7th Pay Difference : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारी कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सरकार आता सातवा वेतन आयोग चे थकबाकीचा चौथा हप्ता हा जूनच्या पगारात देणार असल्याचा निर्णय केला आहे ही रक्कम भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा केली जाईल किंवा रोखीने दिली जाईल
कशी मिळणार थकबाकी?
भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात जमा करण्यात येणाऱ्या थकबाकीच्या चौथ्या हप्त्याच्या रकमेवर एक जुलै 2022 पासून व्याज दिले जाईल परंतु जमा झालेली रक्कम काढता येणार नाही
जे कर्मचारी एक जून 2022 व नंतर निवृत्त झाले अथवा मरण पावले अशांना वेतनातील थकबाकी ही उर्वरित हप्त्यांची रक्कम रोखीने मिळणार
राज्य कर्मचारी, निवृत्त कर्मचारी, जिल्हा परिषद, अनुदानित शाळा, सर्व शासन अनुदानित संस्था यांना ही थकबाकी मिळणार आहे तसेच निवृत्तीवेतनधारकांना ही थकबाकी जून 2023 च्या पगारात रोखीने मिळेल
तर शासकीय कर्मचारी जिल्हा परिषद अनुदानित शाळा व इतर अनुदानित संस्था कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी लागू असल्याची थकबाकी भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा होईल
ज्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन योजना किंवा अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू आहे त्यांना थकबाकी ची रक्कम रोखीने दिली जाणार
तरी मित्रांनो सातवा वेतन आयोगाची थकबाकी जमाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे तरी तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा तुम्हाला काही शंका असेल तर त्या सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका