मुख्यपृष्ठ तोडगे व उपाय | Todge Ani Upay In Marathi - स्वामी समर्थ तोडगे तोडगे व उपाय | Todge Ani Upay In Marathi - स्वामी समर्थ तोडगे By -Shweta K १३ फेब्रुवारी 0 तोडगे व उपाय | Todge Ani Upay In Marathi : श्री स्वामी समर्थ ,आपणा करिता काही तोडगे व उपाय येथे उपलब्ध करून देत आहोत आवडल्यास नक्की शेअर करा १. गोराचनचा टिळा लावणे किंवा हळद, केशर यांचा टिळा लावण्यामुळे श्रीमंती येते.२. गोराचनचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी.३. छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यात अल्पसे सोने ठेवावे. रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून त्यानंतर श्वास ओढून पूर्णांगाच्या हाताने अंगठा व अनामिकेच्या सहाय्याने आपणांस त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी. नंतर सोने उचलून कपाळी लावावे व हवी असलेली रक्कम मागावी.४. वायव्य दिशेला – राधाकृष्ण , लक्ष्मीचा फोटो लावावा.५. घरातील सर्व देवांना हळ्कुंडाची माळ घालणे.६. रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करु नये दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी.७. व्यापाऱ्यांनी वापरावयाच्या पैशांचा पाऊच किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी.८. बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत. दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले, मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी. वा शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते. मंगळवारी पैसे/कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाहीत.९. संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये. तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे/घेणे व्यवहार करू नये.१०. सूर्यास्ताअगोदर मोठी खरेदी करावी,सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते.११. दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्त्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राती होते.१२. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी. म्हणजे ती पूजा पूर्ण होते.१३. पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेशास एक लाल फुल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृध्द भिकाऱ्यास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे. म्हणजे यश मिळते.१४. घरात मनीप्लँट लावू नये. पैशाची चणचण भासते.१५. ‘श्री स्वामी समर्थ’ हा जप घरातल्या सर्वांनी किमान १०८ वेळा म्हणावा. कोणाही एका व्यक्तीने रोज एक हजार जप करावा. धनलाभ होतो.१६. लक्ष्मीप्राप्तीचा सोपा आणि अनुभवसिध्द उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे. अनेकांना अनुभव आला आहे.१७. घरातून कामानिमित्त्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडेतरी पैसे ठेवावेतच. मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये. पैसा पैशाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे.१८ घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये.१९. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा. घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी (लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा) काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल.२०. द्रव्यप्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्राचा विनियोगही सांगितला आहे. द्रव्यप्राप्ती करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ” ॐ नमो विष्ण्वे नम: ” जेथे भगवान विष्णू तेथे महापतिव्रता लक्ष्मी असणारच. या दृष्टीने विष्णुसहस्त्रनामाचा पाठही फार फलदायी.२१. जो मळकट कपडे घालतो. दात स्वच्छ घासत नाही, जास्त जेवतो, कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्तासमयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते.२२. जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य, आरोग्य, ऎश्वर्य व तेजाची प्राप्ति होते.