PCMC RESULT : नमस्कार मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा निकाल 10 जुलै दरम्यान लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
महापालिकेच्या विविध विभागातील गट ब आणि गट क जागांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती या परीक्षांचा निकाल 10 जुलै दरम्यान लागणार आहे
तसेच महापालिकेच्या परीक्षा कालावधीमध्ये युपीएससीची परीक्षा आली होती त्यामुळे 81 जणांचा परीक्षा घेणे शक्य झाले नाही या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा 17 जुलैला घेण्यात येणार आहे अशी माहिती महापालिका उप आयुक्त विठ्ठल जोशी यांनी दिली
महापालिकेच्या 387 जागा करिता मे महिन्यामध्ये तीन दिवस ऑनलाइन पद्धतीने राज्यातील विविध केंद्रावर परीक्षा पार पडली
मे महिन्यामध्ये 26 तारीख 27 तारीख 28 तारखेला परीक्षा झाली होती या परीक्षेसाठी 85 हजार 387 जणांनी अर्ज केले होते
PCMC उत्तर तालिका जाहीर
परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची उत्तर तालिका प्रसिद्ध झाली आहे त्यांच्या लॉगिन आयडीवरून ती पाहता येणार आहे त्यावर हरकती असल्यास त्यांनी तीन दिवसात कळवण्याची मुभा दिली आहे
पीसीएमसी ची उत्तर तालिका पाहण्याकरिता खालील लिंक
PCMC RESOPNCE SHEET ANSWER KEY पहा
या पदांचा निकाल राहणार राखीव
89 विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन निकाल जाहीर करावा अशी मागणी करण्यात येते मात्र त्यांची परीक्षा घेण्यास उशीर होत आहे त्यात लिपिक कनिष्ठ अभियंता विद्युत कनिष्ठ अभियंता व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदांचा निकाल राखीव ठेवण्यात येणार आहे राहिलेल्या 89 विद्यार्थ्यांची परीक्षा झाल्यानंतर सदर निकाल जाहीर करण्यात येणार आहे