blue-moon-2023 : जेव्हा एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येतात तेव्हा दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला खगोलशास्त्रात ब्लू मुन म्हणण्याची पद्धत आहे
या महिन्यात 31 ऑगस्टला ब्ल्यू मून दिसणार आहे या महिन्यातील पहिली पौर्णिमा ही एक ऑगस्ट रोजी होती कोणत्याही दोन पौर्णिमांमध्ये 29.5 दिवसाचं अंतर असते त्यामुळे पहिली पौर्णिमा महिन्याच्या सुरुवातीला येते तेव्हा दुसरा पौर्णिमेच्या चंद्राला ब्ल्यू मुन म्हणण्याची पद्धत आहे
फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा असल्याने या महिन्यात केवळ एकच पौर्णिमा येत असते हा महिना वगळता कोणत्याही इतर महिन्यात दोन पौर्णिमा येऊ शकतात ब्ल्यू मुन ची सर्वात जुनी नोंद सण 1528 मधली आहे
कधी कधी एका वर्षात दोन वेळा ब्लू मुन सुद्धा येत असतो एकाच वर्षात दोन वेळा ब्ल्यू मुन दिसण्याचे चक्र 19 वर्षांनी होत असते हा चंद्र इतर पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणेच दिसत असतो
अवकाशातील कोणती घटना असली की त्यामागे अंधश्रद्धा जोडल्या जातात परंतु जनतेने अशा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये