शेतकरी मित्रांनो , फळपीक विमा साठी राज्यात 26 जिल्ह्यांमध्ये फळबागांना हवामान आधारित विमा योजना लागू करण्यात आली आहे या योजनेत एका लाखाच्या आसपास फळ उत्पादक सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
कर्जदार शेतकऱ्यांना विमा घ्यायचा नसेल तर तसे घोषणापत्र त्यांना द्यावे लागेल अन्यथा विमा हप्ता परस्पर कापला जाणार आहे
पुनर्रचनेत हवामान आधारित फळ पिक विमा योजना प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गतच राबवली जाणार असून यामध्ये संत्रा, मोसंबी, चिकू, पेरू ,डाळिंब ,लिंबू, द्राक्ष व सीताफळ असे फळपिके या योजनेत सहभागी आहेत
फळ पिक विमा चा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल
ज्या शेतकऱ्यांकडे वरील बागा आहेत त्यांनी भाग घेण्यासाठी किंवा न घेण्यासाठी पीक कर्ज खाते किंवा किसान क्रेडिट कार्ड खाते असलेल्या बँकेत घोषणापत्र देणे आवश्यक राहणार आहे जर आपणास पीक विमा घ्यायचा नसेल तर तसे घोषणापत्र संबंधित पिकाच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर बँकेमध्ये जमा करावे लागेल
सहभागी होण्यासाठी पात्रता
शेतकऱ्याकडे स्वतःचा सातबारा किंवा भाडेपट्टी किंवा कुळ फळपीक बाग असणे आवश्यक आहे
फळ पिक विमा साठी मर्यादा किती आहे
शेतकऱ्यास अधिसूचित फळ पिकासाठी मृग व अंबिया दोन्ही बार मिळून जास्तीत जास्त फक्त चार हेक्टर क्षेत्रापर्यंत विमा नोंदणी करता येणार आहे
फळपीक भाग उत्पादनक्षम असणे आवश्यक असणार आहे
फळपिक विमा साठी अर्ज भरण्याची मुदत
पिक विमा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना पीक विमा योजना ही अधिकृत संकेतस्थळ म्हणजे पी एम एफ बी वाय डॉट जीओव्ही डॉट इन pmfby.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करायचा आहे
अंतिम मुदत संत्रा पेरू लिंबू द्राक्षासाठी 14 जून पर्यंत आहे मोसंबी व चिकू साठी 30 जून पर्यंत तसेच डाळिंबासाठी 14 जुलै पर्यंत तर सीताफळासाठी 31 जुलै पर्यंत अर्जा भरता येणार अशी कृषी विभागाचे म्हणणे आहे
महाराष्ट्रातील जिल्हा निहाय फळपीक विमा कंपन्या
महाराष्ट्रातील जिल्हा निहाय विमानाचा तपशील खालील प्रमाणे आहे
- अमरावती नाशिक नगर वाशिम यवतमाळ धुळे सोलापूर नागपूर व पालघर या जिल्ह्यांसाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी टोल फ्री क्रमांक 18001024088
- औरंगाबाद छत्रपती संभाजी नगर अकोला सांगली वर्धा हिंगोली, ठाणे बीड परभणी सातारा लातूर जालना कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी विमा कंपनी आहे एचडीएफसी ऍग्रो जनरल इन्शुरन्स टोल फ्री क्रमांक 18002660700
- जळगाव जिल्हा पुणे जिल्हा धाराशिव जिल्हा बुलढाणा जिल्हा करिता विमा कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी टोल फ्री क्रमांक १००४१९५००४