राज्यात नवे वाळू धोरण जाहीर केल्यानंतर आता राज्य सरकार वाळूची विक्री करणार आहे यातून राज्यभरात सुमारे 65 वाळू डेपो तयार करण्यात आले असून सर्वात जास्त वाळू डेपो हे नागपूर विभागात आहेत नागपूर विभागात तब्बल 35 वाळू डेपो तयार करण्यात आले
वाळू ऑनलाईन बुकिंग करिता महाराष्ट्र शासनाने महा खनिज या संकेतस्थळावरून वाळूची खरेदी करता येणार आहे तसेच वाहतुकीसाठी लागणाऱ्या ट्रकचे सुद्धा ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे
तेलंगणा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही राज्य सरकारने वाळू विक्रीचे नवे धोरण नुकतेच जाहीर केले
सहाशे रुपये ब्रास या त्या दराने वाळू विक्री करण्यात येत आहे यापूर्वी राज्यामध्ये लिलाव म्हणजेच टेंडर पद्धतीने वाळू विक्री केली जात होती
मात्र ज्या ठिकाणी वाळू उपसा होत होत अशा ठिकाणी लिलावांना प्रतिसाद मिळत नव्हता म्हणून नवीन वाळू धोरण ज्या ठिकाणी वाळूची उपलब्ध आहे आणि वाळूचे लिलाव झाले नाहीत अशा ठिकाणी वाळू डेपो तयार करण्यास जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे
महाराष्ट्रात ऑनलाईन पद्धतीने वाळू बुकिंग कशी करावी
ऑनलाइन पद्धतीने वाळू बुकिंग करिता महाखनिज वेबसाईट लिंक