प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथून 28 फेब्रुवारीला सायंकाळी चार वाजता पीएम किसान सन्मान योजनेचा सोळावा हप्ता आणि राज्यातील नमो शेतकरी महासम्मान निधि संबंधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता वितरित केला जाणार आहे
याद्वारे महाराष्ट्रातील 88 लाख शेतकऱ्यांना तब्बल 5760 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात सहा हजार रुपये जमा होणार
प्रधानमंत्री मोदी यवतमाळ जिल्ह्यातील भारी या गावात दौरा 28 तारखेला होणार आहे तेव्हा मोदीजी यांच्या हस्ते एका क्लिकद्वारे ५७६० कोटींची वितरण संबंधी शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात होणार आहे
म्हणून हा दिवस जिल्हा तालुका व गाव पातळीवर केवीके सीएससी केंद्र येथे पीएम किसान उत्सव दिन म्हणून साजरा करण्याच्या सूचना कृषी संचालकांनी दिले आहेत
पी एम किसान योजना 16 हप्ता
लाभार्थी शेतकरी 88 लाख
मिळणारा लाभ 1960 कोटी
नमो शेतकरी महा सन्मान निधी
दुसरा व तिसरा हप्ता लाभार्थी शेतकरी 88 लाख मिळणारा लाभ 3800 कोटी