विश्वकर्मा योजना 2023 : नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा जयंती निमित्त पारंपारिक कारागीर आणि हस्तक्षेप कारागिरांसाठी 13000 कोटी रुपयांची प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली
प्रधानमंत्री च्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ समितीने गेल्या महिन्यात पाच वर्षाच्या कालावधीसाठी म्हणजेच आर्थिक वर्ष 2023 24 ते आर्थिक वर्ष 27 28 पर्यंत 13000 कोटी रुपयांच्या आर्थिक पीएम विश्वकर्मा नवीन केंद्रीय क्षेत्र योजनेला मंजुरी दिली होती विश्वकर्मा योजनेची उद्दिष्ट पारंपारिक कारागीर आणि हस्तक्षेप कारागीरांद्वारे तयार केलेले उत्पादने आणि सेवांची सहज उपलब्धता आणि गुणवत्ता वाढवणे आहे
अशी आहे विश्वकर्मा योजनेचे उद्देश
एक लाख रुपये कर्ज करिता 18 महिन्यांची परतफेड आणि दोन लाख रुपये करिता तीस महिन्यांची परतफेड असणार कर्ज हे दोन टप्प्यांमध्ये देण्यात येणार
व्याजदर पाच टक्के आकारला जाईल
सुषमा लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे अनुदान म्हणून भरले जाईल 8 पर्सेंट व्याज
कोणत्याही हमीशिवाय म्हणजेच गॅरंटी शिवाय हे कर्ज सहज उपलब्ध होणार या कर्जाची हमी केंद्र सरकार घेणार त्यामुळे बँक आपणास हमी मागणार नाही
कोणत्या व्यवसायिकांना मिळणार विश्वकर्मा योजनेचा लाभ
सुतार बोटनिर्माता शस्त्रे बनवणारे लोहार कुलूप बनवणारे सुवर्णकार कुंभार शिल्पकार मूर्तिकार दगड कोरणारे दगड फोडणारे चर्मकार गवंडी टोपली चटई झाडू विणकर बाहुली आणि पारंपारिक खेळणी बनवणारे नाभिक पुष्पहार बनवणारे परीट शिंपी मासेमारीचे जाळे बनवणारे
विश्वकर्मा योजना करिता लागणारे कागदपत्रे
मित्रांनो विश्वकर्मा योजने करिता सर्वप्रथम आपणाला संबंधित बँकेत खाते असणे गरजेचे आहे या योजनेमध्ये कर्ज घेण्यासाठी आपणास खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे
राष्ट्रीयकृत बँकेत खाते
आधार कार्ड किंवा कोणतेही एक आयडी प्रूफ
विश्वकर्मा योजनेअंतर्गत व्यवसाय असण्याचे प्रूफ जसे शॉप ॲक्ट किंवा व्यवसाय रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट
पासपोर्ट साईज दोन फोटो
पारंपारिक व्यवसाय जागेचा फोटो