UPSC Success Story : केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी च्या नागरी सेवा परीक्षा 2022 चा नुकताच निकाल मंगळवारी घोषित झाला त्यामध्ये इशिता किशोरने देशांमध्ये पहिला क्रमांक मिळवला
देशातल्या पहिल्या चारही क्रमांकावर यावर्षी मुलींचे वर्चस्व दिसून आलं संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या इशिता ची चर्चा सुरूच आहे परंतु यासोबतच जिने दुसरा क्रमांक पटकाविला अशी गरिमा लोहिया हीच देखील जितके करावे तितके कौतुक कमीच आहे कारण गरीमाने कोणत्याही क्लास शिवाय ही या परीक्षेमध्ये यशाचा महाशिखर गाठला व देशात दुसरा क्रमांक पटकाविला
आपल्या परिसरात आपण बघतो अनेक पालक मुलांच्या क्लासेस वर लाखो रुपये खर्च करतात परंतु गरिमा लोहियाने घरच्या घरी अभ्यास करून दुसरा क्रमांक संपूर्ण भारतात यूपीएससी परीक्षेमध्ये पटकाविला
टीव्ही 9 भारतवर्ष सोबत बोलताना गरिमा म्हणाली की मी काहीतरी करून दाखवण्याचा निर्धार केला होता आपल्या वाटेत कितीही अडथळे आले तरी थांबायचं नाही असं माझा निर्धार होता
गरिमा ने सांगितले की तिने ही परीक्षा पास होण्यासाठी केवळ पुस्तकांची मदत घेतली तसेच तिने ऑनलाइन गुगलची सुद्धा मदत घेतली तिला पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्रॅक करायची होते परंतु पहिल्या प्रयत्न मध्ये ती यशस्वी झाली नाही म्हणून तिने हार न मानता पुन्हा प्रयत्न केले व दुसऱ्या प्रयत्नात तिने यशाचं शिखर गाठलं
पहिल्या वेळेस जेव्हा ती परीक्षेमध्ये काही गुणांनी मागे पडली तेव्हा ती थोडी अपसेट झाली होती परंतु तिच्या आईने तिचा आत्मविश्वास दिला
गरिमा म्हणाली मी स्वतःला खूप नशीबवान मानते. याआधी मी इतकी कधीच आनंदी झाले नव्हते मी माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केलं याचं खूप आनंद मला आहे
माझ्या मुलीने अधिकारी व्हावं असं माझ्या आई-वडिलांचं स्वप्न होतं त्यांचं हे मागणं देवाने ऐकलं
आज माझे वडील असते तर त्यांना खूप आनंद झाला असता गरिमाचे वडील यांचा 2015 साली निधन झालं
गरिमा म्हणाली तिचे आई-वडील हे तिचे प्रेरणाचे स्तोत्र आहेत
गरिमा ज्या भागातील रहिवासी आहे त्या भागातिल मुलीचं दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांचं लग्न लावून दिलं जातं परंतु गरीबाची आई वडील त्या विरोधात होते उलट तिच्या पालकांनी तिला शिक्षणासाठी प्रोत्साहित केला म्हणूनच तिने हे यशाचं शिखर गाठलं
गरीमाने बक्सर मधून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं परंतु उच्च शिक्षण मिळावं म्हणून तिच्या आई-वडिलांनी तिला वाराणसीला पाठवलं तिथे तिने बारावीपर्यंत शिक्षण केले व बारावीनंतर ती दिल्लीमधील महाविद्यालयामध्ये बीकॉम पर्यंतचे शिक्षण घेतलं