Mahavitran New Prepaid Meter – मोबाईल प्रमाणे वीज सुद्धा प्रीपेड होणार : मोबाईल प्रमाणे आता वीज सुद्धा प्रीपेड पोस्टपेड होणार आहे त्यासाठी आता प्रत्येक घरी जुने मीटर हलवून त्या जागी नवीन स्मार्ट मीटर लावले जाणार यात प्रीपेड मीटर मध्ये पैसे संपले की वीजपुरवठा आपोआप खंडित होणार रिचार्ज केल्यावर परत वीज सेवा सुरळीत होईल
महावितरण यासाठी 26 कोटी रुपयांच्या सहा निविदा वितरित केल्या असून अदानी पॉवर सह चार कंपन्यांना एलओए लेटर ऑफ अस्पेक्टन्स अर्थात स्वीकारपत्र जाहीर करण्यात आले आहे
आता या कंपन्या 27 महिन्यात राज्यभरात 2.37 कोटी ग्राहकांचे मीटर बदलून प्रीपेड स्मार्ट मीटर लावेल
येत्या दहा वर्षात मीटरची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी या कंपन्यांचीच राहील
एकूण सात निविदा जारी करण्यात आल्या होत्या परंतु केवळ 1100 कोटी रुपयांची कोल्हापूरसाठी जारी निविदा वितरित होऊ शकली नाही सर्वाधिक काम अदानी समूहाला मिळाले आहे असे महावितरण च्या सूत्रांचे म्हणणे आहे
कोठे लागणार कोणत्या कंपनीचे मीटर
मानटी कारलो नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर येथे मानटी कार्लो कंपनीचे मीटर लागणार आहे
जीनस कंपनीचे मीटर अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यात लागणार आहे
एनसीसी मराठवाड्यात मीटर लावणार आहे
तर अदानी भांडुप कल्याण पश्चिम महाराष्ट्र व कोकण मध्ये मीटर लावणार आहे
विजेची आणि व चोरी रोखण्यासाठी महावितरण राज्यभरात सत्तावीस हजार फीडर व चार लाख ट्रांसफार्मर मध्ये सुद्धा स्मार्ट मीटर लावण्यात येणार आहे
चार महिन्यांमध्ये घरोघरी मीटर बदलले जाणार
येत्या चार महिन्यात मीटर बदलण्याच्या कामाला सुरुवात होईल परंतु नवीन कनेक्शन साठी पुढच्या महिन्यापासूनच स्मार्ट मीटर देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे मोबाईल प्रमाणे हे स्मार्ट मीटर पोस्टपेड व प्रीपेड असतील हे मीटर लागल्यानंतर थकबाकीची समस्या पूर्णपणे दूर होईल