राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
तारीख : 15/08/1995
क्षेत्र: सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना उद्दिष्ट
- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबियांना उदरनिर्वाहाच्या समस्यांचा सामना करावा लागू नये याकरिता राष्ट्रीय कुटुंब योजना राबवण्यात येत आहे.
- या योजनेचा मुख्य उद्देश BPL कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या निधनानंतर त्या कुटुंबातील सदस्यांना त्वरित आर्थिक मदत मिळवून देणे आहे, जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह चालू शकेल.
- त्याचबरोबर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचा सामाजिक आणि आर्थिक विकास करणे व त्यांना आत्मनिर्भर बनविणे.
- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या निधनानंतर त्या कुटुंबाला दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणाकडून पैसे कर्ज घेण्याची गरज भासू नये.
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी
- या योजनेअंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे लाभाची रक्कम थेट लाभार्थीच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल.
- BPL कुटुंबातील फक्त कमावत्या व्यक्तीच्या (स्त्री/पुरुष) निधनावरच या योजनेचा लाभ घेता येईल.
- राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना सर्व प्रवर्गातील BPL व्यक्तींना लागू आहे.
- केवळ महाराष्ट्र राज्यातील नागरीकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- फक्त 18 ते 59 वयोगटातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कर्ता स्त्री/पुरुष मृत्यु पावल्यानुंतर राष्ट्रीय कुटुुंब लाभ योजनेचा लाभ मिळवण्यासाठी त्याच्या कुटुंबियांना मृत्युच्या दिनांकापासून 3 वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अर्जदार कुटुंबाचे नाव दारिद्र्य रेषेखालील यादीत असणे आवश्यक आहे.
खालील कारणासाठी राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
- आत्महत्या
- आत्महत्येचा प्रयत्न
- अमली पदार्थाच्या सेवनामुळे झालेला अपघात
- स्वतःला जाणीवपूर्वक जखमी करून घेणे
- मोटार शर्यतीतील अपघात
- गुन्हयाच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात
- बाळंतपणातील मृत्यू
- सैन्यातील नोकरी
- जवळच्या लाभार्थ्यांकडून / वारसाकडून खून
- युद्ध
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- बँक खात्याचा तपशील
- मृत्यूचे प्रमाणपत्र
पात्रता
- अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- मृत पावलेला व्यक्ती 18-59 या वयोगटातील असणे आवश्यक आहे.
- केवळ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबच या योजनेसाठी पात्र असतील
अर्ज कसा करावा?
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया हि ऑफलाईन च ठेवण्या आली आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसलिदार संजय गांधी योजना किंवा तलाठी कार्यालय या ठिकाणी जाऊन राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
त्यानंतर अर्जात विचारलेली सर्व माहिती जसे कि अर्जदाराचे नाव, जन्मतारीख, व्यवसाय, पत्ता इ माहिती अचूकपणे भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावे लागतील.
आता हा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय यांचेजवळ जमा करावा लागेल.
अधिकारी त्यांच्याजवळ जमा अर्ज व कागदपत्रांची तपासणी करून लाभाचे वितरण करतील.
अर्ज कसा करावा
अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो. संपर्क कार्यालयाचे नाव- जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय
किंवा भेट द्या https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/special-assistance
तुम्ही येथून अर्ज डाउनलोड करू शकता व त्याची प्रिंट काढून अर्जप्रक्रिया करू शकता