तुम्ही बँकांमधील एफडी स्वरूपात गुंतवणूक करत असाल तर विचार करणे गरजेचे आहे बँकापेक्षा आता पोस्टच्या माध्यमातून चांगला व्याजदर मिळू शकत आहे पोस्टाचा व्याजदर बँकापेक्षा अधिक असून टाईम डिपॉझिट योजना बँकाच्या मुदत ठेव योजनांना टक्कर देत आहे पोस्टामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सध्या 8.2% इतका व्याजदर दिला जात आहे
मुंबई क्षेत्रात टपाल विभागात एप्रिल ते 28 नोव्हेंबर या कालावधीत 8084 जेष्ठ नागरिकांनी आपले खाते सुरू केले आहे
पोस्टात विविध योजना व्याजदर 2023 >>
- त्यात जेष्ठ नागरिक बचत खाते ला 8.2%
- राष्ट्रीय बचत खात्यावर 7.7%
- एक वर्ष मुदत ठेव 6.8%
- दोन वर्ष मुदत ठेवू 6.9%
- तीन वर्ष मुदत ठेव 7%
- पाच वर्षे मुदत ठेव 7.5%
- आरडी पाच वर्षे 7.2%
- किसान विकास पत्र 7.5%
- मासिक उत्पन्न योजना 4.5%
- बचत खाते 4 टक्के
भविष्य निर्वाह निधी 7.1% इतके व्याज डाक विभाग देत आहे तसेच डाक विभागाच्या सुकन्या किसान विकास पत्र सावली ठेव आवर्ती ठेव जेष्ठ नागरिक बचत खाते अशा विविध योजना राबवत आहे
पोस्टात खाते उघडण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- दोन पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड
- पॅन कार्ड