फ़क्त 30000 रूपये पगार सरकारी कर्मचाऱ्याकडे मिळाले तब्बल 7 कोटींचे घबाड : भोपाळ मध्य प्रदेश येथील सरकारी कर्मचाऱ्याकडे 7 कोटी रुपयांची मालमत्ता सापडली आहे
36 वर्षीय हेमा मीना यांचा पगार महिन्याकाठी केवळ 30 हजार रुपये असताना त्यांच्याकडे 20 वाहने सात लक्झरी कार 20000 चौरस फूट जमीन अतिशय महाग असलेल्या गिर जातीच्या बारा गाई 30 लाख रुपये किमतीचा 98 इंची टीव्ही यासह इतर गोष्टी आढळल्या आहेत
भ्रष्टाचार विरोधी पथकाने टाकलेल्या छाप्यात सरकारी अधिकाऱ्याने कमावलेली बेशभी मालमत्ता समोर आली आहे मध्य प्रदेश पोलीस गृहनिर्माण महामंडळामध्ये कंत्राटी प्रभारी सहाय्यक अभियंता असलेल्या हेमा मीना यांच्या नोकरीच्या सुरुवातीच्या अवघ्या दहा वर्षात त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावावर कोट्यावधी रुपयांची मालमत्ता असल्याचे आढळून आले
मीना यांच्या घरावर पथकाने टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात संपत्ती उघडकीस आली यामध्ये 100 कुत्रे संपूर्ण वायरलेस कम्युनिकेशन सिस्टम मोबाईल जामर यासह इतर मौजदार वस्तूंचा समावेशही आहे पथक गुरुवारी सौर पॅनल दुरुस्तीच्या नावाखाली मीना यांच्या बंगल्यात आले पथकाने एका दिवसात तब्बल सात कोटी रुपये किमतीची मालमत्ता शोधून काढली आहे ही मालमत्ता त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोता पेक्षा तब्बल 232 टक्के जास्त आहे