नमस्कार आजच्या लेखामध्ये आपण मकर संक्रांति याची संपूर्ण माहिती घेणार आहोत हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला विशेष महत्त्व असते शास्त्रानुसार भगवान सूर्य बारा राशी या भ्रमणच्या वेळेस जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांतीचा उत्सव साजरा केला जात असतो या उत्सवाला भारतात विविध राज्यात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते जसे सरकात टहरी पोंगल लोहडा जेव्हा मकर राशि ही सूर्यावर असते तेव्हा तीळ खाणे खूप शुभ मानल्या जाते या दिवशी स्नान व दान या दोघांना एक विशेष महत्त्व असते. प्रत्येक वर्षी मकर संक्रांति ही 14 जानेवारीला बनविण्यात येते परंतु यंदा 2024 मध्ये मकर संक्रांति ही 15 जानेवारीला असणार आहे
मकर संक्रांती माहिती पुजा विधी तिथी तारीख 2024 – Makar Sankranti 2024
मकर संक्रांती तिथी तारीख 2024
मकर संक्रांती 2024 हा महत्वाचा सण आहे. हे हिंदू कॅलेंडरनुसार माघ महिन्यात येते, जे जानेवारी महिन्यात आहे. संक्रांतीचा सण सौरचक्राच्या आधारे साजरा केला जात असल्याने तो १४ किंवा १५ जानेवारीलाच येतो . मकर संक्रांती 2024 15 जानेवारीला साजरा केला जाईल . मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणे खूप शुभ मानले जाते. पण दान हे फक्त शुभ मुहूर्तावरच करावे हे लक्षात ठेवा.
मकर संक्रांत मुहूर्त 2024
मकर संक्रांती – १५ जानेवारी २०२४, दिवस – सोमवार
मिथिला पंचांगानुसार, सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी, तर काशी पंचांगानुसार, सकाळी 8 वाजून 42 मिनिटांनी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. यामुळे 15 जानेवारीच्या दिवशीच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाईल.
मकर संक्रांती 2024 पुण्यकाळ –
मकर संक्रांतीचा पुण्यकाल सकाळी 7.15 ते सायंकाळी 5.46 पर्यंत आहे.
मकर संक्रांतीचा शुभ काळ 10 तास 31 मिनिटांचा असेल
मकर संक्रांतीच्या दिवशी रात्री 11:11 पर्यंत वरियान योग राहील. याशिवाय या दिवशी रवि योगही तयार होत आहे. ससकाळी 7:15 ते 8:07 पर्यंत रवि योग असेल. या योगांमध्ये पूजा आणि दान केल्याने निरोगी आयुष्याचे वरदान मिळते, असे सांगितले जाते.
सूर्य मकर राशीत कधी जाणार?
15 जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा मुहूर्त पहाटे 2:54 वाजता आहे, त्यावेळीच सूर्य देव मकर राशीत प्रवेश करेल. त्यानंतर महिनाभर सूर्यदेव मकर राशीत राहतील, याचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर होणार आहे. मकर संक्रांतीचा शुभ काळ सकाळी 7:15 ते 9:00 पर्यंत आहे.
मकर संक्रांतीचे महत्त्व –
मकर संक्रांती च्या संदर्भात एक मान्यता आहे की या दिवशी भगवान सूर्य आपला पुत्र शनिदेवाच्या दर्शनासाठी गेले होते. या भेटीत ते सर्व मतभेद विसरून गेले होते. म्हणूनच असे म्हणतात की या दिवशी सर्व तक्रारी विसरल्या जातात. या दिवशी नातेसंबंध सुधारतात. ज्योतिषशास्त्रानुसार, संक्रांतीच्या वेळी, सूर्य ग्रह शनिच्या घरात (शनीद्वारे मकर) प्रवेश करतो.
मकर संक्रांतीच्या दिवशी दान आणि दानाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी तीळ किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तू एखाद्या गरजू किंवा असहाय व्यक्तीला दान केल्यास खूप फायदा होईल. असे मानले जाते की या दिवशी भगवान शनिदेवाने आपल्या पिता सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी काळ्या तिळाचा वापर केला होता, त्यावर प्रसन्न होऊन भगवान सूर्याने शनीला आशीर्वाद दिला की जो कोणी या दिवशी तीळ दान करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. याशिवाय तिळाचे दान करणे शनिदोष दूर करण्यासही उपयुक्त ठरते. जर तुम्ही मकर राशीचे राशीचे असाल तर काळे तीळ दान करा. परंतु जर तुम्ही मेष, तूळ, सिंह आणि मिथुन राशीचे असाल तर या वर्षी तुम्ही राहुचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी ब्लँकेट दान करा. वृश्चिक, धनु आणि मीन राशीच्या लोकांनी तांदूळ आणि फळांचे दान करावे. याशिवाय वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांनी गरजू व्यक्तीला कपडे दान करावे. दुसरीकडे, कर्क राशीच्या लोकांनी दूध किंवा तूप दान करावे.
