भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना : कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, माता व बालमृत्यू रोखणे या मुख्य उद्देशाने राज्याच्या आदिवासी विभागाच्या वतीने महिला व बालविकास विभागाच्या समन्वयाने भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविण्यात येते
भारतरत्न डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना राज्यात सुरवात | १ डिसेंबर २०१५ पासून |
योजनेचे उद्देश | कुपोषणावर मात करण्यासोबतच माता व बालमृत्यू रोखणे |
लाभार्थी | गरोदर महिला, स्तनदा माता , 7 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके |
महिला व बालकल्याण विभागामार्फत गरोदर महिला, स्तनदा माता व 7 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके अशा लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत
अंगणवाडीत गरोदर महिलेची नोंद झाल्यापासून तिचे जन्मलेले बाळ सहा महिन्यांचे होईपर्यंत आठवड्यातील सहा दिवस चौरस आहार असलेले एक वेळचे जेवण देण्याची तरतूद, तसेच सहा महिने ते सहा वर्षांपर्यंतच्या मुलाला दररोज एक उकडलेले अंडे देण्याची तरतूद या योजनेत आहे.
कुपोषणावर मात करण्यासोबतच माता व बालमृत्यू रोखणे हे अमृत आहार योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे
आहाराचे स्वरूप
या योजनेंतर्गत देण्यात येणार्या एक वेळच्या पूर्ण आहारामध्ये चपाती अथवा भाकरी, भात, कडधान्ये-डाळ, सोया दूध (साखरेसह), शेंगदाणा लाडू (साखरेसह), अंडी अथवा केळी अथवा नाचणी हलवा, फळे, हिरव्या पालेभाज्या, खाद्यतेल, गुळ अथवा साखर, आयोडीनयुक्त मीठ, मसाला इत्यादींचा समावेश असेल. तसेच हा आहार खरेदी करण्यासाठी एका अंगणवाडीसाठी एक अशी चार सदस्यीय आहार समिती नियुक्त करण्यात येईल. या समितीला आहार घटक खरेदी करण्याचे अधिकार राहतील.
भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना योजनेचा शासन निर्णय GR पहा — लिंक