पोलिस दलात कंत्राटी भरती
मुंबई पोलीस दलात कंत्राटी भरती 3000 सुरक्षा रक्षकांची नियुक्ती होणार
राज्य सुरक्षा महामंडळामार्फत मुंबई पोलीस दलात 3000 कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला होता त्याची क्रिया सुरू करताना राज्य सुरक्षा महामंडळाचे 3000 सुरक्षा रक्षक 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सुरक्षा दलाकडून पुरविणार असल्याचे जाहीर करताना सुरक्षारक्षकाची नोंदणी व नेमणूक प्रक्रिया 25 ते 27 सप्टेंबर दरम्यान करण्यात येणार असल्याची घोषित केले आहे
राज्य सरकारी सेवेत कंत्राटी भरती वरून वाद सुरू असतानाच आता पोलीस दलातही कंत्राटी भरतीची प्रक्रिया सुरू केल्याने विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत
राज्य सुरक्षा महामंडळामार्फत कंत्राटी पद्धतीने जास्तीत जास्त 11 महिन्यासाठी भरती करण्यात येणार आहे