जिल्हा परिषदेतील गट क वर्गाच्या सहाशे रिक्त पदांसाठी लवकरच भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार –
ग्रामविकास विभाग तर्फे जिल्हा परिषदेतील क वर्गातील पदांची लवकरच सरळ सेवेद्वारे भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे
सोलापूर जिल्हा परिषदेत 600 पेक्षा अधिक रिक्त पदांसाठी ही सरळ सेवा भरती प्रक्रिया होणार आहे यामध्ये ग्रामसेवक आरोग्य सेवक कृषी सेवक कृषी अधिकारी लिपिक डाटा एन्ट्री ऑपरेटर विस्तार अधिकारी इत्यादी पदे भरण्यात येणार आहे
सोलापुरातील रिक्त पदांची माहिती शासनाकडे सादर करण्यात आली असून या पदभरतीसाठी शासनाने मंजुरी सुद्धा दिली आहे नुकताच उमेदवारांची वयोमर्यादा वाढवण्याबाबत GR सुद्धा शासनाने प्रसिद्ध केला असून एका वेळी निवड परीक्षा होणार असून परीक्षा घेण्याचे कंत्राट आयबीपीएस आणि टीसीएस या कंपनीला देण्यात आले आहे करिता जिल्हा परिषदेने या कंपन्यांबाबत सामंजस्य करार सुद्धा केला आहे
मागील चार वर्षापासून विभागात भरती झालेली नसल्याने उमेदवारांमध्ये मध्ये खूप अपेक्षा आहे मात्र जिल्हा परिषदेतून योग्य ती माहिती देण्यात येत नसल्याने सचिव नयाने आता या भरतीची माहिती जिल्हा परिषदांच्या कार्यालयात दर्शनी भागात उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहे येत्या आठवड्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध होईल अशी माहिती येत आहे