नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो करियर निवडताना बऱ्याचदा वेगवेगळे ऑप्शन्स आपल्यासमोर असतात त्यातले योग्य व आपली आवड जोपासणारे ऑप्शन आपण निवडण्यास प्राधान्य देत असतो त्याचप्रमाणे ज्या क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी व मागणी आहेत अशी अभ्यासक्रम मध्ये जर करिअर घडले तर आयुष्य मार्गी लागते म्हणूनच मित्रांनो आजच्या या लेखात आपण असे काही क्षेत्र बघणार आहोत ज्यात जर तुम्ही करिअर केले तर तुम्हाला एक चांगला पगार मिळू शकतो
मित्रांनो नुकताच फोर्स ॲडव्हायझरने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे त्यानुसार जर तुम्ही या क्षेत्रामध्ये करिअर केलं तर तुमचं भविष्य चमकु शकतो तर असे कोणते क्षेत्र आहे ते आपण जाणून घेऊ
नर्सेस परिचारिका
जागतिक पातळीवर विशेषता पाश्चात्य देशांमध्ये परिचारिका या पदासाठी मोठी मागणी आहे यामध्ये तब्बल आपणास डॉलर 101340 वार्षिक सरासरी वेतन मिळू शकते या क्षेत्रात तब्बल 46% 2031 पर्यंत वाढ अपेक्षित असून चांगल्या करिअर करून चांगली नोकरीची यामध्ये संधी मिळू शकते
वैद्यकीय सेवा व्यवस्थापक
आरोग्य क्षेत्रातील वैद्यकीय सेवा व्यवस्थापक हे पद मोठ्या रुग्णालयांमध्ये डॉक्टर नर्सेस कर्मचाऱ्यांची भरतीचे व्यवस्थापनाचे काम असते या पदासाठी तब्बल सरासरी वार्षिक वेतन डॉलर एक लाख एकवीस हजार पाचशे तीस पर्यंत मिळतील या क्षेत्रात 2031 पर्यंत तब्बल 28 टक्के वाढ अपेक्षित आहे त्यामुळे जर या क्षेत्रात आपण करिअर केले तर आपले भविष्य उज्वल होऊ शकते
डेटा सायंटिस्ट
टेक्नॉलॉजीच्या दुनियेमध्ये प्रत्येक कंपनीला त्यांचे कस्टमर चा डेटा आयडेंटिफाय करणे व त्यातून सर्वोत्तम डेटा काढून कंपनी आपले नियोजन करण्याकरिता डेटा सायंटिस्ट या पदाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे या पदासाठी तब्बल वार्षिक एक लाख डॉलर पर्यंत वेतन कंपनीज देत आहे या क्षेत्रात 2031 पर्यंत 36 टक्के वाढ अपेक्षित आहे
इन्फॉर्मेशन सेक्युरिटी अनालिस्ट
इन्फॉर्मेशन सेक्युरिटी अनालिस्ट हे पद माहितीच्या गुप्तते व सुरक्षेबाबत जबाबदारीचे पद आहे या पदाची मागणी दिवसेंदिवस वाढत असून या पदाकरिता सुद्धा डॉलर एक लाख पर्यंत सरासरी वार्षिक वेतन मिळत आहे तसेच या क्षेत्रामध्ये 2031 पर्यंत 35 टक्के वाढ अपेक्षित आहे
विंड टरबाइन सर्विस टेक्निशियन
या क्षेत्रामध्ये विंटरबाइनला बसवणे देखभाल करणे दुरुस्ती करणे इत्यादी जबाबदारी आहेत आता जग नैसर्गिक शक्तीचा वापर करून वीज तयार करण्याची प्रयत्नात असून त्यामुळे पवनचक्क्या बसवणे त्याची देखभाल करणे दुरुस्ती करणे यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे या पदासाठी तब्बल डॉलर 56 हजार 260 इतके वेतन मान अपेक्षित असून या क्षेत्रात 44% इतकी वाढ 2031 पर्यंत अपेक्षित आहे
सोलर फोटो व्होल्टिक इंस्टॉलर
मित्रांनो दिवसेंदिवस महाग होत चाललेली वीज ला पर्याय म्हणून सोलर एनर्जी चा वापर वाढत आहे म्हणूनच सोलर फोटो इंस्टॉलर या पदासाठी मागणीमध्ये वाढ होणे अपेक्षित आहे या पदासाठी जागतिक स्तरावर डॉलर 48000 इतकं वेतनमान मिळत असून यामध्ये 2031 पर्यंत सत्तावीस टक्के वाढ अपेक्षित आहे
सारांश
तरी मित्रांनो वरील क्षेत्रामध्ये जर तुम्ही तुमचे करिअर घडवले तर तुमचे भविष्य उज्वल असेल तरी क्षेत्र निवडताना तुम्ही वरील पदांसाठी विचार करू शकता जेणेकरून तुम्हाला एक मोठ्या पगाराची संधी उपलब्ध होऊ शकेल