प्रसाद हा मज द्यावा देवा – Prasad ha maj dyava deva Prathna
प्रसाद हा मज द्यावा देवा,
प्रसाद हा मज द्यावा देवा |
सहवास तुझाची घडावा देवा, प्रसाद हा मज द्यावा देवा…||ध्रु||
निशिदिनी तव मी नाम स्मरावे,
वियोग ना तव व्हावा देवा,
प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा ||१||
हरिभजनामृत निशिदिनी पाजुनी,
जन्म मृत्यू चुकवावा देवा,
प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा ||२||
हृदय मंदिरी तुवा बैसूनी,
ज्ञानयोग शिकवावा देवा,
प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा ||३||
आत्म सुखास्तव प्रसाद द्यावा,
विसर तुझा न पडावा देवा,
प्रसाद हा मज द्यावा देवा, प्रसाद हा मज द्यावा
सहवास तुझाची घडवा देवा, प्रसाद हा मज द्यावा ||४||