सोने होणार स्वस्त ! दहा टक्क्यांनी दर घसरण्याची शक्यता : भारतात सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे अशातच सोने चांदी किंवा दागिन्याची खरेदी करण्यासाठी एक योग्य वेळ जवळ येत आहे ते म्हणजे सातत्याने सोन्याच्या किमतीत घट होत आहे पितृपक्ष उलटल्यानंतर लोक सोने चांदीची नाणी खरेदी करण्यास प्राधान्य देतात
अमेरिकेचा डॉलर गेल्या 11 महिन्यापासून तेजी मध्ये आहे अमेरिकेतील फेडरल बँकेकडून यापुढेही आणखी काही काळ व्याजदर वाढवण्याचे संकेत दिले आहेत याचा एकूण परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमत तीवर दिसून आला त्यामुळे सोन्याची घसरण सुरू झाली आहे भारतीय सराफा बाजारात सुद्धा सोना व चांदी ची किंमत घसरत आहे
एका अंदाजानुसार मंदीच्या भीतीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर आणखी 10 टक्क्यांनी घसरू शकतात मागील सहा महिन्यात देशात सोने तब्बल 5100 रुपयांनी तर एप्रिल पासून आत्तापर्यंत चांदी दहा हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे
सोने किती स्वस्त होऊ शकते
आर्थिक क्षेत्रातील जाणकारांच्या मते चीनमध्ये जर आर्थिक मंदी आली तर सोन्याचे दर प्रति तोळा 55 हजार रुपयांवर बसून 53 हजार रुपयांवर येऊ शकता तसेच चांदी सुद्धा 60000 पर्यंत खाली येऊ शकते