मकर संक्रांतीची पूजा विधि
मकर संक्रांति या दिवशी भगवान सूर्य उत्तरायण होत असतात यासोबतच इथून देवता ंचे दिवस सुरू होतात व मांगलिक कार्य सुद्धा सुरुवात होते सूर्यदेव मकर संक्रांतीच्या दिवशी अर्ध्य च्या वेळेस जल म्हणजे पाणी लाल पुष्प फुल वस्त्र गहू सुपारी इत्यादी अर्पण करावे पूजा नंतर लोकांना दान देण्याचे विशेष महत्त्व असते मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी ला विशेष महत्त्व असते
मकर संक्रांतीच्या (मकर संक्रांती 2024) सणाच्या दिवशी लोक गंगा, यमुना आणि गोदावरी यांसारख्या नद्यांच्या पवित्र पाण्यात आंघोळ करतात . धार्मिक परंपरेनुसार या नद्यांमध्ये स्नान केल्याने मागील पापांपासून मुक्ती मिळते, असे मानले जाते. या दिवशी सूर्य आणि शनिदेवाच्या उपासनेसह गायत्री मंत्र आणि सूर्य मंत्राचा जप केला जातो. कारण, मकर संक्रांतीवर सूर्य आणि शनीचा प्रभाव पडतो.
नमस्कार मैत्रिणींनो आज आपण संक्रांति बद्दल माहिती बघणार आहोत संक्रांत हा सण जानेवारी महिन्याचा 14 तारखेला येतो तिथिनुसार 14 किंवा 15 तारखेला असा फरक होतो यावर्षी 15 ला संक्रांत सान आला आहे या संक्रांतीला सुवासिनी बाया पूजा करतात सुगड्याची पूजा करतात सुगडे हे मातीचे असतात पाच किंवा दोन सुगडे ची पूजा केली जाते या सुगडे मध्ये गहू बोर शेंगा हरभऱ्याच्या ओले दाणे ऊस वालाच्या शेंगा बोर आणि हळदीकुंकू टाकून सुगड्यामध्ये वाण ठेवले जाते आणि ते झाकून ठेवले जाते. सुवासिनी ओटी भरली जाते आणि तिळगुळाचा नैवेद्य तिळगुळाचे लाडू शेंगदाणा गुळाचे लाडू आणि नैवेद्य म्हणून दूध उतू घातल्या जाते. सूर्यासमोर पूजा केली जाते आणि मुगाची डाळ तांदूळ याची खिचडी वालाच्या शेंगाची भाजी नैवेद्य म्हणून ठेवला जातो विदर्भामध्ये नागपूर जिल्हा मध्ये पेंड्या केल्या जाते त्याला पेंड्या खाईअसे पण म्हणतात पेंड्या कंदमूळ असतं आणि भोगीची पण भाजी केली जाते .भोगीच्या भाजीमध्ये तीळ आणि या ऋतूमध्ये मिळणाऱ्या सगळ्या भाज्या एकत्र करून त्याची भाजी बनवली जाते त्याला भोगीची भाजी असे म्हणतात ठिकाणानुसार काही काही पद्धती वेगवेगळ्या असतात वेगवेगळ्या भागांमध्ये आणि ज्या मुलींचे नवीन लग्न झालाय त्यांचा पहिल्या वर्षी तिळवा केला जातो त्या दिवशी काळी साडी त्या स्त्रीला हलव्याचे दागिने असे घालून नवीन सुनेचा तिळवा केला जातो स्त्रियांना बोलायला जाते वान दिल्या जातो जे लहान मुल आहे त्यांची पाच वर्षापर्यंत पण लूट केली जाते त्याला बोरवण पण म्हणतात छोट्या मुलांना पाटावर बसून त्यांचे बोर बिस्किट हलव्याचे दागिने त्यांची लूट केली जाते. संक्रांतीला काळे कपडे घातले जातात
संक्रांतीला सुगडाची पूजा केली जाते सुगड म्हणजे शेतीमालांनी भरलेला घट आपला देश हा कृषिप्रधान देश आहे त्यामध्ये नवीन मालाची पूजा केली जाते . आजूबाजूला रांगोळी नवीन कापड ठेवला जातो त्याखाली तांदूळ गहू ठेवले जातात त्यावर सुगड ठेवले जाते एक सुगड देवाजवळ तुळशीजवळ ठेवला जातो पाच सुगड असले तर एक तुळशीजवळ एक देवाजवळ आणि बाकी तीन स्त्रियांना त्याच दिवशी वाटला जातो सुगडवर फुले अक्षय फुले हळदीकुंकू वाहली जाते आणि दिवा लावला जातो नमस्कार केला जातो आणि अखंड सौभाग्य राहो अशी कामना केली जाते. संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाचे लाडू खाल्ले जातात तिळगुळ वाटले जातात. सासूला, जाऊला पाय धून तिळगुळ दिले जाते त्यामुळे मोठ्यांना मान दिला जातो आणि काही मनात कटूता असेल तर ती दूर होते तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणण्याची पद्धत पण आहे .संक्रांतीला काळा रंग घातला जातो कारण जानेवारीमध्ये खूप थंडी असते काळा रंग उष्णतेचा प्रतिक आहे यामागे शास्त्रीय आणि धार्मिक दोन्ही कारणे आहेत पतंग उडवण्याची पण पद्धत आहे यामागे पण शास्त्रीय आणि धार्मिक कारणे आहे या थंडी अनेक रोगांना घेऊन येते आणि थंडी असल्यामुळे पतंगा आपण गच्चीवर घेऊन जातो आणि सूर्याकडे पाहतो त्यामुळे आपले आपल्या शरीराला तेज आणि शरीराची हालचाल होते आणि आपल्या शरीर पण ताजतवाने फ्रेश राहते.
