ZP BHARTI SYLLABUS UPDATE : जिल्हा परिषद भरती … अभ्यासक्रमात बदल नाही
जिल्हा परिषद भरती परीक्षेचा अभ्यासक्रम शासन निर्णयानुसार : जिल्हा परिषद भरती प्रक्रियेच्या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम 2014 च्या शासन निर्णयानुसारच निश्चित करण्यात आला आहे.
उमेदवारांच्या मागणीनुसार अभ्यासक्रमाबाबत स्पष्टता आणून त्याचे प्रामाणिके करण करण्यात आल्याचे स्पष्टीकरण पुन्हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले
जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 2019 पासून रडखडली आहे आता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75000 पदांची भरती प्रक्रिया होणार आहे त्या जिल्हा परिषदेतील पदांचाही समावेश असणार आहे
ग्रामविकास विभागाने नुकताच शासन निर्णय प्रसिद्ध करून अभ्यासक्रम काठीन पातळी इत्यादी तपशील जाहीर केला मात्र या शासन निर्णयातील अभ्यासक्रमात 2019 च्या अभ्यासक्रमापेक्षा बदल करण्यात आल्याने ते अडचणीचे ठरत असल्याचे उमेदवारांचे म्हणणे येत आहे
या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्टीकरण दिले
आयबीपीएस कडून जास्त कठीण प्रश्नपत्रिका तयार केली जाण्याच्या भीतीमुळे अनेक उमेदवारांना सविस्तर अभ्यासक्रम प्रसिद्ध करण्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेऊन शासनाने सविस्तर अभ्यासक्रम निश्चित केला निश्चित केलेला अभ्यासक्रम 2014 चे शासन निर्णयाप्रमाणेच आहे
केवळ अभ्यासक्रमाबाबत स्पष्टता येण्यासाठी विषयानुसार यादी देण्यात आली आहे प्रसिद्ध केलेल्या अभ्यासक्रमामुळे नेमका अभ्यास काय करायचा याची माहिती उमेदवारांना होण्यासाठी मदत होणार आहे आणि अभ्यासक्रमामध्ये कुठलाही बदल केलेला नाही उमेदवारांनी त्याबाबत गैरसमज करून न घेता चांगल्या रीतीने अभ्यास करावा असे प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे