तलाठी भरती 2023 निकाल – Talathi Bharti Result 2023 : तलाठी भरती 2023 चे सर्व शिफ्टचे पेपर 14 सप्टेंबर रोजी पूर्ण झाले दहा लाख 41 हजार उमेदवारांपैकी आठ लाख 64 हजार उमेदवारांनी परीक्षा दिली तलाठी परीक्षेचा निकाल दिवाळी पूर्वी लावण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत तलाठी भरती परीक्षेसाठी तब्बल साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते छाननीअंती 4466 जागांकरिता दहा लाख 41 हजार 713 असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख 64 हजार 960 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली
तलाठी भरती परीक्षा ही तीन टप्प्यांमध्ये आणि दिवसांमध्ये तीन सत्रात घेण्यात आली त्यानुसार 17 ते 22 ऑगस्ट मध्ये पहिला टप्पा पार पडला त्यानंतर 26 ऑगस्ट ते दोन सप्टेंबर मध्ये दुसरा टप्पा पार पडला आणि चार ते 14 सप्टेंबर या कालावधीत तिसरा टप्पा पार झाला तलाठी परीक्षेत एकूण 57 सत्रे झाली परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीच्या सर्व मध्ये संपूर्ण परीक्षांचा डाटा एकत्रित केला जाणार आहे त्यानंतर कंपनीकडून उत्तर तालिका म्हणजेच तलाठी भरती आंसर की जाहीर केली जाणार विद्यार्थ्यांना ऑनलाइन लॉगिन मध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तर पत्रिका दिसणार उमेदवारांना जर काही आक्षेप असेल तर दिलेल्या मुदत मध्ये नोंदविता येणार तलाठी भरती 2023 चा निकाल हा दिवाळी पूर्वी लावण्यासाठी संबंधित विभाग प्रयत्न करणार आहे