोघरी जाऊन लोकांचे भांडी व धुणे साफ करशील
तेव्हा तू पोट भरू शकशील व सन्मान तर तू विसरूनच जा कारण घटस्फोटीत महिलेला समाज कधीच सन्मान देत नसतो
तू माझी बायको आहे एक सरकारी ऑफिसर ची म्हणून लोक तुला मान सन्मान देतात आणि हीच तुझी ओळख आहे
दोन वर्षाच्या मुलीला कुशीत घेऊन विना म्हणाली तर मी मागील तीन वर्षापासून धोक्यात होती मला वाटले की तुम्ही माझ्यावर प्रेम करता
व तुम्ही एक ना एका दिवशी माझं प्रेम समजून घ्याल व मी तुम्हाला प्रेमाने बदलून टाकीन
कारण पती–पत्नी मिळूनच संसार चा गाडा चालत असतो
परंतु मी चूक होते मला काय माहित तुम्हाला प्रतिषठा जास्त महत्वाची आहे बायको पेक्षा मी जात आहे नेहमी करिता तुमच्या लाईफ मधून
आता तुम्ही तुमच्या स्टॅंडर्डची दुसरी बायको करून घ्या मी घटस्फोट चे पेपर तुम्हाला पाठवून देईल
असे म्हणून विना परत आपल्या गावी आई–वडिलांजवळ निघून गेली
विपरीत परिस्थिती मध्ये सुद्धा विनाने कधी समाजासमोर हार मानली नाही समाज चे बोलणे ऐकत विना आता सामाजिक कार्य मध्ये सक्रिय झाली होती
व आपले दुःख ती आता डायरीत लिहू लागली परंतु सूर्याला ज्याप्रमाणे काळे ढग जास्त वेळ पर्यंत झाकु नाही शकत तसंच काही विनासोबत घडलं
त्याचप्रमाणे विनाची प्रतिभा सुद्धा समाजापासून लपून किती दिवस राहू शकत होती विनाला सुद्धा प्रसिद्धी मिळाला लागली
पूर्ण वीस वर्षानंतर खूप मेहनती नंतर आज विना आणि विजय पुन्हा एकदा समोर आले होते
मागच्या संपूर्ण कडू आठवणी ताज्या झाल्या होत्या खूप गर्दी होती सभागृहामध्ये जोर्यात टाळ्या वाजत होत्या आज विनाच्या कामाचं सन्मान महामहीम राष्ट्रपती यांच्या हस्ते होतं
महिलांसाठी सामाजिक सुधार व स्वयंरोजगार सोबत घरेलू हिंसा या करिता तिने खूप चांगलं काम केलं होतं म्हणून तिला हा सन्मान प्राप्त झाला होता
मराठी मध्ये सर्वांसोबत मिळून मिसळून बोलत होती
गर्दीत विजय हात बांधून सर्वात मागे उभा होता
डोळे खाली करून विजय ला आज लक्षात येत नव्हते की जिला त्याने अनपड समजले होते ती तर खूप प्रतिभावान व प्रसिद्ध लेखिका तसेच सामाजिक कार्यकर्ता म्हणून सामोर आली होती
त्याला विनाला शुभेच्छा देण्याकरिता सुद्धा मनामध्ये संकोच येत होता तेव्हा एक पत्रकार समोर गेला व त्यांनी विनाला इंग्लिश मध्ये एक प्रश्न विचारला तेव्हा विनाने म्हटले मला इंग्रजी येत नाही कृपया मला तुम्ही मराठी मध्ये प्रश्न विचारा
पत्रकार म्हणाला माफ करा मॅडम मी माझा प्रश्न आपणास मराठीत विचारतो
त्याने प्रश्न विचारला मॅडम तुमच्या मनात सामाजिक सेवा करण्याचा विचार कसा काय आला
आपल्या सफलतेचे श्रेय आपण कोणाला द्याल
आज जेव्हा लोक इंग्लिश मीडियम मध्ये आपल्या मुलांना शिकवत आहे व व तुम्ही मराठी मध्ये लिहिता तुम्हाला कधी याबाबत भीती वाटत नाही का ?
तेव्हा ती म्हणाली मला मराठी बोलण्यात लिहिण्यात अजिबात कमीपणा वाटत नाही व मराठी ही माझी मातृभाषा आहे व सर्वांनाच मराठी येत आणि लोकांना ते सहज समजते
आपणा सर्वांना ठाऊक आहे परिस्थिती पेक्षा मोठा गुरु कोणी नसतो कठीण परिस्थिती या आपणास मजबूत बनवीते म्हणून मी त्या व्यक्तीची मनापासून आभार व्यक्त करते
जाने मला त्याच्या जीवनातून घरातून मुक्त केले व माझा स्वाभिमान जागवला ते व्यक्ती माझ्या जीवन चे असे गुरु आहे त्यांनी दिलेल्या घावांमुळे माझ्या मधल्या आत्मविश्वास जागृत झाला
जीवनामध्ये नवीन दिशा व काहीतरी करण्याची जिद्द निर्माण झाली
ज्यांच्यामुळे मी आपल्या संकुचित नात्यांमधून मुक्त झाली व समाज मध्ये येऊन सामाजिक कार्य करण्याची मला प्रेरणा मिळाली
सोबत माझ्या आई–वडिलांचा मला आशीर्वाद होताच परंतु खरी ठेच मला त्या व्यक्तीमुळेच लागली होती म्हणूनच मी त्यांचे आभार मानते
तसेच प्रत्येक पुरुष व स्त्रीला हे सांगू इच्छिते की यशात मध्ये कधीही भाषा हे अडचण नसते व मराठी तर ही आपली महाराष्ट्राची मातृभाषा आहे त्यामुळे असा विचार करणे मुळातच मूर्खपणा आहे
जीवनात ज्यांना सफल व्हायचं आहे त्यासाठी आवश्यक असते ती म्हणजे चिकाटी आणि जिद्द थोड्या वेळानंतर विनाला एकटे बघून विजय तिच्या समोर येऊन उभा राहिला
विना आपली मुलगी कशी आहे आता तर ती मोठी झाली असेल व माझी मुगली छान आहे व ती अभ्यासासोबत मला सुद्धा सामाजिक कार्यात मदत करते
विजय म्हणाला विना तू अशी का बर म्हणत आहे ती माझी सुद्धा मुलगी आहे मला माफ करून दे मी तुला समजू शकलो नाही
तू गेल्यानंतर मी माझ्या ऑफिस मधील एका महिलेसोबत लग्न केले मला आता दोन मुलं सुद्धा आहेत परंतु आता माझी काहीच किंमत नाही तिथे
व कोणीच माझा सन्मान करत नाही
माझी बायको मला लहान लहान गोष्टीवरून धमक्या देते तसेच माझी नोकरी घालवायची भीती देत राहते व मला चुपचाप तिचे ऐकावे लागते
गुपचूप उभी गोष्टी ऐकत होती व शेवटी त्याला हात जोडून सांगितले महोदय मी असह्य लोकांची मदत करते परंतु आपण स्वतः सक्षम आहात
मी आपली कोणती सहायता करू शकत नाही तेवड्यात विनाची मुलगी तेथे आली व आपल्या मुलीला घेऊन तेथून निघून गेली विजय चुपचाप मान खाली करून पाहत राहिला
तो तिला जाताना बघत होता परंतु तो आज निराश होता व विना ही मजबूत होती
तरी मित्रांनो आपणासही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक आणि ह्या कथेला तुमच्या मित्रांना शेअर सुद्धा करा धन्यवाद