आरक्षित उमेदवार खुल्या जागांवर पात्र : खुल्या प्रवर्गातील नोकरीसाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवारपात्र असतात ही मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने पुन्हा एकदा एका प्रकरणातील निर्णयामध्ये सांगितले आहे
तसेच या संदर्भात कायदा स्पष्ट असताना देखील आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वारंवार खुल्या प्रवर्गामध्ये नोकऱ्या नाकारल्या जात असल्यामुळे सरकार व सरकारी यंत्रणांची न्यायालयाने कान उघडणी केली आहे
न्यायमूर्ती रोहित देवने अनिल पानसरे यांनी या निर्णय दिला खुल्या प्रवर्गाचा अर्थ सर्वांसाठी खुला असा होतो त्यामुळे खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी तयार करताना जात किंवा पंथाच्या प्रवर्ग विचार करण्यात येत नाही तसेच ज्यांनी आरक्षित प्रवर्गातून अर्ज भरला आहे म्हणून अशा उमेदवारांना या यादीमधून वगळता येत नाहीया यादीमध्ये सर्व उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांचा विचार घेणे बंधनकारक आहे असे न्यायालयाने निर्णयात नमूद केले
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचा दाखला
सर्वोच्च न्यायालयाने सौरव यादव आणि उत्तर प्रदेश सरकार या प्रकरणांमध्ये या संदर्भात निर्णय दिला आहे उच्च न्यायालयाने या निर्णयाचा दाखलाही दिला
खुला प्रवर्ग हा विशिष्ट समाज वर्गाकरिता राखीव नाही हा प्रवर्ग सर्व महिला पुरुषांसाठी उपलब्ध आहे आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराही त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर खुल्या प्रवर्गामध्ये होण्यासाठी पात्र असतात असे सर्वोच्च न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे