PF Withdrawal EPFO : अचानक आलेल्या संकटात किंवा गंभीर उपचारासाठी गरज पडल्यानंतर अनेक जण भविष्य निर्वाह निधीतील म्हणजेच पीएफ मधील पैसे काढण्याचा पर्याय निवडतात परंतु यासाठी केलेला दावा फेटाळण्यात आल्याने हक्काचे पैसे असूनही खातेदारकांना अडचणींचा सामना करावा लागतो असा दावा पुन्हा पुन्हा फेटाळल्याने मानसिक त्रासाला समोर जावे लागते परंतु आता तसे होणार नाही कर्मचारी भविष्य निधी संघटनेने म्हणजेच ईपीएफओने पीएफ खात्यामधील पैसे काढण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे
क्षेत्रीय कार्यालयाला दावा एकापेक्षा अधिक वेळा फेटाळून लावता येणार नाही तसेच केलेल्या दाव्याचा निपटाराही निर्धारित वेळेत होईल
पैसे काढण्याचे दावे लवकरात लवकर निकाली काढण्यात यावे एकच दावा अनेक आधारांवर वारंवार पिटाळण्यात येऊ नये प्रत्येक दाव्याची पहिली वेळी संपूर्ण तपासणी करण्यात यावी दावा फेटाळला जात असेल तर त्याचे स्पष्ट कारण ईपीएफो सदस्याच कळवण्यात यावे असे मार्गदर्शक सूचना ईपीएफने दिल्या आहेत
ईपीएफ मधून पैसे काढताना काय आहेत अटी
- काढण्यात येणाऱ्या रकमे च्या एकूण जमा रक्कम 50 टक्के पेक्षा अधिक नसावी
- विवाह आणि शिक्षण यासाठी तीन पेक्षा अधिक वेळा पैसे काढता येणार नाहीत
- खाते उघडल्यानंतर पाच वर्षाच्या आत 50 हजार रुपये पेक्षा अधिक रक्कम काढल्यास काढलेल्या रक्कम वर दहा टक्के टीडीएस कापला जाईल
- पॅन क्रमांक नसल्यास काढलेल्या रकमेवर 30 टक्के टीडीएस लागेल
पीएफ हा कधी काढता येतो
तुमच्या पीएफ खात्यामध्ये जमा झालेली रक्कम पूर्णपणे किंवा त्यातील काही भाग तुम्हाला काढता येतो
कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर तसेच सलग दोन महिन्याहून अधिक काळासाठी बेरोजगार असेल तरी त्याला पीएफ खात्यातील संपूर्ण रक्कम काढता येते
केवळ एका महिन्यासाठी बेरोजगार असल्यास पीएफ खात्यातील 75 टक्के रक्कम काढता येते
आजारपणातील उपचार आपत्कालीन स्थिती मुला-मुलींचे लग्न गृह कर्जाची परतफेड आधी परिस्थितीमध्ये पीएफ खात्यातील काही रक्कम खातेदाराला काढता येते