नमस्कार मित्रांनो, तलाठी कार्यालय अंतर्गत असणाऱ्या कोतवाल भरती पुणे विभागामध्ये लवकरच निघणार असून यामध्ये 80 टक्के जागा 15 ऑगस्ट पूर्वी भरण्यात येणार असल्याची बाब समोर येत आहे
नुकतेच राज्य शासनाने कोतवाल पदाची वेतन वाढ सुद्धा केली असल्यामुळे बरेच उमेदवार कोतवाल पदाकरिता सुद्धा वाट बघत आहे जेणेकरून त्यांना त्यांच्या गावामध्येच सरकारी नोकरी मिळू शकेल
विभागातील तरुणांसाठी ही सुवर्णसंधी चालून आलेली आहे यामध्ये पुणे विभागातील पुणे ,सातारा ,कोल्हापूर, सांगली येथील कोतवालाची रिक्त पदे भरण्यात येणार आहे
कोतवाल पदासाठी रिक्त असलेल्या जागांचा तपशील
- पुणे जिल्ह्यात कोतवालाची 119 पदे रिक्त
- सातारा जिल्ह्यात कोतवालाची 147 पदे रिक्त
- सांगली जिल्ह्यात कोतवालाची 74 पदे रिक्त
- कोल्हापूर जिल्ह्यात कोतवालाची 84 पदे रिक्त
शासनाने विशेष बाब म्हणून कोतवाल भरतीला मान्यता दिली असून पुणे विभागात लवकरच जिल्हाधिकारी यांच्या देखरेखी खाली कोतवालाची भरती केली जाणार आहे
पुणे विभागातील पाच जिल्ह्यात कोतवालाच्या 529 जागा रिक्त आहे रिक्त जागांपैकी 80% पदे ही जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी यांच्या देखरेखित भरली जाणार आहेत