मित्रांनो आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे उन्हाळा म्हटलं की भरपूर बिलाचा फटका आपल्याला येत असतो कारण दिवस रात्र पंखे कुलर एसी फ्रीज हे सर्व उपकरण सुरू असतात यातच आपले विजेचे बिल वाढत असते
आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला उन्हाळ्यात तुमचं इलेक्ट्रिक बिल कमी करण्यासाठी या टिप्स महत्त्वाच्या ठरतील
उन्हाळ्यामध्ये इलेक्ट्रिकचे बिल कमी करण्यासाठी 5 टिप्स
आपल्या घरामध्ये जर एअर कंडिशनर म्हणजेच एसी असेल तर सर्वात जास्त इलेक्ट्रिक बिल करिता एसी कारणीभूत ठरत असतो
तसेच इतर उपकरण जसे फ्रीज आणि कुलर हे सुद्धा इलेक्ट्रिक बिल वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत असतात आज आम्ही तुम्हाला येथे पाच अशा टिप्स देऊ ज्या वापरून आपण आपलं घरचे इलेक्ट्रिक बिल कमी करू शकाल
सर्वप्रथम विज बिल कमी करण्यासाठी तुम्ही आदर्श तापमान जाणून घ्या
एसी वापरताना आपण सर्वांचा कॉल असतो की तापमान कमी करणे परंतु तुम्ही ज्या प्रमाणात एसी चालू करता व तापमान कमी करता त्यामुळे तुमचे विजेचे बिल चटकनच वाढते त्यामुळे विजेची बचत करण्यासाठी तुम्ही तुमचा एसी 24 ते 26 अंश सेल्सिअस इतक्या तापमानावर ठेवू शकता
24 ते 26 अंश सेल्सिअस हे माणसासाठी थंड आणि चांगल्या हवेच्या प्रवासासाठी एक आरामदायक तापमान आहे यापेक्षा जर तुम्ही अधिक तापमान ठेवले तर तुमच्या अजून कपात होऊ शकेल
दुसरी टिप्स थंड हवा बाहेर जाणार नाही याची खात्री करा
तुम्हाला तुमच्या एसी चे बिल कमी करायचे असेल तर एसी ज्या रूम मध्ये आहे ती रूम पूर्णतः बंद असणे गरजेचे आहे अन्यथा तुम्हाला वीज बिल वाढेल कारण थंडी हवा ही बाहेर निघून जाईल आणि एसीला जास्त वीज खर्च होईल म्हणून खिडक्या दारू घट्ट बंद करा
फ्रिज हा 24 तास सुरू असतो त्यामुळे विज बिल वाढते म्हणून फ्रीज / एसी निवडताना फाइव स्टार किंवा कमीत कमी फोर स्टार निवडावा व ऑटोमॅटिक ऑन ऑफ सिस्टीम वाला निवडावा तसेच त्याची विशेष चाचणी करावी जास्त जुना फ्रिज असेल तर तो बदलून घ्यावा अन्यथा तो तुम्हाला जास्त बिल चे कारण बनेल
एसी सोबत पंखा
एसी जेव्हा तुम्ही ऑन कराल तेव्हा तुम्हाला तुमचा फॅन सुरू ठेवायचा आहे त्यामुळे तुमच्या रूम मधील हवेचे संचरण सुधारते तसेच रूम जलद थंड होण्यासाठी एसी गरम हवा लवकर काढून टाकतो तसेच फॅन सुरू असल्यामुळे तापमान हे लवकर कमी होणार म्हणून कधीही एसी सुरू करताना सोबत पंखा सुरू करावा
एसी बंद करावी
एकदा एसी सुरू केली आणि रूम ही थंड झाली की मग एसी बंद करून द्यावा व फॅन सुरू राहू द्यावा त्यामुळे बिलामध्ये बरीचशी बचत होते
घरातील इतर उपकरण दुरुस्ती केलेले असतील किंवा खूप जुने असतील तर ते सुद्धा जास्त बिलाचं कारण ठरू शकतात त्यामुळे त्यांचे सुद्धा सर्विसिंग करणे किंवा ते उपकरण बदलून घेणे व आधुनिक युगातील कमी विजा वर चालणारे उपकरण वापरावे
तरीही मित्र-मैत्रिणींनो आपणास वरील टिप्स कशा वाटल्या कमेंट करून कळवा धन्यवाद