संक्रांतीचे फळ –
सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वाहन संक्रांतीचे वाहन वाघ उपवान घोडा वस्त्र पिवळे हातात शस्त्र गदा केशराचा टिळा वयाने कुमारी वासाकरता तिने जाईचा फुल परिधान केला आहे समुदाय मुहूर्त 30 पायास भक्षण करणारी आहे भूषण अर्थ मोती धारण केला आहे दक्षिणेकडून उत्तरेकडे जाते वर नाव राक्षसी नक्षत्र मंदाकिनी संक्रांतीने ज्या वस्तू धारण केला आहे त्या महाग होतील आपल्याकडे यावर्षी संक्रांत कशावर आहे असे म्हणण्याची पण पद्धत आहे पर्वकाला द्यायची दान नवे भांडे गाईला दान अन्न तिरपात्र तीळ गुळ सोने भूमी शक्ती प्रमाणे दान करावे वृक्ष बोलणे दात घासणे गवत तोडणे गायीचे धार काढणे काम विषय कामे करणे इत्यादी वर्ष करावे नक्की शेअर करा सबस्क्राईब करा
मकर संक्रांती साठी मजेदार उपक्रम
मकर संक्रांती हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तथापि, भारताच्या इतर भागांमध्ये ते इतर नावांनी ओळखले जाते, जसे की गुजरातमध्ये उत्तरायण, पंजाबमध्ये लोहरी, आसाममध्ये माघ बिहू. याशिवाय राज्यांमध्ये आपापल्या चालीरीतींनुसार खाद्यपदार्थ बनवले जातात. पंजाबमध्ये लोहरीच्या दिवशी गूळ आणि खिचडी खाण्याची परंपरा आहे. दुसरीकडे, राजस्थानमध्ये फेणी, तिळ-पत्ती आणि खीर यासारखे अनेक पारंपारिक पदार्थ तयार केले जातात.
मकर संक्रांती दरम्यान पतंग उडवणे हा एक पारंपारिक आणि मजेदार क्रियाकलाप आहे, जो संक्रांती सणाचा एक भाग आहे. त्याची उत्तम झलक गुजरात आणि राजस्थानमध्ये पाहायला मिळते. या दिवशी तरुणाई मोठ्या थाटामाटात पतंगोत्सव साजरा करतात.
मकर संक्रांति ला करायचे उपाय
मकर संक्रांतीच्या दिवशी पाण्यामध्ये काळे तीळ तसेच गंगाजल टाकून स्नान करावे त्यामुळे आपणास भगवान सूर्याची कृपादृष्टी प्राप्त होते धार्मिक मान्यता नुसार सूर्य व शनी देव या दोघांचा आशीर्वाद आपणास लागतो या दिवशी सूर्याला अर्ध देणे शुभ मानले आहे
सारांश –
अशा पद्धतीने मित्रांनो मकर संक्रांतीचे संपूर्ण माहिती आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेतलेली आहे मकर संक्रांती हा अत्यंत शुभ असा मुहूर्त असतो या दिवशी पतंग उडवितात आणि बरेच खाण्यापिण्याचे पदार्थ केले जातात त्याचप्रमाणे भगवान सूर्याची कृपादृष्टी सुद्धा प्राप्त केली जाते त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आजच्या या लेखामध्ये तिथी शुभ मुहूर्त उपाय परंपरा या सर्व बाबी सांगितलेले आहे तुम्हाला हा आमचा लेख कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद
नेहमी चे प्रश्न –
मकर संक्रांत 2024 तारीख तिथी ?
यंदा मकर संक्रांत 15 जानेवारी ला आहे
मकर संक्रांत ला कशाची पुजा करतात ?
मकर संक्रांत ला सूर्य देवा ची पुजा करतात ?
मकर संक्रांत ला कशाचे दान करतात ?
तिल , वस्त्र , धान्य दान करावे