नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर रोजी आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा पंधरावा हप्ता हस्तांतरित केला ज्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा झाले त्यांना एसएमएस मिळाला असेलच मात्र ज्या शेतकऱ्यांना एसएमएस आला नसेल किंवा त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर ते ऑनलाईन पद्धतीने तक्रार करू शकतात त्यासाठी खाली दिलेली पद्धत वापरावी
कशी व कुठे तक्रार करावी
सर्वप्रथम पीएम किसान डॉट जीओव्ही डॉट इन या ऑफिशियल वेबसाईटवर जावे
होम पेज वर बेनिफिशरी स्टेटस वर क्लिक करावे त्यानंतर तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकावा व त्याखाली असलेल्या कॅप्चा कोड टाकावा
त्यानंतर गेट डेटा वर क्लिक करतात तुमच्या हप्त्याची स्थिती व पैसे न आल्याचे कारण तुम्हाला तिथे कळेल
पी एम किसान योजना ईमेल द्वारे करा तक्रार
पी एम किसान योजनेत संदर्भित तक्रार करण्यासाठी ई-मेल द्वारे सुद्धा तुम्हाला तुमची तक्रार नोंदविता येईल त्यासाठी तुम्हाला pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर तक्रार करता येईल
पी एम किसान योजना टोल फ्री तक्रार क्रमांक
155261/1800115526
011-23381092
PM KISAN STATUS LINK – https://pmkisan.gov.in/BeneficiaryStatus_New.aspx