E pik pahni process 2023 : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपणा सर्वांनी पीक विमा काढलेला आहे परंतु अद्याप पर्यंत जर आपण आपल्या पिकाची ईपीक पाहणी केली नसेल तर खालील स्टेप्स च्या यूज करून आपण अतिशय सोप्या पद्धतीने आपला पीक पेरा सातबारा मध्ये ऑनलाईन पद्धतीने मांडू शकाल त्यासाठी खालील सांगितलेली पद्धती नुसार ई पीक पाहणी नोंदणी सातबारा वर करा
ई पीक पाहणी नोंदणी प्रोसेस 2023-24 मध्ये । E pik pahni process 2023
शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपणास प्ले स्टोर वरती पाहणी ई पीक पाहणी असे टाईप करा
हे ॲप इन्स्टॉल करून घ्यावे इन्स्टॉल केल्यानंतर दोन वेळेस डाव्या साईडला स्क्रोल करावे
त्यानंतर त्यानंतर लोकेशन अव्हेलेबलिलिटी यावर व्हेन युजिंग ॲप म्हणजेच ॲप युज करताना लोकेशन ऑन करा या पर्यायावर क्लिक करा
त्यानंतर तुम्हाला महसूल विभाग निवडायचा आहे तुमचा जो विभाग असेल जसे अमरावती औरंगाबाद कोकण नागपूर नाशिक पुणे यापैकी तुमचा विभाग निवडा
आता तुम्हाला मोबाईल नंबर विचारेल तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे
त्यानंतर तुम्हाला तुमच्या पिकाचे गाव निवडायचे आहे त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम विभाग जिल्हा तालुका व गाव अशा पद्धतीने निवड करायची आहे
त्यानंतर खातेदार निवडा हा पर्याय येईल यामध्ये तुम्हाला तुमचे पहिले नाव मधले नाव आडनाव किंवा खाते क्रमांक किंवा गट क्रमांक टाकून खातेदार शोधायचा आहे
तुम्हाला तुमचे नाव दिसेल त्यावर तुम्हाला निवडायचे आहे
पुन्हा एकदा आपले खातेदाराचे नाव तपासून बघा व खाते क्रमांक तपासून बघा त्यानंतर खाली दिलेल्या अरो बटन वर क्लिक करा
आता तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवण्यात येणार
आता पुढे बटन वर क्लिक केल्यानंतर otp टाका असे म्हणेल तिथे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी प्रविष्ट करायचा आहे
आता आपल्यासमोर काही पर्याय येतील त्या पर्यायांमधील पीक माहिती नोंदवा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे
आता तुम्हाला तुमचा खाते क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर तुमचा गट क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर जमिनीची एकूण क्षेत्र निवडायचे आहे
आता तुम्हाला तो पीक निवडायला सांगेल शेतामध्ये एकच पीक असेल तर निर्भिड पीक निवडा दोन पीक किंवा अधिक पीक असेल तर मिश्र पीक निवडा
त्यानंतर पिकाचा प्रकार निवडायचा आहे पीक किंवा फळबाग
तुम्ही लागवड केलेले पीक निवडायचे आहे
नंतर लागवड केलेले क्षेत्र हेक्टर मध्ये टाकायचे आहे
त्यानंतर जलसिंचनाचे साधन निवडायचे आहे
विहीर बोरवेल कोरडवाहू इत्यादी पैकी जे तुम्हाला लागू असेल ते निवडायचे आहे
सिंचन पद्धती मध्ये तुम्हाला ठिंबक सिंचन विहीर कालव्याची पाणी असे काही पर्याय असणाऱ्या त्यापैकी तुम्हाला लागू असलेला पर्याय निवडायचा आहे
नंतर तुमचा लागवडीचा दिनांक टाकायचा आहे
त्यानंतर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जाऊन अक्षांश रेखांश मिळवा या बटनावर क्लिक करायचे आहे
मुख्य पिकाचा एक फोटो काढून अपलोड करायचा आहे त्यानंतर खाली दिलेले √ वरती क्लिक करायचे आहे
त्यानंतर तुम्हाला संपूर्ण तुमची भरलेली माहिती पिकाच्या फोटो सहित दिसेल ही संपूर्ण माहिती तपासून घेणे आवश्यक आहे व त्यानंतर भरलेली पिकांची माहिती बरोबर आहे या बटणावरच्या समोर √ करायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमचा मोबाईल मधून पीक पेरा ऑनलाइन पद्धतीने बनवू शकाल