मराठी साहित्यिक, साहित्य व टोपण नावे – वारंवार परीक्षेत येणारे मराठी साहित्यिक, साहित्य व टोपण नावे
प्रवासवर्णने-
- अनंत काणेकर – निळे डोंगर- तांबडी माती, धुक्यातून लाल ताऱ्याकडे
- रमेश मंत्री – पृथ्वीच्या पाठीवर
- महादेव शास्त्री जोशी – तीर्थरूप महाराष्ट्र
- पू. ल. देशपांडे – अपूर्वाई, पूर्वरंग
- गो. नि. दांडेकर – दुर्गदर्शन, नर्मदेच्या तटाकी
- मंगला राजवाडे – पाहिलेला देश – भेटलेली माणसे
- अरविंद गोखले – अमेरिकेस पाहावे जाऊन
- अनिल अवचट – अमेरिका
- अण्णा भाऊ साठे – माझा रशियाचा प्रवास
आत्मचरित्र
- विठ्ठल रामजी शिंदे – माझ्या आठवणी व अनुभव
- विठ्ठल कामत – इडली, ऑर्किड आणि मी
- लक्ष्मीबाई टिळक – स्मृतिचित्रे
- साधना आमटे – समिधा
- सूर्यकांत मांडरे – धाकटी पाटी
- सेतू माधवराव पगडी – जीवनसेतु
- आत्माराम भेंडे – आत्मरंग
- उषा किरण – उषःकाल
- आनंदीबाई शिर्के – सांजवात
- साने गुरुजी – श्यामची आई
- प्रकाश आमटे – प्रकाशवाटा
- आचार्य अत्रे – मी कसा झालो, कऱ्हेचे पाणी
- दिलीप प्रभावळकर – एका खेळीयाने
- जयश्री गडकर – मी जयश्री
- जयंत नारळीकर – चार नगरांतील माझे विश्व
- गंगाधर गाडगीळ – एका मुंगीचे महाभारत
- चंद्रकांत गोखले – चंद्रकिरण
- ना. सी. फडके – माझे जीवन एक कादंबरी
- कुमार सप्तर्षी – येरवाड्याच्या तुरुंगातील दिवस
- ग. प्र. प्रधान – माझी वाटचाल
- दुर्गा खोटे – मी दुर्गा खोटे
- बाबुराब पेंढारकर – चित्र आणि चरित्र
- दु. भा. भावे – प्रथम पुरुष एक वचन
- मारुती चितमपल्ली – चकवा चांदण – एक वनोपनिषद
- यशवंतराव चव्हाण – कृष्णाकाठ
- शांता शेळके – धुळपाटी
- व्ही. शांताराम – शांताराम
- वि. दा. सावरकर – माझी जन्मठेप
दलित साहित्य
- अण्णाभाऊ साठे – फकिरा, वारणेचा वाघ (कादंबऱ्या), भानामती, लाडा (कथा)
- शंकरराव खरात – मइ माझ्या गावाच्या शोधात, माणुसकीची हाक, झोपडपट्टी, मी मुक्त – मी मुक्त (कादंबऱ्या), बारा बलुतेदार (कथा)
- दया पवार – बलुतं (आत्मकथन), कोंडवाडा (काव्य)
- गंगाधर पानतावणे – हलगी (आत्मकथन)
- नामदेव ढसाळ – गोलपिठा, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले (काव्य)
- लक्ष्मण माने – उपरा (आत्मकथन)
- नरेंद्र जाधव – आमचा बाप अन आम्ही (आत्मकथन)
- सुनील लवटे – खाली धरती वरती आकाश (स्वकथन)
- उत्तम बंडू तुपे – काट्यावरची पोटे (आत्मकथन), झुलवा, चिपाड (कादंबरी)
- शांताबाई कांबळे – माझ्या जल्माची चित्तरकथा (आत्मकथन)
- लक्ष्मण गायकवाड – उचल्या (आत्मकथन)
- नामदेव कांबळे – मोराचे पाय, कृष्णार्पण (कादंबऱ्या)
- उर्मिला पवार – आयदाव (आत्मकथन)
- मारोतराव जाधव – भटक्या (आत्मकथन)
- प्रकाश खरात – अंधाराचा अस्त (कथा)
- केशव मेश्राम – जुगलबंदी, उत्खनन (काव्य), मरणकळा, पत्रावळ, खरवड (कथा)
- यशवंत मनोहर – उत्थान गुंफा (काव्य)
- बेबी कांबळे – जिणं आमचं
- आत्माराम राठोड – तांडा (आत्मकथन)
- अर्जुन डांगळे – बांधावरची माणसे (कथा), छावणी हलते आहे (काव्य)
मराठी साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे:
लेखक/ लेखिका
- राम गणेश गडकरी – बाळकराम
- शंकर काशीनाथ गर्गे – दिवाकर कृष्ण
- वीरसेन आनंद कदम – बाबा कदम
- सीताराम भाऊ गायकवाड – टेक्सास गायकवाड
- के. ज. पुरोहित – शांताराम
- आत्माराम नीलकंठ साधले – आनंद साधले
- केशव सीताराम ठाकरे – प्रबोधनकार ठाकरे
- प्र. के. अत्रे – आचार्य अत्रे
- पांडुरंग सदाशिव साने – साने गुरुजी
- बाळकृष्ण हरी कोल्हटकर – बाळ कोल्हटकर
- भा. वि. वरेरकर – मामा वरेरकर
- द्वारकानाथ माधव पितळे – नाथमाधव
कवी / कवयित्री टोपणनाव
- राम गणेश गडकरी – गोविंदाग्रज
- प्रल्हाद केशव अत्रे – केशवकुमार
- पंढरीनाथ गोपाळ रानडे – फिरोज रानडे
- नारायण मुरलीधर गुप्ते – बी
- कृष्णाजी केशव दामले – केशवसुत
- आत्माराम रावजी देशपांडे – अनिल
- त्र्यंबक बापूजी ठोंबरे – बालकवी
- गोपाळ हरी नातू – मनमोहन
- काशिनाथ हरी मोडक – माधवानुज
- निवृत्ती रावजी पाटील – पी. सावळाराम
- श्रीधर कृष्ण कुलकर्णी – पठ्ठेबापूराव
- शंकर केशव कानेटकर – गिरीश
- विष्णू वामन शिरवाडकर – कुसुमाग्रज
- यशवंत दिनकर पेंढारकर – यशवंत
- माणिक गोडघाटे- ग्रेस
- माधव त्र्यंबक पटवर्धन – माधव ज्युलियन
- चिंतामण त्र्यंबक खानोलकर – आरती प्रभू
- गोविंद विनायक करंदीकर – विंदा करंदीकर