विधी सेवा योजना : – नमस्कार मित्रांनो निर्धारित पात्रता व निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मोफत कायदेविषयक मधून देते पैसे नाहीत म्हणून कोणीही न्यायापासून वंचित राहू नये हा मोफत विधी सेवा योजनेचा उद्देश आहे
योजनेचा लाभ घेण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाकडे अर्ज करावा लागतो त्यानंतर पात्र अर्जदारांना मोफत वकील दिला जातो तसेच इतर कायदेशीर सेवा व खर्च देखील दिला जातो तातडीच्या प्रकरणात अर्जाशिवाय सुद्धा विधी सेवा दिली जाते
मोफत वकील मिळवण्यासाठी काय करावे लागेल
मोफत वकील मिळवण्याकरिता विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयात मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र सहाय्यक अक्षय उभारण्यात आला आहे आपणास तिथे जाऊन भेट देऊन संपूर्ण माहिती अर्ज मिळेल
विधी सेवा योजनेत कोणाला लाभ मिळते
- महिला व अठरा वर्षे वयापर्यंतची बालके
- अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिक
- कारागृह पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपी
- मानवी तस्करी शोषण व वेट बिगारीचे बळी ठरलेले व्यक्ती
- औद्योगिक कामगार मनोरुग्ण व दिव्यांग व्यक्ती
- भूकंप इत्यादी नैसर्गिक आपत्ती औद्योगिक आपत्ती व जातीय हिंसा कधी
- तीन लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्ती