२३. रुद्राक्ष धारण करण्यासाठी वय, धर्म, जात , लिंग , देश इत्यादी नाहीत. रुद्राक्षाचे पवित्र्य नेहमी राखा यचे असते. त्यामुळे रुद्राक्षाची माळ झोपताना अथवा शरीरसंबंध ठेवताना वापरू नये. रुद्राक्षाची माळ घालून मृताजवळ जाऊ नये. कोणत्याही कारणाने रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली तर ती दुधाने धुऊन घेऊन श्रद्धापूर्वक तिची पूजा करावी व “ॐ नम: शिवाय ” या मंत्राचा १०८ एवढा जप करावा व नंतर रुद्राक्ष माळ धारण करावी.२४. कोणाकडे आपले पैशांचे काम असल्यास खिशातून पाच लवंगा किंवा लसणीच्या सोललेल्या पाकळ्या एका पुडीत बांधून घेऊन जाव्यात. यामुळे पैशांच्या कामातील दुप्पट अडथळे नष्ट होऊन आपले काम होते. आर्थिक लाभ होतो.२५. दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राह्ते.२६. ज्ञानेश्वरी तर स्तोत्राची, मंत्राची महाराणी. रात्री झोप येत नसेल तर रोज रात्री झोपायच्या आधी १२ व्या अध्यायाच्या पहिल्या १६ ओव्या वाचाव्या.(झेराक्स करून घ्याव्या).२७. यश्च्याय कुबेराय वैष्णवाय, धन – धान्यधिपतये धन – धान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा ! ऊत्त्तर दिशेला कुबेराचा फोटो लावावा. हा कुबेराचा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचा १०८ वेळा स्फटिकाच्या माळेवर जप करावा.२८. एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाउन १ किलो गूळ अर्पण करावा व तिथेच बसून “हनुमान चालिसा” चे ११ पाठ करावेत. अनावश्यक खर्चाला पायबंद बसेल.२९. कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे.पैशाअभावी अडकलेली कामे मार्गी लागतील.३०. दर पौर्णिमेला रात्री बारानंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अश्वत्थ वृक्षावर म्हणजे पिंपळावर असते आणि म्हणूनच ज्यांना शंका होईल त्यांनी अश्वत्थ वृक्षाला दहा प्रदक्षिणा घालाव्यात, आर्थिक अडचण कधी उद्भवणार नाही.३१. घरातील फरशी पुसताना थोडे खडे मिठ पाण्यात टाकावे. त्यायोगे घरातील नाकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. लक्ष्मीप्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतील.३२. घरात, दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजविणाऱ्या श्रीकृष्णाची तसवीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी. कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही.३३. नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा. सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पचंरगी धागा बांधावा. दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी. प्रगती १००% होतेच होते.३४. ज्या ज्या वेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जाता त्या त्या वेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ ( नारळ ) कुंकू अर्पण करुन विसर्जित करा. तात्काळ नफा हेच त्याचे सूत्र.३५. रोज रात्रौ पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये, व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवावे. त्यामुळे घरातील दारिद्रय विनाकटकट निघून जाते.३६. दध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे.३७. घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा. त्यामुळे घरामध्ये दारिद्रय येत नाही. उत्त्तर- पूर्वेला दरवाजा असेल तर तांदळाचं आणि पश्चिम-दक्षिणेला दरवाजा असेल तर गव्हाचे स्वस्तिक उंबरठयावर काढावं. त्यावर मधोमध सुपारी व चार बिंदुवर रुपया हळकुंड, खारीक व बदाम असं क्रमाने ठेवावं किंवा विडयाच्या पानावर अक्षता सुपारी ठेवून ते पान उंबरठयावर ठेवा. किमान सणासुदीला वा वाढदिवशी वगैरे तरी हे करावे.३८.उपवास करून – शरीरशुध्दी होते,यात्रा करून – शरीर बलवान होते,जप करून – मानसिक विकास होतो,अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने – यश मिळते,धन, रत्न जतन केल्याने – लक्ष्मी स्थिर राह्ते,दान केल्याने – धन दौलत व राजऐश्वर्य लाभते,वास्तुशास्त्रानुरूप – घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते,रत्न वापरल्याने – मानसिक स्थिरता, शरीर बलवत्ता लाभते,रोज ध्यान करून – एकग्रता, दृढनिश्चय आणि निर्णय क्षमता वाढते.३९. पैशाची कधीही कमतरता भासणार नाही.अश्र्वत्थाची (म्हणजे पिंपळाची) नित्य पूजा करून त्याला पाणी घालावे व ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा मंत्र म्हणून १०८ प्रदक्षिणा घालाव्यात व सूर्यास्तानंतर तेथे साजूक तुपाचे निरांजन लावून ठेवावे तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरदहस्त राहील.