NAMO Shetkari MahaSamman Nidhi Yojna Maharshtra : नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण नमो शेतकरी महासं्माननिधी योजनेबाबत संपूर्ण माहिती घेणार आहोत तरीही हा लेख आपण पूर्ण वाचावा तसेच या योजनेच्या अंतर्गत जे काही सर्व अपडेट्स उपलब्ध होतील ते आम्ही येथे उपलब्ध करून म्हणून या पेजला बुकमार्क करायला विसरू नका
नमो शेतकरी महासम्मान निधी योजना माहिती पात्रता अर्ज निधी – NAMO Shetkari MahaSamman Nidhi Yojna Maharshtra
आता शेतकर्यांना 1 रुपयात पिक विमा मिळणार
नमो शेतकरी महासन्मान निधी (NAMO SHETKARI MAHASAMMAN NIDHI YOJNA) योजनेअंतर्गत राज्यामध्ये दीड कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ होणार असून याबाबतची संपूर्ण माहिती या लेखात आपण सविस्तरपणे घेऊ या योजनेमध्ये सहभागी कसे व्हावे लागेल त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार संपूर्ण अर्ज प्रक्रिया कशी आहे ते आपण संपूर्ण जाणून घेऊ
नमो शेतकरी सन्माननिधी योजना – NAMO Shetkari MahaSamman Nidhi Yojna Maharshtra ही केंद्र सरकार यांची किसान सन्माननिधी योजना च्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात येणारी योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये मिळणार असून फक्त एक रुपया मध्ये शेतकऱ्याला पिक विमा योजनेचा लाभ सुद्धा मिळणार आहे अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सहा हजार किसान सन्मान निधीचे आणि 6000 नमो शेतकरी महासंबंधी योजनेअंतर्गत म्हणजेच एकूण 12 हजार रुपये वर्षाकाठी मिळतील
योजनेचे नाव | नमो शेतकरी सन्माननिधी योजना |
पुरस्कृत | महाराष्ट्र शासन |
लाभार्थी | महारष्ट्रातील शेतकरी |
मिळणारी रक्कम | ६००० रुपये प्रती वर्ष |
योजना राबवणार | महाराष्ट्र शासन |
योजने चे घोषणा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
कोणाच्या धर्तीवर | किसान सम्मान निधी |
अपेक्षित खर्च वार्षिक | 6900 |
नमो शेतकरी महासन्मान निधी योजने चे उद्देश्य
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याद्वारे नमो शेतकरी महासंबंधी योजना सुरू करण्यात मागे मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देणे असा आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत होऊ शकेल व त्यांना त्यांचे जीवन चांगल्या पद्धतीने ते जगू शकणार तसेच सरकार शेतकऱ्यांना एक रुपया प्रीमियम वर प्रधानमंत्री पिक विमा योजना सुद्धा देणार आहे
प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांकडून विम्याचे प्रीमियम दोन टक्के घेतले जाते परंतु महाराष्ट्र सरकार द्वारे फक्त एक टक्का प्रीमियम शेतकऱ्यांना द्यावा लागेल यामुळे शासकीय तिजोरीवर 3212 करोड इतका भार पडणार आहे सरकारचं एक मात्र उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना सहाय प्रदान करणे व त्यांना आत्मनिर्भर बनविणे आहे
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता मिळणार 12 हजार रुपये
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना च्या अंतर्गत पात्र जे शेतकरी आहेत त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी चे सहा हजार रुपये मिळणार आणि सोबतच नमो शेतकरी महासंघ योजना च्या माध्यमातून सहा हजार रुपये महाराष्ट्र सरकार देणार म्हणजेच आता शेतकऱ्यांना तब्बल 12 हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळणार
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरच महाराष्ट्र सरकार दिशा निर्देश देणार असून सर्व पात्र चे शेतकरी आहे त्यांना हा लाभ मिळणार
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना चे वैशिष्ट्य
- नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकार ची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना प्रमाणे एक योजना आहे
- आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपये महाराष्ट्र सरकार आणि सहा हजार रुपये केंद्र सरकार असे एकूण बारा हजार रुपये मिळणार
- प्रत्येक तीन महिन्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये टाकले जाणार
- या योजनेअंतर्गत दीड कोटी शेतकऱ्यांच्या परिवारांना लाभ देण्याचा सरकारचा विचार आहे
- प्रत्येक वर्षाला 6900 कोटी रुपये सरकार या योजनेकरिता खर्च करणार
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना करिता पात्रता
- नमो शेतकरी महासंबंधी योजनेचा फायदा घेण्यासाठी आपण महाराष्ट्रातील रहिवाशी असणे गरजेचे आहे
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांजवळ महाराष्ट्रात जमीन असणे आवश्यक असणार
- शेतकऱ्याजवळ आधार लिंक बँक खाते असणे आवश्यक असणार
- शेतकऱ्याजवळ सातबारा असणे आवश्यक असणार
नमो शेतकरी महासन्मान निधी योजने करिता लागणारे कागदपत्रे
या योजनेत सहभागी होण्यासाठी किसान सन्माननिधी प्रमाणेच कागदपत्र लागणार
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- डोमेसाईल प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- मोबाईल आधार लिंक
- बँक पासबुक आधार लिंक
- पासपोर्ट साईज फोटो
- जमिनीचा सातबारा
- स्वघोषणा प्रमाणपत्र
नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत ऑनलाइन अर्ज कसा सादर करावा – ONLINE APPLY PROCESS
मित्रांनो अजून पर्यंत यासाठी अर्ज स्वीकृती सुरू होणे बाकी आहे त्यामुळे अधिकृत वेबसाईट अद्याप पर्यंत येणे बाकी आहे तरीसुद्धा ज्या पद्धतीने किसान सन्मान निधी योजनेमध्ये आपण अर्ज सादर केला त्याच पद्धती नुसार येथे सुद्धा ऑनलाईन अर्ज करावे लागतील
- आपणा सर्वप्रथम अधिकारी वेबसाईटवर जावे
- त्यानंतर तिथे नवीन अकाउंट तयार करण्यासाठी रजिस्टर नाव वर क्लिक करावे
- रजिस्टर नाव क्लिक केल्यानंतर तुमचे आधार कार्ड नंबर टाकावे
- आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आधार वर ओटीपी येईल तो प्रविष्ट करावा
- प्रविष्ट केल्यानंतर तुमचे अकाउंट तेथे तयार होईल तो तुम्हाला पासवर्ड विचारेल तुम्हाला एक पासवर्ड सेट करून ठेवायचा आहे
- आता वेबसाईट मध्ये लॉगिन झाल्यावर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागेल
- वैयक्तिक माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमची शेतीची माहिती नमूद करावी लागेल
- त्यानंतर तुम्हाला वरील दिलेली कागदपत्रे अपलोड करावी लागतील
अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकणार
सारांश
तरी मित्रांनो या लेखात आपण नमू शेतकरी महासंबंधी योजना याबाबत संपूर्ण तपशील दिलेली आहे आपणास ही माहिती आवडल्यास नक्की या पोस्टला शेअर करायला विसरू नका
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत किती पैसे मिळणार
किसान सन्माननिधी योजनेअंतर्गत शेतकऱ्याला सहा हजार रुपये मिळतात त्याचप्रमाणे नमो शेतकरी मान सन्मान निधी योजनेअंतर्गत सुद्धा महाराष्ट्र सरकार शेतकऱ्याला सहा हजार रुपयाची आर्थिक मदत देणार आहे
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना करिता पात्रता काय आहे
आपण महाराष्ट्र मध्ये रहिवासी असणे गरजेचे असणार व आपल्याकडे जमीन म्हणजेच शेती असणे आवश्यक राहणार
नमो शेतकरी सन्मान निधी योजना साठी आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक असणार का
सर्व शासकीय योजनेचा लाभ बँक खात्यामध्ये मिळत असल्यामुळे आधार कार्ड तुमच्या बँकेला आणि मोबाईल ला लिंक असणे गरजेचे असणार