ZP BHARTI UPDATE 2023 : जिल्हा परिषद भरती केव्हा होणार या प्रश्नाचे उत्तर अद्याप अनूउत्तरीतचचार वर्षापासून ग्रामविकास विभागामधील जिल्हा परिषद पदभरती रडखडलेली आहे राज्य शासकीय सेवेतील 75 हजार रिक्त पदांची भरती करण्याची घोषणा शिंदे फडणवीस सरकारने केली आहे 15 ऑगस्ट पूर्वी या जागा सरकारला भरायचे आहे परंतु जिल्हा परिषदेची भरती तब्बल चार वर्षापासून रडखळलेली असताना देखील सुद्धा संबंधित विभागाचा आकृतीबंध अद्याप पर्यंत तयार नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे
जिल्हा परिषद भरती रडखळण्यामागे नेमके कारण काय
जिल्हा परिषद भरती वेगवेगळ्या कारणाने ही पदभरती रडखळली आहे आधी परीक्षा कशी घ्यायची ऑफलाईन की ऑनलाईन त्यानंतर ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी कंपनीची निवड करण्यात आली त्यानंतर कंपनीसोबत करार करण्यामध्ये वेळ गेला सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिल्हा परिषदांमधील रिक्त जागा भरायचा निर्णय चार वर्षापूर्वीच झाला असताना देखील या पदांचा सुधारित आकृतीबंध तयार नसल्याची बाब समोर येत आहे
कधी होणार आकृती बंध तयार
सुधारित आकृतीबंध तयार होत नसल्यामुळे ग्रामविकास विभागाने मागील महिन्यात सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती तसेच सुधारित आकृती बंध सादर करण्यासाठी अजून किती वेळ लागणार आहे अशी विचारणा सुद्धा केली होती
जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्व विभागीय उपायुक्त व सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची याबाबत बैठकी झाली होती त्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील विभाग निहाय पदांची आवश्यकता आणि पदांचा सुधारित आकृतीबंध june च्या दुसऱ्या आठवड्यात सादर करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या होत्या