४०. कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शन, अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी. तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहात राहील.४१. गुरूपुष्यामृत योगावर सराफाकडून किमान १ मिलीग्रॅम तरी सोने न विसरता प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन विकत आणावेच आणावे. गुरूपुष्यामृत केव्हा आहे हे पंचागात किंवा कॅलेंडरमध्ये दिलेले असते तो दिवस माहीत करून घ्यावा व लक्षात ठेवावा. पुरेसे सोने जमा झाले की पत्नीलाच एखादा दागिना करावा. सोने गुरुपुष्यामृत योगावर खरेदी करण्याचे कारण असे की ते विकायची पाळी कधीच येणार नाही.४२. लक्ष्मीची साधना, पूजा, प्रार्थना करताना साधकाचे तोंड पूर्वेकडे अथवा उत्तरेकडे असावे.४३. कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ व लोभदायक.४४. स्नान करूनच भोजन करावे. जेवण केलेल्या ताटात हात धुवू नये. मांडीवर वा हातात ताट घेऊन जेवू नये. दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये.४५. सतत पवित्र गोष्टींचे ध्यान करावे. चुकूनही अपशब्द बोलू नये.शक्य असेल तर रोज एक तास मौन पाळावे.४६. एक लांबलचक मोरपीस विकत आणून ते घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर सेलो टेपने चिकटवून ठेवावे रोज सायंकाळी त्याला उदबत्ती ओवाळावी. हा तोडगा ज्यांचे येणे अडकून पडले आहे त्यांनी अवश्य करून पाहण्यासारखा आहे. तीन चार महिन्यात येणे असलेली रक्कम हटकून परत मिळते.४७. व्यापार मंदावत चालला असेल, व्यापार बंद पडला असेल किंवा भांडवल असूनही व्यापार होत नसेल तर अशा वेळी व्यापारामध्ये यश येण्यासाठी पुढील प्रभावी तोडगा अवश्य करावा. दररोज सकाळी देवासमोर बसून विष्णुसहस्त्रार्जुनचा जप करावा. तसेच तुळशीकाष्ठाची पाने घेऊन ‘ॐ नमो विष्णवे नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. या तोडग्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होऊन व्यापारामध्ये यश येते.४८. रोज गरम तव्यावर पोळी-भाकरी भाजण्यापूर्वी दूध शिंपडावे यामुळे घरातील आजारपण कमी होते.४९. मुख्य दाराच्या पडद्याच्या खाली काही घुंगरू बांधावेत. घरात प्रसन्नतेचे वातवरण राहील.५०. जास्तीत जास्त अन्नदानाच्या योगे अनेक दोष नष्ट होतात.५१. जेव्हा बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असाल तेव्हा रस्त्याने ओठ न हलवता मनातल्या मनात “श्री श्री” मंत्राचा जप अवश्य करत जावा. यामुळे आर्थिक स्थितीमध्ये आश्र्चर्यकारक रूपात वृद्धी होईल. वारंवार धन जमा करण्याची संधी येईल.५२. धनदायी नक्षत्र मृग , पृष्य , मघा , मूळ ह्या नक्षत्रात तुमची कामे तुम्ही सुरू करू शकता खूप फायदा होतो.५३. लक्ष्मीप्राप्तीच्या इच्छुकांनी अन्न व दूध झाकून ठेवावे.५४. गुरूपुष्य किंवा रविपुष्य नक्षत्राला कार्यसिद्धी यंत्र, श्रीयंत्र व कुबेर यंत्राची एकाचवेळी वा एकत्र घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी विधिवत स्थापना करावी.५५. घरातील नवीन केरसुणी आणल्यावर तिला हळद/कुंकू लावून पूजा करून वापरावी. तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये. दिवे लागल्यावर झाडू मारू नये.५६. घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्व्च्छ ठेवावा तसेच संध्याकाळी तिन्हीसांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा. त्या वेळेस धूप दाखवावा.५७. सर्व मनोरथ पुर्ण होण्यासाठी एक मंडलाचे पठण करावे‘श्रीव्यंकटेश स्तोत्र’ हे महाराष्ट्रातील एक प्रमाणभूत आणि प्रभावी स्तोत्र समजले जाते.अनेक प्रकारचे असाध्य आजार बरे होण्यासाठी या स्तोत्राचे एक मंडल पुरेसे आहे.५८. दसऱ्याच्या दिवशी एखाद्या गर्भश्रीमंत व चरित्र्यवान व्यक्तीने दिलेली आपट्याची पाने चांदीच्या अगर पितळेच्या डबीत ठेवून ती देवापाशी ठेवावी. अशा तऱ्हेने मिळालेली आपटयाची पाने ही धन देणारी असतात.५९. घरात ज्या खोलीत तिजोरी ठेवलेली असेल त्या भिंतीचा रंग काळा, लाल अथवा निळा नको. पिवळा असावा.६०. रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी. मन:शांती लाभते .स्वामी समर्थ तोडगे Facebook Twitter Whatsapp थोडे नवीन जरा जुने